आयपीएस शिवदीप लांडे बायोग्राफी : IPS Shivdeep Lande wife, Family, Posting, Biography 2024 (Free)

आपण सर्वांनी सिंघम, दबंग चित्रपटात डॅशिंग पोलीस अधिकारी बघितले आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व बघून सर्वाना असे वाटते की खऱ्या आयुष्यात सुद्धा असे अधिकारी असावेत. समाजातील गुन्हेगारी कमी व्हावी. गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण व्हावी असे वाटत असते. म्हणूनच आजच्या या लेखातून चित्रपटातील डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याप्रमाणे आयुष्य असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या जीवनचरित्राचा आढावा घेणार आहोत. ते म्हणजे खऱ्या आयुष्यातील दबंग अधिकारी अशी ओळख असणारे आय. पी. एस. शिवदीप लांडे. यांची माहिती (IPS Shivdeep Lande wife, Family, Posting, Biography) घेणार आहोत.

शिवदीप वामनराव लांडे हे 2006 च्या बॅचचे बिहार कॅडरचे आय. पी. एस. अधिकारी आहेत. शिवदीप यांच्या कार्यशैलीने बिहारमध्ये लोकप्रिय पोलीस अधिकारी आहेत. नक्षलग्रस्त भागात पहिलीच पोस्टिंग झालेल्या शिवदीप यांचे नाव ऐकून नक्षलवादी, गुंड – गुन्हेगार यांना त्यांचे नाव ऐकून अक्षरशः घाम फुटतो. बिहार पोलीस प्रशासनात त्यांनी पोलीस अधीक्षक, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (DIG), पोलीस महानिरीक्षक (IG) यासारख्या महत्वाच्या पदावर काम केले आहे. असे दबंग अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांची माहिती आयपीएस शिवदीप लांडे बायोग्राफी (IPS Shivdeep Lande wife, Family, Posting, Biography) या लेखातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर जाणून घेऊया आय. पी. एस. शिवदीप वामनराव लांडे यांच्याविषयी…..

IPS Shivdeep Lande wife, Family, Posting, Biography
IPS Shivdeep Lande wife, Family, Posting, Biography

जन्म व शिक्षण 

29 ऑगस्ट 1976 रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात शिवदीप लांडे यांचा जन्म एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शिवदीप यांच्या वडिलांचे नाव वामनराव लांडे आहे. शिवदीप यांचे शालेय शिक्षण सरस्वती विद्यामंदिर, अकोला येथे झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्री. संत गजानन महाराज इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनियरिंगची (बी. टेक) पदवी मिळविली. शिवदीप यांचे प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न होते. त्यामुळे इंजिनियर असलेले शिवदीप नोकरी न करता यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी मुंबईला गेले. मुंबई मध्ये यूपीएससी परीक्षेची प्रचंड तयारी करून त्यांनी यश मिळविले.

सुरवातीला यूपीएससी मधून त्यांची IRS पदी म्हणजेच भारतीय महसूल सेवेसाठी निवड झाली. परंतु एवढ्यावर समाधान न मानता त्यांनी यूपीएससीची परीक्षा पुन्हा दिली आणि 2006 साली भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS पदी त्यांची निवड झाली. अशाप्रकारे प्रचंड मेहनत घेऊन एका सामान्य शेतकरी कुटुंबातील शिवदीप IPS अधिकारी झाले. 

विवाह 

2014 मध्ये शिवदीप यांनी ममता शिवतारे यांच्याशी विवाह केला. ममता शिवतारे या शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कन्या आहेत. ममता डॉक्टर असून त्या स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) आहेत. शिवदीप आणि ममता यांना एक मुलगी आहे. तिचे नाव अऱ्हा (Arhaa) असे आहे. (IPS Shivdeep Lande wife, Family, Posting, Biography)

प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कारकीर्द 

जयदीप यांची 2006 मध्ये IPS अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडेमी, हैद्राबाद येथे पार पडले. प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर बिहार कॅडर त्यांना मिळाले. त्यांना पहिलीच पोस्टिंग आव्हानात्मक मिळाली. बिहारमधील जमालपूर जे मुंगेर जिल्ह्यात असून नक्षल प्रभावित ठिकाण आहे. अशा ठिकाणी त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली. पहिलीच पोस्टिंग असताना देखील त्यांनी या ठिकाणी उल्लेखनीय काम केले. जवळपास दोन वर्षे त्यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून या ठिकाणी काम केले.

त्यानंतर त्यांची बदली पटना यां ठिकाणी झाली. पटना येथे त्यांनी पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यभार हाती घेतला. पटना येथे त्यांनी गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले. गुन्हेगारांना गजाआड केले. अक्षरशः गुन्हेगारांना शिवदीप यांचे नाव ऐकून घाम फुटत होता. त्याच याच कार्यशैलीमुळे त्यांची ओळख दबंग, सिंघम अशी निर्माण झाली. पटना नंतर त्यांनी अररिया, पूर्णिया या जिल्ह्यामध्ये देखील पोलीस अधीक्षक (SP) म्हणून काम केले. येथेही आपल्या कार्यशैलीने गुन्हेगारांवर वचक निर्माण करून लोकमानसात प्रिय पोलीस अधिकारी बनले.

त्यानंतर कोसी विभागाचे (मुझफ्फरपूर) येथील डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (D. I. G.) म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच पूर्णिया येथे इन्स्पेक्टर जनरल (पोलीस महानिरीक्षक) (I.G.) म्हणून काम केले. शिवदीप यांचे कॅडर जरी बिहार असले तरी त्यांनी महाराष्ट्रात देखील काम केले आहे. ममता शिवतारे यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे अर्ज करून महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार तीन वर्षासाठी महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिनियुक्ती देण्यात आली. महाराष्ट्रात त्यांनी दहशतवाद विरोधी पथकात (Anti Terrorist Squad) तसेच अमली पदार्थ विरोधी पथकात उत्तम असे काम केले. त्यानंतर शिवदीप पुन्हा बिहार मध्ये गेले. शिवदीप बिहारमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. लोक त्यांना दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखतात. (IPS Shivdeep Lande wife, Family, Posting, Biography)

Read More : Shivdeep Lande wife, Family, Posting, Biography

सामाजिक कार्य 

शिवदीप हे पोलीस सेवेत राहून समाजसेवा करत असले तरी वैयक्तिक पातळीवर देखील सामाजिक कार्यात पुढाकार घेतात. अहवालानुसार NGO ला मोठ्या प्रमाणात देणग्या देतात. ज्या NGO गरीब मुलींच्या विवाहासाठी मदत करतात तसेच वसतिगृहाची व्यवस्था करतात, कोचिंग क्लासेस चालवतात अशा NGO ला शिवदीप आपल्या पगारातील 60-70% रक्कम देणगी म्हणून देतात. (IPS Shivdeep Lande wife, Family, Posting, Biography)

राजीनामा 

शिवदीप यांनी सप्टेंबर 2024 मध्ये पूर्णियाचे इन्स्पेक्टर जनरल (पोलीस महानिरीक्षक) (I.G.) काम करत असतानाच राजीनामा दिला. वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु मीडियानुसार शिवदीप बिहार पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवरून नाराज होते. तसेच ते कोणत्याही परिस्थिती तत्वाशी तडजोड करत नाहीत. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जाते. राजीनामा दिला असला तरी आपण बिहार मध्येच राहून बिहारसाठीच काम करत राहू असे त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले.

अशाप्रकारे आयपीएस शिवदीप लांडे बायोग्राफी (IPS Shivdeep Lande wife, Family, Posting, Biography) या लेखात आपण शिवदीप लांडे यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. माहिती आवडली असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया द्या. अशीच माहिती मिळविण्यासाठी आणि वाचण्यासाठी pocketbiography.com सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेले रहा. तसेच तुम्हाला ज्या व्यक्तीबाबत माहिती हवी असेल ते आमच्यापर्यंत पोहचवा. त्यावर माहिती लिहून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न नक्की करू. धन्यवाद!!!

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1 – शिवदीप लांडे यांच्या वडिलांचे नाव (shivdeep lande father) काय आहे?

उत्तर – शिवदीप लांडे यांच्या वडिलांचे नाव (shivdeep lande father) वामनराव लांडे आहे.

प्रश्न 2 – शिवदीप लांडे यांची जन्मतारीख (shivdeep lande date of birth) काय आहे?

उत्तर – शिवदीप लांडे यांची जन्मतारीख (shivdeep lande date of birth) 29 ऑगस्ट 1976 आहे.

प्रश्न 3- शिवदीप लांडे यांच्या पत्नी (shivdeep lande wife)  कोण आहेत?

उत्तर – शिवदीप लांडे यांच्या पत्नी (shivdeep lande wife)  ममता शिवतारे यां आहेत. त्या शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्या कन्या आहेत.

प्रश्न 4- शिवदीप लांडे कोण आहेत?

उत्तर – शिवदीप लांडे 2006 च्या बॅचचे बिहार कॅडरचे आय. पी. एस. अधिकारी आहेत.

प्रश्न 5 – शिवदीप लांडे यांचे शिक्षण? (Shivdeep lande education)

उत्तर – शिवदीप लांडे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top