भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजकार्यात अग्रेसर असणारे एक महान व्यक्तिमत्व म्हणजे रतन टाटा होय. टाटा उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यामध्ये रतन टाटा यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच भारतीयांवर येणाऱ्या मोठ्या संकटांमध्ये मदतीचा हात पुढे करण्यातही ते अग्रेसर होते. त्यांच्या या सामाजिक व उद्योग क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण सारख्या पुरस्कारांनी गौरवित केले आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाचा जीवन प्रवास आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया रतन टाटा यांच्या विषयी (Ratan Tata Net worth, Age, Family, Biography)…..
प्रारंभिक जीवन
28 डिसेंबर 1937 रोजी रतन टाटा यांचा जन्म मुंबईमध्ये उद्योग विश्वात प्रसिद्ध असणाऱ्या टाटा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा असून ते एक प्रसिद्ध उद्योगपती होते. रतन टाटा यांच्या आईचे नाव सुनिता होते. रतन टाटा दहा वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले होते. त्यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांच्या आजीने म्हणजेच लेडीज नवज बाई टाटा यांनी केले. तसेच रतन टाटा यांच्या बंधूचे नाव जिम्मी टाटा आहे. रतन टाटा श्रीमंत कुटुंबातील असले तरी लहानपणापासूनच त्यांच्याकडे नेतृत्व आणि परोपकारासारखे गुण होते. त्यांच्या बालपणावर प्रकाश टाकला असता असे जाणवते की त्यांच्याकडे व्यावसायिक कौशल्य हे लहानपणापासूनच होते.
Buy Now : Ratan Tata Biography Book
शिक्षण
रतन टाटा यांनी त्याचे शालेय शिक्षण कॅथेड्रल आणि जॉन कॉमन स्कूल मधून तसेच चॅम्पियन स्कूल मधून पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रतन टाटा यांनी अमेरिकेतील कॉर्णेल विद्यापीठात प्रवेश घेतला. येथे त्यांनी आर्किटेक्चर मधून 1962 मध्ये पदवी मिळवली. त्यानंतर रतन टाटा यांनी व्यवस्थापनातील कौशल्य मिळविण्यासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूल मधून 1975 मध्ये व्यवस्थापना संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केला.
कारकीर्द (करियर)
कॉर्णेल विद्यापीठातून 1962 मध्ये पदवी मिळवल्यानंतर रतन टाटा हे भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी टाटा समूहामधील जमशेदपूर येथील टाटा स्टीलच्या कारखान्यात एका सामान्य कामगाराप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली. खरे पाहता ते प्रत्यक्ष व्यवस्थापन आपल्या हातात घेऊ शकत होते परंतु त्यांनी तसे न करता सामान्य कामगाराप्रमाणे काम केले. त्यांना या कामातून कंपनीच्या मूलभूत गोष्टींबाबत माहिती झाली तसेच त्यांना छोट्या गोष्टींपासून मोठा अनुभव मिळाला जो त्यांना पुढील काळात उपयोगी ठरला.
Read More About Rata Tata Networth
रतन टाटा यांची 1971 मध्ये टाटा समूहाच्या नॅशनल रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स (NELCO) कंपनीच्या प्रभारी संचालक पदी निवड करण्यात आली. परंतु आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कंपनीला यशस्वी करण्यात त्यांना अपयश आले. परंतु यातून खचून न जाता रतन टाटा यांनी व्यवसायातील विविध पैलू शिकून घेण्यास सुरुवात केली व त्याच दृष्टीने 1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूल मधून व्यवस्थापना संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केला. (Ratan Tata net worth)
टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष म्हणून कार्य
हळूहळू व्यवसायातील सर्व कौशल्य, पैलू समजून घेत रतन टाटा यांची जे आर डी टाटा यांच्यानंतर 1991 मध्ये टाटा समूहाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले त्यावेळी टाटा समूह विस्कळीत स्थितीत होता. त्यामुळे त्यांच्यासमोर टाटा समूह सुस्थितीत आणण्याचे आव्हान होते. अथक परिश्रमाने रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला यशस्वी दिशा दिली. त्यांनी टाटा उद्योग समूह आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवण्यास सुरुवात केली व जागतिक पातळीवरील नामांकित कंपन्या खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार 2000 मध्ये त्यांनी टेटली टी ही जगातील सर्वात मोठ्या चहा कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी टाटा चहा अंतर्गत खरेदी करून विलीन केली. त्यानंतर टाटा स्टील अंतर्गत पोरस स्टील ही डच स्टील कंपनी 2007 मध्ये खरेदी करून टाटा स्टील उद्योगातील सर्वात मोठी कंपनी बनवली.
तसेच 2008 मध्ये टाटा मोटर्स अंतर्गत फोर्ड कंपनीकडून जॅग्वार आणि लँड रोव्हर हे प्रसिद्ध कारचे ब्रँड खरेदी केले. त्याचप्रमाणे व्यवसायात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी 2009 मध्ये टाटा नॅनो ही गाडी मार्केटमध्ये आणली. अशाप्रकारे टाटा उद्योग समूहाला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देण्यामध्ये रतन टाटा यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानामुळेच आजही टाटा उद्योग समूह अग्रेसर आणि सुस्थितीत उभा आहे. सध्या टाटा उद्योग समूहाचे स्टील, ऑटोमोबाईल्स, तंत्रज्ञान, तसेच दैनंदिन ग्राहकोपयोगी वस्तू यांसारखे उद्योग आहेत. जवळपास 100 हून अधिक देशांमध्ये टाटा समूह व्यवसाय करत आहे. (Ratan Tata net worth)
रतन टाटा यांचे सामाजिक कार्य
उद्योगपती असणारे रतन टाटा यांच्याकडे लहानपणापासूनच परोपकारी वृत्ती असल्याचे पाहायला मिळते. ते कार्पोरेट सामाजिक जबाबदारीचे (CSR) पुरस्कर्ते होते. व्यावसायिकांनी समाजाच्या फायद्यासाठी कार्य केले पाहिजे असे त्यांचे मत होते. याच आधारावर रतन टाटा यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करण्याकडे ही लक्ष दिले होते. त्यांनी शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास यांसारख्या क्षेत्रात टाटा उद्योग समूहाच्या मार्फत समाजसेवेचे कार्य करण्यासाठी संस्था उभ्या केल्या.
त्यापैकी टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे काम करते. तसेच आरोग्य क्षेत्रात अत्यंत कमी खर्चात टाटा हॉस्पिटल वैद्यकीय सेवा पुरवते. तसेच ग्रामविकासासाठी ग्रामीण पायाभूत सुविधा विकसित करणे, स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे तसेच कृषी विकासासाठी टाटा ट्रस्ट मोठ्या प्रमाणात मदत करते. तसेच रतन टाटा यांनी आपल्या वैयक्तिक उत्पन्नातील बराचसा भाग सामाजिक कार्यासाठी दान केला होता. (Ratan Tata net worth)
प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
इतर कार्य
2012 मध्ये रतन टाटा समूहाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले. परंतु 2016 मध्ये कंपनीतील अंतर्गत वादानंतर रतन टाटा यांनी काही कालावधीसाठी पुन्हा अंतरीम अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यानंतर रतन टाटा यांनी भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. ज्या मधून नवीन तरुण उद्योजक यांना वाव मिळाला. उदाहरणार्थ पेटीएम, ओला, स्नॅपडील यांसारख्या कंपनीमध्ये ते सक्रिय गुंतवणूकदार होते. (Ratan Tata net worth)
संपत्ती (Net worth)
हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार रतन टाटा यांची एकूण संपत्ती 7900 कोटी इतकी होती. ते भारतातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या यादीत 350 व्या स्थानावर होते. त्यांचे या यादीत स्थान खाली असण्याचे कारण म्हणजे ते आपल्या उत्पन्नातील बराच मोठा वाटा दानधर्म करण्यासाठी वापरत होते. (Ratan Tata net worth)
पुरस्कार (Awards)
व्यावसायिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर असणारे रतन टाटा यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2008 मध्ये पद्मविभूषण या भारतातील द्वितीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच रतन टाटा यांना अनेक सामाजिक संस्थांकडून तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांकडून देखील पुरस्कार मिळाले होते.
निधन
रतन टाटा हे केवळ उद्योगपती नसून एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रदीर्घ काळ उद्योग क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. हे सर्व करत असताना त्यांना काही आजारांनी विळखा का घातला होता. त्याच आजारपणामुळे व वृद्धापकाळाने 9 ऑक्टोबर 2024 रोजी रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मुंबई येथील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात निधन झाले.
अशाप्रकारे आपण या लेखातून रतन टाटा यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर प्रतिक्रिया द्या. तसेच तुम्हाला कोणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्यावर नक्कीच काम करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद!!!
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1- मृत्यूसमयी रतन टाटा यांचे वय किती होते? (Ratan Tata Age)
उत्तर – रतन टाटा यांचे वय 86 होते. (Ratan Tata Age)
प्रश्न 2- रतन टाटा यांच्या पत्नीचे नाव काय? (Ratan Tata Wife)
उत्तर – रतन टाटा हे अविवाहित होते. (Ratan Tata Wife)
प्रश्न 3 – रतन टाटा यांच्या मुलाचे नाव काय? (Ratan Tata Son)
उत्तर – रतन टाटा अविवाहित असल्यामुळे कोणतेही अपत्य नव्हते. (Ratan Tata Son)
प्रश्न 4- रतन टाटा यांचे शिक्षण (Ratan Tata Education)
उत्तर – रतन टाटा यांनी अमेरिकेतील कॉर्णेल विद्यापीठातून आर्किटेक्चर मध्ये 1962 मध्ये पदवी घेतली होती. (Ratan Tata Education)
प्रश्न 5- रतन टाटा यांचा धर्म कोणता होता? (Ratan Tata Religion)
उत्तर – रतन टाटा हे पारसी धर्मीय होते. (Ratan Tata Religion)