लोकमान्य टिळक यांची माहिती

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात 1885 साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये 1907 मध्ये विभागणी होऊन दोन मतप्रवाहाचे गट पडले. त्यापैकी एक जहालवादी आणि दुसरा मवाळवादी गट. जहालवादी गटाचे लाल -बाल -पाल यांच्याकडे नेतृत्व होते. यामधील बाल म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होय. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हे वाक्य आजही कानावर पडले की एक प्रेरणा, पेटून उठण्याची मानसिकता तयार होते. आणि आपसूक आपल्या तोंडातून लोकमान्य टिळकांचे नाव बाहेर येते.  आजच्या या लेखातून आपण त्यांचे जीवनचरित्र रेखाटण्याचा प्रयत्न करणार आहे.pocketbiography. com च्या माध्यमातून आपण लोकमान्य टिळक यांची माहिती ही आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून प्रसारित करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या लोकमान्य टिळक यांची माहिती…….

लोकमान्य टिळक यांची माहिती Thumbnail
लोकमान्य टिळक यांची माहिती

लोकमान्य टिळक यांची माहिती :- प्रारंभिक जीवन

बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. मराठी हिंदू चितपावन ब्राम्हण कुटुंबातील असलेले त्यांचे वडील हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते व ते शिक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात काम करत होते. टिळकांना लहानपासून कुस्तीची आवड होती. यामुळेच त्यांची तब्येत ठणठणीत होती. टिळक 16 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले व त्यानंतर टिळकांचा विवाह तापीबाई (लग्नानंतरचे नाव सत्यभामाबाई) यांच्याशी झाला. विवाहाच्या काही महिन्यानंतरच त्यांच्या वडिलांचेही निधन झाले.

Buy : Lokmanya Tilak Biography Book

शिक्षण

लोकमान्य टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. गणित हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिखली या त्यांच्या जन्मगावीच झाले. त्यांच्या शालेय जीवनातील धाडसाचे किस्से आपणास माहीतीच आहेत. “मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही” हे त्यांच्या धाडसाचे उदाहरण सर्वाना माहितीच आहे. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून संस्कृत आणि गणित विषयात त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईमधील गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मधून वकिलीचे शिक्षण(एल. एल. बी ) पूर्ण केले.

शैक्षणिक कार्य

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुण्यातील खाजगी शाळेत गणित शिकवायला सुरवात केली. परंतु सहशिक्षकांशी मतभेद झाल्याने ती नोकरी सोडून दिली. पुढे 1880 मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेतून गोपाळ गणेश आगरकर, महादेव नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर या त्यांची मित्रांच्या सहाय्याने न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली. शाळेच्या स्थपानेनंतर त्यातील यशाच्या आणि अनुभवाच्या आधारावर 1884 साली उच्च शिक्षणासाठी डेक्कन एज्यूकेशन सोसायटीची स्थापना केली. 1885 मध्ये या संस्थेने फर्ग्यूसन कॉलेजची स्थापना केली. व येथेच टिळक गणिताचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले.

राजकीय कार्य

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला वाहून घेण्यासाठी 1890 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी मधून टिळक बाहेर पडले. व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी झाले. ते महात्मा गांधींचा चळवळीत प्रवेश होण्याआधी सर्वात प्रसिद्ध नेते होते. पण 1905 ते 1907 या काळात चालू केलेल्या स्वदेशी चळवळीमुळे काँग्रेसअंतर्गत जहालवादी व मवाळवादी अशी विभागणी झाली. तिथून 1920 पर्यंत म्हणजे टिळकांच्या मृत्यूपर्यंत जहालवाद्याचे वर्चस्व होते. या जहालवादी गटाचे प्रमुख नेते लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक हे होते. स्वदेशी चळवळ आणि होमरूल लीग या दोन राष्ट्रव्यापी चळवळी उभ्या करण्यामध्ये टिळकांचे प्रमुख योगदान होते.

Read More Biographical Blogs

1) प्लेग महामारीत कार्य ( रँडचा वध)

1896 ते 1997 काळात मुंबई- पुणे भागात प्लेग महामारी पसरली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक मृत्यूमुखी पडले होते. ब्रिटिश सरकारने रोगाचा संसर्ग थांबण्यासाठी कठोर उपाय योजले. यात लोकांच्या राहत्या घरात सक्तीने प्रवेश करून तपासणी करणे, स्थलांतर करणे, प्रतिबंध लावणे इ. यावेळी पुण्याचा कमिश्नर रँड याने जनतेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. या अत्याचारविरुद्ध केसरी आणि मराठा वृत्तपत्रातून प्रक्षेभक लेखातून अत्याचारी व्यक्तीला ठार मारले पाहिजे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? अशी भूमिका घेतली. आणि यातूनच प्रेरित होऊन चाफेकर बंधूनी रँडचा वध केला.

2) दुष्काळातील कार्य

प्लेग च्या साथीच्या दरम्यानच महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता.  यावेळी टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी, त्यांच्यात हक्कासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या स्वयंसेवकांनी Famine Relief Code बद्दल माहिती देणारी पत्रके गावागावात वाटली. यातून संहितेनुसार दुष्काळ असताना कर भरण्याची आवश्यकता नाही याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम केले. तसेच श्रीमंत लोकांनी दुष्काळग्रस्ताना अन्न व पैसा दान करण्याचे आवाहन केले. या गोळा केलेल्या अन्नातून आणि पैशातून सार्वजनिक ठिकाणी खानावळी चालू केल्या. त्यांनी शक्य तितकी सर्व मदत करण्याचे काम केले.

3) सार्वजनिक उत्सव

लोकांमध्ये राजकीय जनजागृतीसाठी एकी निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. तसेच महात्मा फुलेनी सुरु केलेल्या शिवजयंतीला व्यापक स्वरूप देण्याचे काम केले. सार्वजनिक सणाद्वारे लोकमध्ये ब्रिटिशविरोधी जगारूकता निर्माण करण्याचे उद्धिष्ट लोकमान्य टिळक यांचे होते.

4) स्वदेशीचा पुरस्कार

लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री स्वदेशी चळवळीसाठी जाहीर केली होती. यामध्ये लोकमान्य टिळकांचे स्वदेशी वस्तूचा वापर आणि परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकून ब्रिटिश अर्थव्यवस्थेवर प्रहार करून स्वराज्य मिळवण्याचे तसेच स्वदेशी उद्योगाना चालना मिळावी असे उद्धीष्ट होते.बेळगाव येथील गणेशोत्सवात स्वदेशी पासून स्वराज्य या विषयावर सविस्तरपणे विचार मांडले होते. त्यांच्या आवाहनाने संपूर्ण देशभर स्वदेशीची लाट पसरली. परकीय मालांच्या होळ्या पेटवल्या गेल्या. लघु कुटीरोद्योरांना नवसंजीवनी मिळण्यास मदत झाली.

5) होमरुल लीग

ब्रिटिश सरकारने स्वदेशी चळवळ दडपण्यासाठी जहालवादी नेत्यांना अटक केल्या. लोकमान्य टिळक यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली मंडालेच्या तुरुंगात ठेवले. 8 जून 1914 ला त्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली व त्यानंतर त्यांनी काँग्रेस अंतर्गत झालेल्या दुफळीचे पुन्हा एकसंघ करण्यासाठी प्रयत्न चालू केले. पण त्यात त्यांना पुरेसे यश आले नाही. शेवटी त्यांनीच बेळगाव येथे एप्रिल 1916 मध्ये होमरूल लीगची स्थापना करून स्वराज्यप्राप्ती हे ध्येय ठेवले. हळूहळू या लीग ला पाठिंबा मिळून देशव्यापी आंदोलन उभे राहिले. होमरूल म्हणजे स्वयं शासन. यासाठीच ही चळवळ उभी केली होती.

वृत्तपत्रे (पत्रकारिता)

लोकमान्य टिळक यांची माहिती घेत असताना त्यांनी सुरु केलेले वृत्तपत्रे याबाबत जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते. ब्रिटिश सरकारच्या अन्यायी धोरणांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तसेच लोकजागृती करण्यासाठी, लोकांना स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेण्यासाठी उदयुक्त करणे या उद्देशाने लोकमान्य टिळक यांनी सहकार्यांच्या मदतीने  1881 साली केसरी आणि मराठा वृत्तपत्रे सुरु केली. केसरी हे मराठीतून व त्याचे संपादक आगरकर होते. तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीमध्ये व त्याचे संपादक स्वतः टिळक होते. या वृत्तपत्रातून सामाजिक आणि राजकीय विषयावर परखड लेख प्रकाशित केले जात असत. यामुळेच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणले जाते. वृत्तपत्र चालू केल्यापासून 1920 पर्यंत म्हणजे टिळकांच्या निधनापर्यंत त्यांनी जवळपास 513 अग्रलेख लिहिले होते.

लोकमान्य टिळक यांची माहिती जाणून घ्या

साहित्य

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यचळवळीसाठी कार्य करत असतानाच खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, संस्कृत, धर्म इ. विषयावरती ग्रंथ लेखनदेखील केले. ते पुढीलप्रमाणे…

1. ओरायण

2. आर्टिक होम ऑफ द वेदाज् 

3. गीतारहस्य 

4. टिळक पंचाग पद्धती

5. वेदाचा काळ व वेदांग ज्योतिष इत्यादी.

लोकमान्य टिळक यांचे काही प्रेरणादायी विचार

1) कार्यात यश मिळो अगर ना मिळो प्रयत्नात कधी माघार घेता कामा नये.

2) महान गोष्टी सहज मिळत नाहीत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात.

3) योग्य रस्ता मिळण्याची आपण वाट बघत असतो पण आपण हे विसरतो की रस्ते वाट बघण्यासाठी नाही तर चालण्यासाठी असतात. इत्यादी

निधन

संघर्षमय जीवन जगलेल्या लोकमान्य टिळकांनी शेवटच्या श्वासापर्यत भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी स्वतःला वाहून घेतले. या सगळयात त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले. अखेरच्या दिवसात न्यूमोनिया व शेवटी हृदयविकाराच्या झटक्याने 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या माध्यमातून भारतीय जनतेमध्ये स्वाभिमान, देशप्रेमाची भावना निर्माण केली. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली गेली. त्यांचे योगदान भारतीय समाजात सदैव चिरंतन आहे. लोकमान्य टिळक यांचे जीवन आणि कार्य भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाचे पर्व होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top