अभिजीत सावंत बायोग्राफी: Abhijeet Sawant Wife, Daughter, Age, Networth, Biography 2024 (Free)

संगीत क्षेत्रात आपल्या आवाजाने जादू घडवून आणणारे, इंडियन आयडॉल सीजन 1 चे विजेते, मराठी बिग बॉस सीजन 5 चे उपविजेते स्पर्धक अभिजीत सावंत यांच्या विषयी (अभिजीत सावंत बायोग्राफी: Abhijeet Sawant Wife, Daughter, Age, Networth, Biography) या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. अभिजीत सावंत हे गायक, अभिनेते तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत. सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी येथील असलेले अभिजीत सावंत यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे. त्यांचा हा सर्व प्रवास आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया अभिजीत सावंत यांच्या विषयी……

Abhijeet Sawant Wife, Daughter, Age, Networth, Biography
Abhijeet Sawant Wife, Daughter, Age, Networth, Biography

प्रारंभिक जीवन

7 ऑक्टोबर 1981 रोजी अभिजीत सावंत यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीधर पांडुरंग सावंत आहे. तसेच त्यांच्या आईचे नाव मनीषा सावंत आहे. अभिजीत यांना एक बहीण आहे. तिचे नाव सलोनी राऊत (लग्नानंतर) आहे. सुरुवातीला अभिजीत यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. ते मुंबईतील माहीम परिसरात संयुक्त कुटुंबात राहत होते. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना खूप लवकर काम शोधावे लागले व त्यांनी काम करत त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. ते नेहमी भारतीय शास्त्रीय संगीत ऐकायचे व हळूहळू याच क्षेत्रात पाय रोवत उभे राहिले.

Abhijjet Sawant Daugheters
Abhijjet Sawant Daugheters

शिक्षण

अभिजीत सावंत यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले आहे की ते अभ्यासात फारसे हुशार नव्हते. तसेच त्यांना परीक्षेच्या वेळी ताण येऊन झटके यायचे. पण तरीही या सर्वांवर मात करत अभिजीत यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांचे शालेय शिक्षण दादर, मुंबई येथील राजा शिवाजी विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर वाणिज्य (कॉमर्स) शाखेतून चेतना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून त्यांनी पदवी घेतली. अभिजीत सावंत यांच्या गायनाच्या आवडीची सुरुवातही त्यांच्या शालेय जीवनातच झाली होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना गायन क्षेत्रात ठसा उमटविण्याचे त्यांनी प्रयत्न चालू केले.

सूरज चव्हाण यांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

करिअर

शालेय जीवनापासून गायनाची आवड असणाऱ्या अभिजीत यांनी संगीत क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले होते. परंतु सुरुवातीला त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे 600 रुपये प्रकारावर कॅसेटच्या दुकानात काम करावे लागले. पण त्यांनी गायनाची आवड सोडली नाही. ते त्यांच्या काकांसमवेत विविध स्टेज शोमध्येसहभागी होत असत. तसेच त्यांनी त्यांच्या काकांकडून संगीताचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. परंतु त्यांच्या पालकांचा मात्र यास फारसा पाठिंबा नव्हता. तरीही अभिजीत यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. त्यांनी भावदीप जयपुरवाले या त्यांच्या गुरूकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले. परंतु करिअरच्या सुरुवातीला त्यांना चांगले काम मिळत नसल्याने नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्याचा विचार केला होता असे अभिजीत यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

Buy : Biographical Books

अशा प्रकारच्या सुरुवातीचा संघर्ष करीत असताना त्यांच्या करिअरला एक सर्वात मोठा ब्रेक इंडियन आयडॉल सीजन 1 च्या रूपात मिळाला. 2004 मध्ये सुरू झालेला रियालिटी शो इंडियन आयडॉल मध्ये अभिजीत सावंत यांनी सहभाग घेतला व इंडियन आयडॉल सीजन 1 चे विजेतेपद सुद्धा पटकावले. त्यानंतर खऱ्या अर्थाने अभिजीत सावंत यांची संगीत क्षेत्रातील करिअरची सुरुवात झाली. इंडियन आयडॉलचा किताब जिंकल्यानंतर त्यांनी स्वतःचे संगीत अल्बम रिलीज करण्यास सुरुवात केली.

अभिजीत सावंत यांनी त्यांचा पहिला संगीत अल्बम 2005 मध्ये आपका अभिजीत सावंत हा रिलीज केला. या अल्बमने प्रचंड धुमाकूळ घातला. विशेषतः यातले लब्जो मे हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. या पाठोपाठ 2007 मध्ये जुनून हा दुसरा अल्बम घेऊन ते आले. यामधील मौला मेरे हे गाणे रसिकांच्या मनात घर करून बसले. यानंतर 2008 मधील उड जा काले कावा या गाण्याने तर रेकॉर्ड मोडले. संगीत अल्बम सोबतच अभिजीत यांनी संपूर्ण भारतात लाईव्ह स्टेज शो देखील करण्यास सुरुवात केली. तसेच चित्रपटांसाठी पार्श्वगायन करण्यासही सुरुवात केली.

अंकिता वालावलकर यांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संगीत क्षेत्रात छाप पाडल्यानंतर अभिजीत यांनी अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावले. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या लॉटरी या चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. तसेच टीव्ही सिरीयल मध्ये ही त्यांनी काम केले आहे. अभिनय – संगीत क्षेत्राव्यतिरिक्त टीव्हीवरील बऱ्याच रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून ते सहभाग घेतात. यापैकी 2008 मधील जो जीता वही सुपरस्टार या शोमध्ये अभिजीत रणर अप होते. तसेच एशियन आयडॉल या शोमध्ये उपविजेते होते. त्यांनी कॉमेडी सर्कस या कार्यक्रमातही भाग घेतला होता. तसेच अभिजीत सावंत यांनी नच बलिये या शोमध्ये आपल्या पत्नीसोबत सहभाग नोंदविला होता. युवकांना आकर्षित करण्यासाठी अभिजीत यांनी राजकीय क्षेत्रात येण्यासाठी शिवसेनेत प्रवेश देखील केला होता पण काही कारणास्तव ते राजकीय क्षेत्रातून बाहेर पडले.

अशाप्रकारे अभिजीत यांच्या करिअरचा आलेख उंचावत असताना त्यात मराठी बिग बॉसच्या रूपाने आणखी भर पडली आणि अभिजीत सावंत यांची प्रसिद्धी प्रचंड वाढली. (Abhijeet Sawant Big Boss) अभिजीत मराठी बिग बॉस सीजन 5 मधील उपविजेते आहेत. या शोमुळे अभिजीत यांच्या करिअरमध्ये चार चांद लागले व ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. त्यांचा स्वभाव व वर्तन हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. (अभिजीत सावंत बायोग्राफी: Abhijeet Sawant Wife, Daughter, Age, Networth, Biography)

रिलेशनशिप

अभिजीत सावंत हे विवाहित आहेत. त्यांचा 2007 मध्ये शिल्पा एडवणकर यांच्यासोबत विवाह झाला आहे. (Abhijeet Sawant Wife) शिल्पा यांचा अस्मि या नावाने केकचा उद्योग आहे. अभिजीत सावंत यांना समीरा सावंत आणि आहाना सावंत या दोन मुली आहेत. त्यांच्या मुली त्यांना प्रेमाने डड्डा म्हणतात.

Abhijeet Sawant Wife
Abhijeet Sawant Wife

संपत्ती (Networth)

काही अहवालानुसार सुरुवातीला आर्थिक टंचाईचा सामना करणारे अभिजीत सावंत हे करोडपती आहेत. रियालिटी शो, चित्रपट, संगीत शो, स्टेज शो, ब्रँड प्रमोशन इत्यादी त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. अभिजीत सावंत यांच्या पत्नी यांचा देखील उद्योग आहे. (Abhijeet Sawant Wife) अभिजीत यांचे मुंबईमध्ये स्वतःचे एक घरही आहे. त्यांच्याकडे एक स्कोडा कार तसेच एक बुलेट बाईक सुद्धा आहे. मुंबईमध्ये त्यांचे स्वतःचे एक घरही आहे.

Read More about Abhijeet Sawant Wife

सोशल मीडिया

अभिजीत सावंत हे सोशल मीडिया वरती सुद्धा प्रचंड ऍक्टिव्ह असतात. त्यांचे इंस्टाग्राम वरती एक अकाउंट ही आहे. त्यामध्ये लाखोंमध्ये त्यांची फॅन फॉलोविंग आहे. तसेच अभिजीत सावंत यांनी 2018 मध्ये स्वतःचा एक यूट्यूब चैनल देखील सुरू केला आहे. यावरती ते स्वतःच्या गाण्यांचे व्हिडिओ पोस्ट करत असतात. अभिजीत सावंत यांचा यूट्यूब चैनल पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

अभिजीत सावंत यांचे प्रसिद्ध अल्बम व गाणी (Abhijeet Sawant Famous Song)

  1. आपका अभिजीत सावंत (संगीत अल्बम)
  2. जुनून (संगीत अल्बम)
  3. फरीदा (संगीत अल्बम)
  4. फकीरा (संगीत अल्बम)
  5. मर जावा मिट जावा (आशिक बनाया आपने चित्रपट)
  6. याद तेरी याद
  7. हॅप्पी एंडिंग ( तीस मार खान चित्रपट)
  8. सर सुखाची श्रावणी ( मंगलाष्टक वन्स मोअर चित्रपट)
  9. ये ना (बाजी)
  10. हमे तुमसे प्यार कितना
  11. तुम हो नज्म हमारी

अशाप्रकारे आपण या लेखातून अभिजीत सावंत यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. अभिजीत सावंत यांची माहिती आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर प्रतिक्रिया द्या. तसेच तुम्हाला कोणाची माहिती जाणून घेण्यास आवडेल हे आम्हाला कळवा. आम्ही त्यावर नक्कीच काम करू आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद!!!

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)


प्रश्न 1 – अभिजीत सावंत यांचे वय (Abhijeet Sawant Age) किती आहे?
उत्तर – अभिजीत सावंत यांचे वय (Abhijeet Sawant Age) 43 (2024 मध्ये) आहे.


प्रश्न 2 – अभिजीत सावंत यांच्या पत्नी (Abhijeet Sawant Wife) कोण आहेत?
उत्तर – अभिजीत सावंत यांच्या पत्नी (Abhijeet Sawant Wife) शिल्पा एडवणकर सावंत या आहेत.

प्रश्न 3 – अभिजीत सावंत यांच्या बहिणीचे (Abhijeet Sawant Sister) नाव काय आहे?
उत्तर – अभिजीत सावंत यांच्या बहिणीचे (Abhijeet Sawant Sister) नाव सलोनी राऊत (लग्नानंतर) आहे.


प्रश्न 4 – अभिजीत सावंत यांच्या मुलींची (Abhijeet Sawant Daughter) नावे काय आहेत?
उत्तर – अभिजीत सावंत यांच्या मुलींची (Abhijeet Sawant Daughter) नावे समीरा आणि आहाना आहेत.

प्रश्न 5 – अभिजीत यांनी कोणत्या वर्षी इंडियन आयडॉलचे विजेतेपद मिळवले होते? (Abhijeet Sawant Indian Idol Year)

उत्तर – अभिजीत यांनी 2004-05 या वर्षी इंडियन आयडॉलचे विजेतेपद मिळवले होते? (Abhijeet Sawant Indian Idol Year)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top