Atishi Marlena History, Husband, Family, Career : आतिशी मार्लेना इतिहास, पती, कुटुंब, करिअर 2024 (Free)

सध्या राजकारणामध्ये एक नाव चर्चेत आहे. आणि 2019 पासून 2024 पर्यंत अवघ्या पाच वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारण्याचे काम केले आहे. ती म्हणजे दिल्लीच्या तिसऱ्या आणि भारतातील सोळाव्या महिला मुख्यमंत्री आतिशी मार्लेना होय. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आतिशी यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. या आधी त्या अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी होत्या. 2019 पासून सक्रिय राजकारणात असणाऱ्या आतिशी याआधी आम आदमी पार्टीच्या थिंक टॅंक म्हणून काम करत होत्या. तसेच त्यांनी सात वर्षे समाजसेवेचे कार्यही केले आहे. त्या 2020 मध्ये कालकाजी मतदार संघातून आमदार झाल्या आहेत. (Atishi Marlena History)

आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की नक्की आतिशी मार्लेना कोण आहेत? तसेच त्यांच्या बाबतच्या इतरही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. (Atishi Marlena History, Husband, Family, Career) चला तर जाणून घेऊया आतिशी मार्लेना यांच्या विषयी……

Atishi Marlena History
Atishi Marlena History, Family, Career

प्रारंभिक जीवन

आतिशी मार्लेना यांचा जन्म 8 जून 1981 रोजी दिल्ली येथे झाला. यांच्या वडिलांचे नाव डॉ. विजय सिंग असून ते पंजाबी आहेत. त्यांचे वडील दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होते. तसेच आतिशी यांच्या आईचे नाव डॉ. तृप्ता वाही असून त्या राजपूत आहेत. त्या ही दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या आई-वडिलांवर डाव्या विचारसरणीचा प्रभाव असल्याने कार्ल मार्क्स आणि लेनिन मला दोन साम्यवादी विचारांच्या व्यक्तिमत्त्वांची नावे एकत्र करून मार्लेना असे नाव आतिशी यांचे ठेवण्यात आले व आतिशी मार्लेना असे नाव तयार केले. म्हणजेच त्यांचे पूर्ण नाव आतिशी मार्लेना विजय सिंग असे झाले. पंजाबी राजपूत कुटुंबात वाढलेल्या आतिशी त्यांचे पालन पोषण दिल्ली येथे झाले.

शिक्षण

लहानपणापासून दिल्ली येथे वाढलेल्या आतिशी शालेय शिक्षण नवी दिल्ली येथील स्प्रिंगडेल्स स्कूल मधून पूर्ण झाले. त्यानंतर आतिशी यांनी दिल्ली येथील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून 2001 मध्ये इतिहास विषयात पदवी प्राप्त केली. पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांना चेवनिंग स्कॉलरशिप मिळाली. या स्कॉलरशिपच्या आधारावर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि येथून 2003 मध्ये त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर रोड्स स्कॉलर म्हणून त्यांनी 2005 मध्ये दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली. (Atishi Marlena History, Husband, Family, Career)

प्रसिद्ध व्यक्तीची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विवाह

समाज माध्यमे तसेच प्रकाश झोतापासून दूर असणारे प्रवीण सिंह यांच्यासोबत आतिशी यांनी विवाह केला आहे. प्रवीण सिंह हे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी आय.आय.टी. दिल्ली मधून आणि आय. आय. एम. अहमदाबाद येथून शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी जवळपास आठ वर्षे कार्पोरेट क्षेत्रात काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी समाज सेवा करण्यासाठी NGO सोबत ही काम सुरू केले. NGO सोबत काम करत असतानाच आतिशी आणि प्रवीण यांची ओळख झाली होती. 2007 ते 2012 च्या दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आजही प्रवीण सामाजिक सेवेत सक्रिय आहेत. परंतु ते प्रकाश झोतापासून दूर असतात.

करियर

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आतिशी यांनी शिक्षिका म्हणून काम सुरू केले. त्या आंध्रप्रदेश मधील ऋषी व्हॅली या शाळेत इतिहास आणि इंग्रजी विषय शिकवीत होत्या. तसेच त्यांनी समाज सेवा करण्यासाठी मध्यप्रदेश मधील एका छोट्या गावात सात वर्षे काम केले आहे. तेथे त्यांनी NGO सोबत मिळून जैविक शेती आणि प्रगतिशील शिक्षण यासाठी मोलाचे काम केले होते. हे काम करत असतानाच त्या आम आदमी पार्टीच्या विचारांच्या लोकांच्या संपर्कात आल्या. व आम आदमी पार्टीच्या सुरुवातीपासूनच त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. परंतु त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. त्या फक्त आम आदमी पार्टीची थिंक टॅंक म्हणून काम करत होत्या.

Buy : Atishi Marlena Biography Book

2013 साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाहीरनामा तयार करण्यासाठी असणाऱ्या मसुदा समितीच्या सदस्या म्हणून त्यांनी काम केले. तसेच आम आदमी पक्षातील इतर नितिगत धोरणे ठरवण्यामध्येही आतिशी यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांनी दिल्लीतील शैक्षणिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि उपाययोजना राबविण्यासाठी खुशी हा पाठ्यक्रम सुरू करण्यात मोलाची भूमिका बजावली. (Atishi Marlena History, Husband, Family, Career)

राजकारणात सक्रिय प्रवेश

आम आदमी पार्टीच्या नीतिगत बाबींवर काम करत असतानाच 2019 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची आतिशी यांना संधी मिळाली. पूर्व दिल्ली या मतदारसंघातून भाजपच्या गौतम गंभीर यांच्या विरोधात त्यांना आम आदमी पार्टीकडून लोकसभेचे तिकीट मिळाले. परंतु या निवडणुकीत आतिशी यांना यश मिळाले नाही. यानंतर लगेचच पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत कालकाजी मतदार संघातून आतिशी पुन्हा उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत विजय मिळवून आतिशी या दिल्ली विधानसभेच्या सदस्या (आमदार) झाल्या. 2023 मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळाले. आतिशी यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. सध्या त्यांच्याकडे महिला व बालविकास, शिक्षण, पर्यटन, कला, संस्कृती व भाषा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज हे खाती आहेत. आतिशी या उच्च विद्याविभूषित असणाऱ्या मंत्र्यांपैकी एक आहेत.

आतिशी यांची नुकतीच सप्टेंबर 2024 मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे व यासोबतच त्या देशातल्या सोळाव्या महिला मुख्यमंत्री आणि दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यांच्या प्रगतीचा आलेख 2019 ते 2024 या पाच वर्षात झपाट्याने वाढलेला दिसून येतो. पाच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली ही एक विशेष बाब आहे.

आतिशी आडनाव का लावत नाहीत?

आतिशी या फक्त पहिलेच नाव लावतात. कारण यामागे 2018 मधील निवडणुकीच्या वेळी घडलेली घटना कारणीभूत आहे. कारण मार्लेना या त्यांच्या नावाचा वापर विरोधक अपप्रचारासाठी करतील म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे त्या आपल्या नावापुढे काहीही न लावता फक्त आतिशी एवढेच नाव सांगतात.

Read More : Atishi Marlena History

संपत्ती (Networth)

अहवालानुसार ( निवडणूक विवरण पत्रकानुसार) आतिशी यांच्याकडे 1.41 कोटींची संपत्ती आहे. यापैकी 65 हजार रोख स्वरूपात आणि जवळपास एक कोटी रुपये गुंतवणुकीच्या स्वरूपात आहेत. (वरील माहिती स्त्रोतांच्या आधारे घेण्यात आली आहे. यामध्ये बदल असू शकतात.) (Atishi Marlena History, Husband, Family, Career)

अशाप्रकारे आपण या लेखातून आतिशी मार्लेना यांची माहिती घेण्याचा (Atishi Marlena History, Husband, Family, Career) प्रयत्न केला आहे. ही माहिती सर्वांना आवडली असेल अशी आशा आहे. तसेच तुम्हाला कोणत्या व्यक्तीबाबत जाणून घ्यायला आवडेल ते आमच्यापर्यंत पोहचवा. त्यावर Pocketbiography.Com ची टीम  नक्की काम करेल. त्यावरती लेख लिहून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तसेच ब्लॉगवरील इतर ही व्यक्तींची चरित्र वाचून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा राहील. धन्यवाद!!!

 सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1 – आतिशी यांचे पूर्ण नाव काय आहे?

उत्तर – आतिशी यांचे पूर्ण नाव आतिशी मार्लेना सिंग असे आहे.

प्रश्न 2 – आतिशी यांचे पती कोण आहेत? (Atishi mariena husband)

उत्तर – आतिशी यांचे पती प्रवीण सिंग आहेत. ते एक संशोधक व समाजसेवक आहेत.(Atishi mariena husband)

प्रश्न 3- आतिशी यांचे शिक्षण काय झाले आहे?

उत्तर – आतिशी यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

प्रश्न 4 – आतिशी यांचा जन्म कधी झाला?

उत्तर – आतिशी यांचा जन्म 8 जून 1981 रोजी दिल्ली येथे झाला.

प्रश्न 5 – आतिशी यांच्या नावामागचा इतिहास काय आहे? (Atishi Marlena History)

उत्तर – वरील लेखातील प्रारंभीक जीवन आणि आतिशी आडनाव का लावत नाहीत? हे मुद्दे पहावेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top