मनोरंजन क्षेत्रात सध्या नवनवीन चेहरे समोर येत आहेत. यापैकी सध्या बिग बॉस मराठी सिझन पाच मध्ये असणाऱ्या अंकिता प्रभू वालावलकर ह्या एक आहेत. अंकिता प्रभू वालावलकर या Kokan Hearted Girl म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या एक उद्योजिका, सोशल मीडिया इनफ्लूएन्सर आहेत. परंतु त्यांचा हा प्रवास हा सोपा नव्हता. लहान वयात त्यांच्या हातून घडलेल्या एका मोठ्या चुकीमुळे त्यांच्या आयुष्याची पूर्ण दिशाच बदलून गेली. हा सर्व प्रवास आपण या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. Pockebiography.Com च्या माध्यमातून आपण प्रसिद्ध व्यक्तींची माहिती घेत असतो. त्याच मालिकेतील अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Walawalkar Biography) यांच्या विषयीचा हा लेख आहे. चला तर जाणून घेऊया अंकिता प्रभू वालावलकर यांच्याविषयी……
प्रारंभिक जीवन
16 फेब्रुवारी 1995 रोजी अंकिता प्रभू वालावलकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग, मालवण येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. एका सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या अंकिताचे बालपण आई-वडिलांच्या शिस्तीच्या धाकात गेले. त्यांच्या वडिलांचे नाव प्रमोद प्रभू वालावलकर आहे व त्यांच्या आईचे नाव प्रणिता प्रभू वालावलकर आहे. तसेच अंकिता यांना दोन बहिणी आहेत. प्राजक्ता प्रभू वालावलकर व ऋतुजा प्रभू वालावलकर अशी त्यांची नावे आहेत.
कोकण किनारपट्टीवर वाढलेल्या अंकिताच्या मनात कोकणाविषयी तसेच तेथील भाषेविषयी विशेष प्रेम आहे. यामुळेच पुढे त्या Kokan Hearted Girl म्हणजेच कोकणी मनाचे मुलगी म्हणून प्रसिद्धीस आल्या. अंकिता यांना अभ्यासात विशेष रुची नव्हती. पण त्यांनी घरच्यांच्या धाकामुळे त्या अभ्यास करत असल्याचे एका मुलाखतीत सांगितले आहे. असे जरी असले तरी त्या अभ्यासात हुशार होत्या व त्यांचा पहिला नंबर येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. (Ankita Walawalkar Biography)
शिक्षण
अभ्यासात हुशार असणाऱ्या अंकिता वालावलकर या इंजिनियर आहेत. त्यांचे शालेय शिक्षण डॉ. दत्ता सामंत इंग्लिश मीडियम स्कूल देवबाग येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील एमआयटी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मधून पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी कार्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. त्यांनी HPCL कंपनीमध्ये काम केले आहे. कार्पोरेट क्षेत्रातील कामाच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी पुढील आयुष्याला दिशा दिली आणि उद्योजिका तसेच सोशल मीडिया इन्फ्लूयेन्सर म्हणून नावारुपास आल्या. (Ankita Walawalkar Biography)
प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आयुष्याला वळण देणारी घटना
अंकिता यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्या घटनेने अंकिता यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. पुण्यात शिक्षण घेत असताना अंकिता या त्यांच्यापेक्षा वयाने दहा वर्ष मोठा असलेल्या मुलाच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी त्यांचे वय 16-17 वर्ष होते. 18 वर्षाच्या झाल्यानंतर आई-वडिलांच्या भीतीने अंकिता पळून जाऊन त्या मुलाच्या घरी जाऊन राहिल्या. काही दिवस त्यांच्यामध्ये चांगले संबंध राहिले पण लवकरच त्यांना त्यांचा निर्णय चुकल्याचे वाटू लागले.
त्यांना समस्येला सामोरे जावे लागले. अत्याचाराला बळी पडल्या. जवळपास दीड वर्षे त्यांनी अत्याचार सहन केला आणि शेवटी हे नाते संपवून आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्या घरी परत आल्यानंतर आई-वडिलांनी देखील भूतकाळ सोडून मोठ्या मनाने अंकिताची चूक माफ करून त्यांना पाठिंबा दिला व पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन केले आणि येथूनच पुढे अंकिताचा एक नवीन प्रवास सुरू झाला ज्या प्रवासाने अंकिता आज एक यशस्वी व्यक्तिमत्व उदयास आल्या आहेत.
सूरज चव्हाण यांची बायोग्राफी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
करियर
सुरुवातीला कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अंकिता यांनी कार्पोरेट क्षेत्रातील कामाचा अनुभव घेऊन ते काम सोडले व स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सिंधूद्योग नावाने त्यांचा व्यवसाय आहे. तसेच त्यांनी टिक टॉक या ॲप वरती कॉन्टेन्ट क्रियेटर म्हणून काम सुरू केले. यावरती छोटे छोटे व्हिडिओ बनवून त्या मनोरंजन करत होत्या. पण अल्पावधीतच टिक टॉक बंद झाल्यानंतर त्यांनी इंस्टाग्राम या ॲपचा आधार घेऊन सोशल मीडिया इन्फ्लूयेन्सर म्हणून काम चालू ठेवले. हळूहळू अंकिता यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रसिद्ध मिळू लागली. त्यांचे कोकणी भाषा आणि कोकणाबद्दलचे प्रेम लोकांच्या पसंतीस पडू लागले आणि बघता बघता Kokan Hearted Girl म्हणून त्या प्रसिद्धीस आल्या. आज त्यांचे इंस्टाग्राम वरती लाखो फॉलोवर्स आहेत.
तसेच इंस्टाग्राम सोबत त्या युट्युब वरती सुद्धा व्हिडिओ बनवतात. जे Vlog स्वरूपात असतात. येथेही त्यांचा हटके कोकणी अंदाज लोकांना आवडतो. युट्युब वरती देखील अंकिता यांचे लाखो सबस्क्राईबर्स आहेत. ज्यामधून त्या कमाई देखील करतात. सोशल मीडिया व्यतिरिक्त अंकिता यांचे इतरही व्यवसाय आहेत. वालावलकर्स बीच रिसॉर्ट या नावाने त्यांचे रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट त्यांचे आई-वडील सांभाळतात. सध्या अंकिता व्यवसाय सोशल मीडिया कॉन्टेन्ट क्रिएटर तसेच अभिनय क्षेत्रातही काम करतात. अभिनय क्षेत्रात सध्या त्या हळूहळू प्रसिद्धीस येत आहेत. अंकिता यांना मराठी बिग बॉस सीझन पाच मध्ये देखील संधी मिळाली होती. त्या पहिल्या पाच स्पर्धकापैकी एक होत्या. बिग बॉसच्या घरातील त्यांच्या कामगिरीमुळे आज त्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत. (Ankita Walawalkar Biography)
Read More: Ankita Walawalkar Biography
रिलेशनशिप
सुरुवातीला प्रेमात अपयश आलेल्या अंकिता यांच्या रिलेशनशिप बद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांनी बिग बॉसच्या घरात जाण्याआधी स्वतःच प्रेमाची कबुली दिली आहे. त्या लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. त्या संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांना डेट करत आहेत. अशी माहिती मिळाली आहे.
संपत्ती (Networth)
अंकिता प्रभू वालावलकर यांच्याकडील संपत्ती बाबत ठोस अशी माहिती उपलब्ध नाही. परंतु त्या सोशल मीडिया तसेच यूट्यूब आणि त्यांच्या व्यवसायातून प्रचंड कमाई करत असल्याचे दिसून येते. त्यांचे रिसॉर्ट व इतर उद्योग आहेत. यातून त्या महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवतात. त्यांच्याकडे हेक्टर ही एक कार देखील आहे. (Ankita Walawalkar Biography)
अशाप्रकारे आपण या लेखातून अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Walawalkar Biography) यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती सर्वांना आवडली असेल अशी अपेक्षा करतो. तसेच तुम्हाला कोणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कळवा. Pocketbiography.Com ची टीम तुमच्या सूचनांवर नक्की काम करेल. त्यावरती लेख लिहून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तसेच वेबसाइटवरील इतरही व्यक्तींची चरित्र वाचून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा राहील. धन्यवाद!!!
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1 – अंकिता वालावलकर यांची जन्मतारीख काय आहे? (Ankita Walawalkar Date of Birth (age)
उत्तर – अंकिता वालावलकर यांची जन्मतारीख 16 फेब्रुवारी 1995 आहे.
प्रश्न 2- अंकिता वालावलकर कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत?
उत्तर – अंकिता वालावलकर Kokan Hearted Girl या नावाने प्रसिद्ध आहेत.
प्रश्न 3 – अंकिता वालावलकर यांचा बॉयफ्रेंड कोण आहे? ( Ankita Walawalkar Boyfriend )
उत्तर – अंकिता वालावलकर यांचा बॉयफ्रेंड संगीत दिग्दर्शक कुणाल भगत हे आहेत. ते लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रश्न 4 – अंकिता वालावलकर यांचे शिक्षण ( Ankita Walawalkar Education)
उत्तर – अंकिता वालावलकर यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे.
प्रश्न 5 – अंकिता वालावलकर यांचे लग्न झाले आहे का? (Ankita Prabhu Walawalkar married)
उत्तर -अंकिता वालावलकर या संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांसोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रश्न 6 – अंकिता प्रमोद वालावलकर त्यांचे वय किती आहे?
(Ankita pramod Walawalkar age)
उत्तर – अंकिता प्रमोद वालावलकर यांचे वय 29 आहे. (2024 मध्ये )