महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती : Mahatma Phule Information in Marathi 2024 (Free)

Mahatma Phule Information in Marathi
Mahatma Phule Information in Marathi

 पुर्ववृत्तांत

आधुनिक भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे अग्रदूत व सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे पहिले आद्य सुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने आणि आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी घडवले होते.त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता.सामाजिक विषमते विरुद्ध जोतिबांनी बंड पुकारले आणि समतेसाठी शुद्रातिशूद्रांना संघटित करण्याचे प्रयत्न केले. ‘ शिक्षण व समता ‘या दोनच शब्दात त्यांच्या कार्याचे येथोचित वर्णन करता येते. ते नुसते बोल घेवढे सुधारक नव्हते तर ते कर्ते समाज सुधारक होते. (Mahatma Phule Information in Marathi)

बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अविरत झगडणारे ते ऋषी होते. समाजातील अनेक अनिष्ट-रूढी-परंपरा यांना विरोध करत त्यांनी प्रत्येक बाबींच्या मुळाशी जाऊन चिंतनशीलपणे विचार केला. पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराष्ट्राला,सामाजिक प्रबोधनाला एक वेगळी दिशा दाखविली. स्त्रियांच्या व अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ते चंदनासारखे झिजले. त्यांच्या कार्यात अनेकांनी विघ्न आणली. परंतु ते आपल्या ध्येयापासून कधीच विचलित झाले नाहीत म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हटले जाते.

Buy: Mahatma Jyotiba Phule Biography Books

महात्मा फुलेंचे कुळ व जन्म :-

महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावचे होते. त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे हे होते. ते जातीने क्षत्रिय माळी होते. त्यांच्या घराण्याला कटगुणचे चौगुले हे वतन होते. बारा बलुतेदारांपैकी चौगुले हे एक होते. त्यांचे पंजोबा कोंडाजी गोऱ्हे यांचे गावातील कुलकर्णी या वतनदारांची भांडण झाले आणि त्यांनी त्या कुलकर्णीचा खून केला. म्हणून त्यांना कटगुण हे गाव सोडावे लागले. त्यांनी पुरंदर तालुक्यातील खानवडी या गावी स्थलांतर केले. तेथे आपला चांगला जम बसविला त्यांना एक मुलगा होता. त्याचे नाव शेटिबा होते. हा बोळसट व उधळा होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची स्थिती अत्यंत वाईट झाली. परिणामी शेटीबांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुन्हा या कुटुंबाने स्थलांतर केले व ते पुण्याला आले.

शेटिंबांना तीन मुले होती. राणोजी, कृष्णा व गोविंदा अशी त्यांची नावे होती. यांनी प्रारंभी शेळ्या राखण्याचे कार्य केले. त्यांच्या धन्याने त्यांचा प्रामाणिकपणा,हुशारी व कष्टाळूपणा पाहून त्यांना फुलांचा व्यवसाय शिकविला. त्यांनी त्या व्यवसायात चांगलाच नावलौकिक मिळाविला त्यामुळे गोऱ्हे हे उपनाव मागे पडून फुले हे नाव पुढे आले. या तिघांची कीर्ती पेशव्यांच्या कानावर गेली. पेशव्यांनी त्यांना खाजगीत फुले घालण्याचे काम दिले व 35 एकर जमीन इनाम म्हणून दिली. (Mahatma Phule Information in Marathi)

शेटिंबांच्या मृत्यूनंतर रानोजी ने आपल्या दोन बंधूंना बाजूला सारून 35 एकर इनाम जमीन जमीन आपल्या नावे केली त्यामुळे कृष्णा व गोविंदा यांना पुन्हा वाईट दिवस आले त्यांनी पूर्वीप्रमाणे चिकाटीने व सचोटीने आपला फुलाचा धंदा चालविला भाजीपाला विक्रीचे दुकान ही सुरू केले यावेळी गोविंदाचा चिमणाबाईची विवाह झाला त्यांच्या पोटीच अकरा एप्रिल 827 मध्ये ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला मात्र त्यांचे वय एक वर्षाचे लहान असतानाच चिमणाबाईंचा मृत्यू झाला परिणामी लहान जोतिबांचा सांभाळ गोविंदरावांच्या मावस बहिणी मावस बहिणी सगुनाबाईंनी केला.

जोतीराव फुलेंचे शिक्षण:-

ईस्ट इंडिया कंपनीच्या 1813 च्या संनदेनुसार भारतात प्रथम सर्वांसाठी शिक्षण खुले झाले. 1824 मध्ये ख्रिस्ती धर्मपोदेशकांनी पुण्यात पहिली मराठी शाळा सुरू केली. तेथे वयाच्या सातव्या वर्षी ज्योतिरावांना त्यांच्या वडिलांनी शाळेत दाखल केले आणि शिक्षण सुरू झाले. सनातनी ब्राह्मणी वर्गातील लोक माळ्याचा मुलगा शिक्षण घेतो आहे हे पाहून त्याचा तिरस्कार करू लागले. बुद्धिभ्रष्ट व बुद्धिब्रम करणाऱ्या लोकांनी गोविंदरावांचा बुद्धिब्रम केला. परिणामी जोतिबाला शाळेतून काढण्यात आले आणि शिक्षणात खंड पडला. नंतर तेराव्या वर्षी त्यांचा विवाह धनकवडीच्या झगडे पाटील घराण्यातील सावित्रीबाई या कन्याशी झाला.

जोतिबांची चिंतनशीलता व बौद्धिक कौशल्य पाहून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिंट साहेब यांनी त्यांचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी गोविंदरावांकडे आग्रह धरला.परिणामी 1841 मध्ये एका स्कॉटिश मिशनरी शाळेत ज्योतिबा फुले जाऊ लागले. उत्साही महत्त्वाकांक्षी व उद्योगी फुल्यांनी ब्राह्मण जगतातील विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षण घेतले. अशाच काही ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांची मैत्री जमली. मिशनऱ्यांच्या मानवतवादी भूमिकेमुळेच समाजातील चालत आलेल्या अनिष्ट,प्रथांना अर्थ लावण्याचा प्रयत्न फुल्यांनी केला. आणि बुरसटलेल्या विचारांची,अज्ञानाची पकड,विचार क्रांती घडवून आणण्यास प्रेरक ठरली. राजकीय व सामाजिक गुलामगिरी बद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण झालेली होतीच. (Mahatma Phule Information in Marathi)

अशावेळी लहुजी बुवा मांग यांच्याकडून,अस्पृश्य समाजातील व्यक्तींच्याकडून दानपट्टा नेमबाजीचे शिक्षण घेतले.परंतु पाच-पन्नास लोकांचा उल्लडबाजीतून ब्रिटिशांचे राज्य नष्ट होणार नाही. याची जाणीव महात्मा फुलेंना झाली. तेव्हा महात्मा फुलेंनी शैक्षणिक सुधारणा घडवून आणून नंतर समाज सुधारेल व ब्रिटिश सत्ता विरुद्ध आंदोलन उभे करेल आणि स्वतंत्र राज्य निर्माण करेल. ही आशा मनात ठेवली.प्रथम समाजातील जातीयता,अज्ञान विषमता हे दूर करण्यासाठी शिक्षणाला महत्त्व दिले. ब्राह्मण वर्गातील लोकांनी स्वीकारलेल्या अनेक अनिष्ट,रूढी,परंपरा यामध्ये समाज खितपत पडला होता. अशाच एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला महात्मा ज्योतिबा फुले गेले असताना त्यांचा अपमान केला. समाजातील या विषमतेबद्दल त्यांच्या मनात चीड उत्पन्न होऊन त्यांनी सामाजिक न्यायासाठी,समता निर्माण करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे असा निर्धार केला. आणि धर्माज्ञा मोडून पुरोगामीत्व स्वीकारले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महात्मा ज्योतीराव फूले यांचे कार्य

 1)स्त्री उद्धाराचे कार्य

 a) स्त्रीशिक्षण

उच्चवर्णी यांच्या प्रतिगामी वृत्तीला धक्के देण्यासाठी त्यांनी सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे बारकाईने अवलोकन केले व इतर धर्मांचाही बारकाईने अभ्यास केला. त्यातील मानवतावादी तत्त्वज्ञानाने ते भारावून गेले. लोकसेवेचा निश्चय करून अज्ञान,अंधकार दूर करण्यासाठी शिक्षण हा सूर्यप्रकाश आहे. हे जाणून शिक्षण हाच प्रभावी मार्ग आहे .हे ओळखले स्त्रियांना व शूद्र यांना शिक्षणाची दरवाजे खुली करण्याचा निर्णय घेतला. “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी” या उक्तीप्रमाणे त्यांनी पुण्यामध्ये भिडेंच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा 1848 मध्ये सुरू केली. मुलींच्या शिक्षणाची सोय केली. त्यावेळी समाजात ब्राह्मण्य प्रवृत्तीच्या लोकांनी विषमता, जातीभेद,अज्ञान, स्त्रीदास्यत्व यासारख्या अनिष्ट प्रथा दृढ करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे समाजात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला होता. हिंदू स्त्रियांना या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची व्यवस्था सुरू केली.

 विद्येविना मती गेली़, मतीविना नीती गेली।

 नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले।

 वित्तविना शुद्र खुचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले।

महात्मा ज्योतिराव फुले म्हणत असत. “एक स्त्री शिकली तर एक कुटुंब शिकल्यासारखे आहे ” स्त्री शिक्षणाची सुरुवात करून केवळ चूल आणि मूल एवढेच तिचे कार्यक्षेत्र नाही. हे जगाला दाखवून दिले. समाजात यावेळी बालविवाह, जरठ,कुमारविवाह यांच्या प्रथा असल्यामुळे विधवांची स्थिती अत्यंत सोचनीय होती. अशा स्त्रियांना समाजात शिक्षण दिले तरच स्थान मिळू शकेल आणि कुकर्म करणाऱ्या व्यक्तीला विरोध करतील. या भूमिकेतून स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. (Mahatma Phule Information in Marathi)

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाळेतील मुलींना शिकविण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईंना प्रथम शिकविले. आणि त्यांनी शाळेतील असणाऱ्या मुलींना शिक्षण देण्याचा यशस्वीरीत्या प्रयत्न केला. सनातनांनी फुले दांपत्यांना समाजद्रोही ठरवले आणि सावित्रीबाईंच्या अंगावर चिखल फेकणे, घाण फेकणे, दगड मारणे, शिव्या देणे यासारख्या प्रकारे त्रास दिला. मात्र या माऊलीने हा ही त्रास सहन करून आपल्या पतीच्या कार्यात खांद्याला खांदा लावून कार्य केले. सनातनी ब्राह्मण्य प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गोविंदरावांचे कान भरले. तेव्हा फुले दांपत्यांनी घर सोडले मात्र पुरोगामी विचार सोडला नाही. नेटाने हे शैक्षणिक कार्य चालू ठेवले. सर्वसामान्य समाजातील वर्गाला, बहुजन समाजाला ज्ञानाचे दरवाजे उघडण्याचे क्रांतिकारक कार्य हे ज्योतिराव फुले यांनी खऱ्या अर्थाने केल्यामुळेच आज पुरोगामी महाराष्ट्रात बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळाले.

पहिली मुलींची शाळा बंद पडली परंतु नाउमेद न होता त्यांनी इसवी सन 1851 मध्ये बुधवार पेठेत दुसरी मुलींची शाळा सुरू केली. 1851 मध्येच रास्ता पेठेत तिसरी व 1852 मध्ये वेताळपेटीत चौथी मुलींची शाळा सुरू केली. आपल्या मित्रांच्या सहाय्याने एक कार्यकारी समिती नेमली. त्यात अनेक मान्यवर व्यक्ति घेतल्या. ऐतदेशीय व युरोपीय लोकांनी प्रारंभापासून सर्व प्रकारचे सहाय्य केले. परिणामी सरकारनेही या कार्याला यथाशक्ती सहकार्य केल्याने फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यास मोठा प्रतिसाद मिळाला. या त्यांच्या कार्याचा सत्कार विश्रामबाग येथे लोकांनी केला. ज्योतीरावांनी स्त्रीशिक्षणाला महाराष्ट्रात एक वेगळी परंपरा व दिशा लावून दिली. (Mahatma Phule Information in Marathi)

b) विधवा पुनर्विवाह :-

महात्मा ज्योतिराव फुले ब्राह्मण दृष्टे होते असे म्हटले जाते.परंतु ते ब्राह्मण्य प्रवृत्तीच्या विरोधात होते. हे सिद्ध होते कारण विधवा स्त्रियांना पाहून, त्यांचे हाल पाहून त्यांचे मन व्याकूळ होत असे. या स्त्रियांचे हाल थांबावेत, त्यांच्या जीवनाला चांगले वळण लागावे म्हणून ज्योतिराव फुले यांनी विधवा पुनर्विवाहाचा धडाडीने पुरस्कार केला. इसवी सन 1864 मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत एक विधवा पुनर्विवाह घडवून आणला. (Mahatma Phule Information in Marathi)

 c) बालहत्या प्रतिबंधक गृह:-

विधवा पुनर्विवाहाची सुधारणा त्याकाळी समाजाच्या पचनी पडेना. एखाद्या विधवेचे चुकून वाकडे पाऊल पडले तर तिची वाईट अवस्था होई. अशा विधवा पतीतांना त्याकाळी भ्रूणहत्या,आत्महत्या याशिवाय दुसरे पर्याय नव्हते. आशा अपत्तीतून विधवांची सुटका व्हावी. या हेतूने महात्मा जोतीराव फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केले. इसवी सन 1863 मध्ये आपल्या घराशेजारी बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केले व विधवांना येते गुप्तपणे बाळंत होण्यासाठी आणि आपले मूल तेथे ठेवण्यासाठी पत्रके वाटली, भितीपत्रके वाटली. त्यात ते म्हणतात “विधवांना येथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा, तुम्ही आपले मूल न्यावे किंवा ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून आहे.” त्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल.

हे ज्योतिरावांनी सुरू केलेले बालहत्या प्रतिबंधक ग्रह भारतातील पहिलेच होते. याच प्रतिबंधक गृहातील एका ब्राह्मण काशीबाई या स्त्रीपासून झालेले मूल महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत ठेवले. त्याला शिकविले तोच पुढे डॉक्टर यशवंत झाला. डॉक्टर यशवंतने व सावित्रीबाई फुलेंनी प्लेगच्या साथीत पुणेकरांची सेवा केली.यातच सावित्रीबाई व डॉ. यशवंतचा पुढे मृत्यू झाला. (Mahatma Phule Information In Marathi)

प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

2)अस्पृश्यांच्या उध्दाराचे कार्य :-

महाराष्ट्रात अस्पृश्यता ही वंशपरंपरेने चालत आलेली अत्यंत वाईट प्रथा होती. ती 19 व्या शतकात अत्यंत तीव्र बनली होती. उच्च वर्णीयांच्याकडून अस्पृश्यांना अत्यंत हीनपणे वागवले जात होते. समाज जीवनात त्यांना कोणतेही स्थान नव्हते. अस्पृश्यांना गावाच्या बाहेर राहावे लागत होते. त्यांचा जन्म आणि मृत्यू हा दारिद्र्यातच होत असे. अशा समाजाला सकाळ आणि संध्याकाळ गावातून फिरण्यास मज्जाव असे. साधे रस्त्यावर थुंकणे सुद्धा त्यांना मनाई होती. एखाद्या अस्पृश्य समाजातील व्यक्तीचा स्पर्श झाला तर तो विटाळ मानला जाई. मात्र अशा लोकांच्याकडुन अत्यंत हीन कामे करून घेतली जात असत.विद्यार्जनाचा अधिकार तर त्यांना नव्हताच. त्यामुळे हा समाज अज्ञान  अंधकरात पिचत पडलेला होता.अशा सर्व बाजूंनी उपेक्षित असणारा अस्पृश्य समाज जीवन जगत होता.

या समाजाला अज्ञान,निरक्षरता यामधून दूर करण्यासाठी तसेच गुलामगिरीच्या जाचातून मुक्त करण्यासाठी कार्य हाती घेतले. त्यांच्या हाती पुस्तके दिली. वर्णव्यवस्था हा हिंदू धर्माला लागलेला एक कलंक आहे. तो दूर करण्याचे कार्य महात्मा जोतीराव फुले यांनी केले.म्हणूनच त्यांना सामाजिक समतेच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते. अस्पृश्यता ही सामाजिक जीवनातील लाजिरवाणी बाब आहे. अशा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी शिक्षण या प्रभावी माध्यमाचा प्रचार व प्रसार केला अतिशूद्रातील शूद्र यांना शिक्षणाकडे आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी इसवी सन 1852 मध्ये अस्पृश्यासाठी वेताळ पेठेत स्वखर्चाने एक शाळा सुरू केली तर 1853 मध्ये आपल्या काही होतकरू मित्रांच्या साह्याने महार,मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविण्याकरता मंडळी नावाची संस्था सुरू केली.

त्यांच्या या कार्यास युरोपियन ऐतदेशीय यांनी सहकार्य केले .दक्षिणा प्राईज फंडातून आर्थिक सहकार्य मिळाले. 1858 पर्यंत या संस्थेने पुण्यात तीन शाळा सुरु केल्या. फुलेंनी अस्पृश्य समाजावर गुलामगिरी हा ग्रंथ लिहून उच्चभ्रू जातीवर कटोर टीका केली.हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या लोकांना अर्पण केला. (Mahatma Phule Information in Marathi)

3)सत्यशोधक समाजाची स्थापना :-

हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी,परंपरा,प्रथा या लोकांना समजाव्यात नेमकं आपला धर्म, आपले तत्त्वज्ञान,साहित्य,इतिहास इत्यादी विषयी चिकित्सक पद्धतीने विवेचन लोकांच्यात व्हावे या हेतूने आणि सामाजिक सुधारणेसाठी शुद्राती शूद्रांची स्थिती सुधारणेसाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना इसवी सन 1873 मध्ये केली. धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे हे या समाजाचे मुख्य उद्दिष्ट ठेवले ‘सार्वजनिक सत्यधर्म’ व ‘गुलामगिरी’ या दोन ग्रंथात ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाबद्दलचे आपले विचार मांडले आहेत.

यामध्ये महात्मा जोतीराव फुले म्हणतात “सर्वसाक्ष जगत्पती। त्याला नकोच मध्यस्ती।” हे ब्रीद वाक्य सत्यशोधक समाजाचे होते. सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना ते म्हणतात ” भट,ब्राह्मण,जोशी,उपाध्ये या लोकांच्या दहशतवादापासून शूद्र लोकांना मुक्त करण्यासाठी व आपल्या मतलबी ग्रंथाच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकास नीच मानून गपलतीने लुटत आहेत. यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता हा समाज आहे स्वातंत्र्य, समता,बंधुत्व हे विचार रुजवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शुद्रातीशूद्र लोकांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करणारी चळवळ सुरू केली. सत्यशोधक चळवळीच्या सदस्यांना “सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत व परमेश्वर त्यांचा आई बाप आहे.आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास मध्यस्ताची ज्याप्रमाणे जरुरी नसते. (Mahatma Phule Information in Marathi)

त्याप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहितांची आवश्यकता नसते. हे तत्व कबूल असल्यासच कोणालाही या समाजाचे सदस्यत्व होता येईल.” हे सांगून त्या सदस्यांना पुढील प्रमाणे शपथ घ्यावी लागे.”सर्व मानव प्राणी एकाच देवाची लेकरे आहेत, सबब ती माझी भावंडे आहेत, अशा बुद्धीने मी त्यांच्याशी वागेन. परमेश्वराची पूजा,भक्ती आगर ध्यानधारणा करते वेळी किंवा धार्मिक विधीच्या वेळी मी मध्यस्ताची गरज ठेवणार नाही मी माझ्या मुला मुलींना सुशिक्षित करेन.”

Read More : Mahatma Phule information in marathi

4)शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य:-

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची समृद्धी व भरभराट शेतकऱ्यांच्या वर अवलंबून असते. असे असले तरी शेतकरी सुखी व समाधानी नव्हता. कारण त्यांच्यात मागासलेपणा अज्ञान व कर्जबाजारीपणा, दारिद्र्य यामुळे शेतकरी खचलेला होता. जोतिराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या हलाखीचे सूक्ष्म अवलोकन केले. दिनदुबळ्यांची दुःख पाहून,खेड्यातील शेतकऱ्यांची दैनावस्था पाहुन ज्योतिराव फुले यांनी ” शेतकऱ्यांचा आसूड” या ग्रंथात शेतकऱ्यांची दुर्दशा याचं वर्णन केले आहे.ते म्हणतात,

 विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली।

 नीतीविना गती गेली, गतिविना वित्त गेले।

 वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले।

शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण द्यावे, सरकारने त्यासाठी खास प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वस्तीगृह काढावीत, धंदे शिक्षण द्यावे, कनिष्ठांना नोकऱ्यांत प्राधान्य द्यावेत या सूचना ब्रिटिश सरकारला महात्मा जोतीराव फुले यांनी केल्या. याशिवाय 1877 च्या दुष्काळाच्या वेळी महात्मा ज्योतिराव फुले यांनी दुष्काळ पिढीत लोकांना मदत देण्यास पुढाकार घेतला. धनकवडीतील दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प ही उभारला.सरकारला ज्योतिराव फुले यांनी सूचना करत असताना पाणीपुरवठा योजनेस अग्रक्रम देऊन,तलाव, बंधारे, विहिरी याद्वारे शेतीला जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे. अशा सूचना केल्या.याशिवाय शेतकऱ्यांना बंदुकाचे परवाने देऊन, कालव्याचे पाणी वेळेवर द्यावेत, शेतीवर वाजवी कर आकारावा, शेतकऱ्यांचे अज्ञान दूर करून त्यांना पशुपालना चालना द्यावी. (Mahatma Phule Information in Marathi)

अशा प्रकारच्या शेती सुधारणा साठी सरकारने प्रयत्न करावेत असे ब्रिटिश सरकारला सांगणारे महात्मा ज्योतिराव फुलेच होते. शेतकऱ्यांच्या हिताची चिंता महात्मा ज्योतिराव फुलेंना होती इसवी सन 1888 मध्ये ड्युक आॕप कॅनॉट यांच्या भारत बेटी वेळी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या वेश परिधान करून इंग्लंडच्या महाराणीला ड्युक साहेबांच्या करवी हिंदुस्तानच्या शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे असा निरोप दिला. (Mahatma Phule Information in Marathi)

5)शिक्षणविषयक विचार:-

महात्मा ज्योतिराव फुले यांनी जीवनभर बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य केले.स्त्री शिक्षण,अस्पृश्यांसाठी शिक्षण, त्याचबरोबर कनिष्ठ वर्गाला शिक्षणाचे दरवाजे उघडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बहुजन समाजाची प्रगती शिक्षणाशिवाय होणार नाही.असे त्यांचे ठाम मत होते.ब्रिटिश सरकारने भारतातील शिक्षणाचा प्रसार पाहण्यासाठी हंटर आयोगाची स्थापना केली. विल्यम हंटर हे अध्यक्ष होते. या आयोगासमोर साक्ष देताना ते म्हणतात “सरकार गरीब शेतकऱ्यांच्या कडून जो सारा वसूल करते त्या वसुलाचे उत्पन्न वरिष्ठ वर्गाच्या शिक्षणावरच खर्च होते वरिष्ठ वर्ग स्वतःपुरता विचार करते म्हणून सरकारने कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत दिले पाहिजे.” (Mahatma Phule Information in Marathi)

याशिवाय शिक्षकांच्या बद्दल ते म्हणतात  “प्राथमिक शाळेतील शिक्षक हे प्रशिक्षित असावेत. त्याशिवाय ते शेतकरी वर्गातील असावेत. ब्राह्मण वर्गातील शिक्षक हे धार्मिक पूर्वग्रहामुळे कनिष्ठ वर्गीयांशी फटकळ वागतात. तेव्हा शेतकरी वर्गातील शिक्षक त्या वर्गात अधिक सहजपणे मिसळतील आणि समाजातील कनिष्ठ थरांशी ते तत्परतेने एकरूप होतील.”

महाविद्यालयीन शिक्षणाचे स्वरूप स्पष्ट करताना फुले म्हणतात  “सरकारी महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे स्वरूप सर्वसाधारण जीवनातील गरजा भागविण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरावे.असे व्यवहारिक नाही. कारकून आणि शिक्षक मोठ्या प्रमाणावर पैदा होण्यास मात्र ते उपयुक्त ठरणारे आहे”. (Mahatma Phule Information in Marathi)

महात्मा फुलेंनी शिक्षणाकडे पाहताना शिक्षण विषयक आपले विचार प्रकट करताना सत्यनिष्ठा, शील,संवर्धन,नीतिमत्ता,सौजन्य, प्रगतीपर विचार व व्यवहार ज्ञान इत्यादी गोष्टीवर भर दिला. विद्यार्थ्यांच्या मनावर नैतिकतेचा संस्कार झाले पाहिजेत. अशा प्रकारची शिक्षण पद्धती त्यांना अपेक्षित होती. प्राथमिक शाळा वाढवून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची सरकारने,नगरपालिकेने सोय करावी. शाळांची तपासणी शिक्षण खात्यामार्फत करून ग्रामीण भागात मोडी,बालबोध, वाचन,हिशेब,इतिहास इत्यादींचे ज्ञान विद्यार्थ्यांना द्यावे.तसेच या जोडीला कृषीचे शिक्षण ही द्यावे. असे विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलेले दिसतात.

 6)धर्मविषयक विचार

महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. यातच त्यांचे विचार स्पष्ट होतात. जोतिराव फुले यांचेवर ईश्वरनिष्ठेचे व धर्मशीलतेचे संस्कार झाले होते. महात्मा फुलेंना धर्म हा सर्वज्ञ, सर्वसामर्थ,परमन्यायी व दयाळू या प्रकारची धारणा असणारा धर्म अपेक्षित आहे. धर्मातीत अनिष्ट रूढी परंपरा यावर त्यांनी कठोर टीका करत. एकेश्वर वादाचा पुरस्कार केला. परमेश्वर हा निर्गुण,निराकार असून तो चराचरात आहे. जोतिरावांनी ईश्वरालाच निर्मिक असे म्हटले. खरा ईश्वरप्रणित धर्म एकच आहे. त्यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती तर परमेश्वराची शुद्ध स्वरूपात आराधना व्हावी हे मान्य होते. अवतार कल्पना त्यांना मान्य नव्हती. पूजा,नामस्मरण,नैवेद्य, अन्नदान,अनुष्ठान,पाप,पुण्य इत्यादींचा ऊहापोह त्यांनी केला. (Mahatma Phule Information in Marathi)

“सर्व साक्षी जगत्पती।त्याला नकोच मध्यस्ती।” हे सूत्र महात्मा फुलेंच्या धर्म विचारातील होते. कर्मकांड, अनिष्ट रूढी,परंपरा, देव-भोळ्या समजुती, अंधश्रद्धा यांचे स्तोम माजविणारे ब्राह्मण्य प्रवृत्ती विरुद्ध त्यांनी आवाज उठविला. कनिष्ठांच्या अज्ञानामुळे वरिष्ठ वर्ग शोषण करीत आहे. असे त्यांनी स्पष्ट मत मांडले. “सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर” असे ते म्हणत हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था,विषमता,शूद्रावर होत असलेले अन्याय  यामुळे ते दुःखी होत. म्हणून फुलेंनी मध्यस्ताची जरुरी नाही.हे स्पष्ट केले समतेवर आधारलेला मानवधर्माचा पुरस्कार केला. (Mahatma Phule Information in Marathi)

 7)राजकीय विचार:-

महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्व प्रकारच्या गुलामगिरीचा तिरस्कार होता. इंग्रजांच्या भारतातील राजकीय गुलामगिरी याचाही महात्मा फुलेंना राग होता. बालपणापासूनच फुलेंना गुलामगिरी बद्दल चीड होती. म्हणूनच लहुजी बुवा मांग यांच्याकडून नेमबाजी,दांडपट्टा इत्यादींचे प्रशिक्षण घेतले होते. सामाजिक विषमतेमुळे समाजात फूट पडली असल्याने इंग्रजांची गुलामगिरी भारतात अस्तित्वात आली  ती जर नष्ट करावयाची असेल तर प्रथम सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक गुलामगिरीचे उच्चाटन झाले पाहिजे. तरच इंग्रजी सत्तेची गुलामगिरी नष्ट होईल. असे मत फुल्यांचे होते.

प्रारंभी विरोध असणाऱ्या जोतिराव फुले यांनी इंग्रजी सत्तेला नंतर पाठिंबा दिला असला तरी ज्यावेळी शासन समाजाच्या उन्नती आड येत असे त्यावेळी त्यांच्यावर कठोर टीका महात्मा फुलेंनी केली. 1885 साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेत बहुतांशी वरिष्ठ वर्गाचे लोक होते. राष्ट्रीय सभेने प्रथम ज्या मागण्या मांडल्या त्यास जोतिबांनी विरोध केला. कारण ते फक्त उच्चभ्रू लोकांचे प्रतिनिधी होते. सर्वसामान्य रयतेचे समाजाचे प्रतिनिधित्व नव्हते. 1889 मध्ये राष्ट्रीय सभेचे मुंबई येथे अधिवेशन झाले. त्यात जोतिबांनी स्पष्ट केले की “जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यात सामावून घेतले जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार तिला पोहोचत नाही” यावरून महात्मा फुले ही राजकीय विचाराने सर्वसामान्य लोकांच्या प्रतिनिधींच्या भूमिकेत पाहायला मिळतात.

 8)महात्मा जोतीराव फुले यांचे वाडःमय:-

महात्मा फुले यांचा सर्वांगीण विचार करता ते कोणी संशोधक किंवा आचार्य, पंडित नव्हते. भाषाशास्त्र ही जास्त जाणत नव्हते.परंतु ते मुलगामी विचारवंत होते.बहुजन समाजाचे प्रबोधन व दलित मुक्तीचा प्रचार यासाठी त्यांनी लेखणी हातात घेतली. त्यांचे लेखन सत्यशोधक समाजाची निगडित आहे. तसेच ते लेखन ओबडधोबड असले तरी शेतकरी,रयत,कष्टकरी,शूद्र या समाजाच्या व्यथा केंद्रबिंदू मानून केलेले आहे. त्यांची दुःखे वेशीवर टांगण्यासाठीच त्यांनी ग्रंथांचे लेखन केले. फुलेंची भाषा मराठमोळी आहे. खडतर जीवन जगणाऱ्या लोकांच्या भावना त्यांनी तटस्थपणे मांडले आहेत. समाजाच्या दैन्यावस्थेची वर्णने मन हेलावून टाकणारी आहेत. (Mahatma Phule Information in Marathi)

अ) तृतीय रत्न:-

तृतीय रत्न हे नाटक त्यांनी लिहिले. फुलेंनी पुरोहित लोक आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास फसवून कसे नडतात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निष्पक्षपाती धर्माच्या आधारे अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसे कसे सत्य मार्गावर आणतात. हे दाखवून देणारे तृतीय रत्न हे नाटक आहे. (Mahatma Phule Information in Marathi)

trutiy ratn book pocketbiography
खरेदी करण्यासाठी फोटो वर क्लिक करा.

 ब) छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा:-

महात्मा फुले यांनी प्रथम छत्रपती शिवरायांच्या रायगड राजधानी वर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधली.या समाधीवरील कचरा काढून ती स्वच्छ केली.पुण्यातील आपल्या मित्रांना घेऊन पुन्हा रायगडावर गेले आणि 19 फेब्रुवारी 1870 रोजी प्रथम शिवजयंती साजरी केली. 1870 पासून ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक स्वरूपात शिवजयंती उत्सव सुरू केला. हा ऊत्सव साजरा करत असताना महात्मा जोतीराव फुले यांनी शिवरायांच्यावर पोवाडा लिहिला. शिवरायांचे कार्य समाजासमोर प्रथम ठेवले. यातून ज्योतिरावांचे शिवप्रेम कळून येते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावरील सर्व महत्त्वाचे प्रसंग पोवाड्याच्या स्वरूपात सरळ व प्रभावी भाषेत मांडले. त्यांनी स्वतःस कुळवाडी भूषण अशी संज्ञा लावून घेतली. (Mahatma Phule Information in Marathi)

 क) ब्राम्हणांचे कसब:-

ब्राह्मणांचे कसब या पध्यात्मक पुस्तकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचा स्वार्थसाधू कारवाया उघड करून दाखवून दिल्या.भारतीय सांस्कृतिक परंपरेतील ब्राह्मण्य महात्म्य व विद्येची मक्तेदारी आणि मागासलेल्या जातीतील अज्ञान,अंधश्रद्धा,रूढी,परंपरा या विषयांची चर्चा ब्राह्मणांचे कसब या पुस्तकात केली आहे. प्राचीन कालखंडापासून आधुनिक काळापर्यंत ब्राह्मणांनी आपल्या मनुवादी विचाराने कशी जातीयता पसरविली आणि इतर इतर समाजाला शूद्र व कमी लेखले. हे दाखवून दिले बहुजन समाजात अनेक अनिष्ट रूढी परंपरा पसरविल्या. परिणामी बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला. ब्राह्मणांनी अनेक धर्मांध विचार बहुजन समाजात पसरविले.परिणामी बहुजन समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहिला.याचे विवेचन हे ब्राह्मणांचे कसब या ग्रंथात केले आहे. तसेच अनेक देवदेवतांचे पूजन आणि पूजा आरचा यामध्ये कसे ब्राह्मण श्रेष्ठ आहेत हे दाखविले. त्यामुळे ब्राह्मणांचे पितळ या पुस्तकातून फुलेंनी उघडे केले. (Mahatma Phule Information in Marathi)

 ड) गुलामगिरी:-

महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ प्रकाशित केला. धार्मिक सामाजिक व आर्थिक गुलामगिरी कशा पद्धतीने वरिष्ठ वर्गाने बहुजन समाजावर लादली आहे. याचा विचार या ग्रंथात केला आहे. बालपणापासूनच गुलामगिरी बद्दल फुलेंच्या मनात तिटकारा होता. या ग्रंथात ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीपासून ते भटपाड्यांच्या बंडापर्यंतचा समग्र इतिहास कथन केला आहे. सर्वसामान्य बहुजन वर्गाला ज्ञानाचे दरवाजे बंद झाल्याने पुरोहितांच्या मध्यस्थीची गरज निर्माण झाली. या मध्यस्थीवर कठोर टीका जोतिराव फुले यांनी या ग्रंथात केली आहे. हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या लोकांना अर्पण केला आहे.

gulamgiri book pocketbiography
खरेदी करण्यासाठी फोटो वर क्लिक करा.

 इ) शेतकऱ्यांचा आसूड:-

शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ 1883 मध्ये महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिला. मात्र तो त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाला नाही. शेतकऱ्यांच्या खालावलेल्या स्थितीचे वर्णन आणि शेतकऱ्यांची झालेली दैन्यवस्था या ग्रंथात दिली गेलेली आहे. शेतकऱ्यांचा आसूड म्हणजे शेतकऱ्यांच्या खांद्यावर असलेला चाबूक या अर्थाने घेतला तर जेव्हा शेतकऱ्यांच्या जीवावर भेतेल तेव्हा शेतकरी हा आसूड उभारल्याशिवाय राहणार नाही. हाही विचार महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या ग्रंथावरून स्पष्ट होतो. (Mahatma Phule Information in Marathi)

shetkaryacha asud book pocketbiography
खरेदी करण्यासाठी फोटो वर क्लिक करा.

 ई) इतर वाडःमयीन कार्य:-

महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्सार हे नियतकालिक सुरू केले होते. त्या मध्ये सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह केला. त्याचबरोबर इशारा हे पुस्तक ही लिहिले त्या पुस्तकात जातीभेदा विषयीचे विचार मांडले. त्यांचा शेवटचा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ होय.या ग्रंथात धार्मिक, सामाजिक, व्यवहारिक इत्यादी विविध विषयांची चर्चा केली आहे. सुख,पूजा,नामस्मरण,नैवद्य,स्वर्ग,स्त्री,पुरुष,पापपुण्य,जातीभेद,नीती,दैव इत्यादी प्रश्नांचा या ग्रंथांमध्ये  ऊहापोह केला आहे. मनुष्य जीवनात धर्म भावनेची आवश्यकता आहे.मात्र ती धर्म भावना ही स्वच्छ,निस्वार्थी असायला हवी. असे महात्मा फुले म्हणतात. निसर्गाच्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये निर्मिकाने अनंत सूर्य मंडळासह सर्व प्राणिमात्रास निर्माण केले आहे.आपण सर्व मानव स्त्री-पुरुषांनी त्याविषयी काय काय करावे हे स्पष्ट करत असताना सर्व मानव स्त्री-पुरुषांनी त्यांचे स्मरण मनात ठेवून जागृती ठेवल्यास,आचरण नीट केल्यास,आनंद होणार आहे. यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी हा ग्रंथ रचला असे ते म्हणतात.

योग्यता:-

महात्मा ज्योतिबा फुले ही पददलितांची नेते होते. हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट रूढी परंपरा यांनी हिंदू धर्माला विळखा घातलेला होता. त्या अनिष्ट रूढी परंपरांच्या चौकटीत ब्राह्मण्य प्रवृत्तीच्या लोकांनी बहुजन समाजाला बांधले होते. ती धर्माची चौकट मोडून काढत महात्मा ज्योतिराव फुले यांनी एकेश्वरी,मानवतावादी,नीतीवादी व बुद्धिप्रामान्यवादी गोष्टींचा स्वीकार केला.बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी प्रयत्न करत असताना महाराष्ट्रात शिक्षणाची गंगोत्री आणली. अस्पृश्य समाजाला स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. गुलामगिरी लादणाऱ्या विरुद्ध आवाज उठविला. म्हणूनच ते कृतिशील व कर्ते सुधारक होते.

फुलेंनी मूलगामी समाजक्रांतीचा विचार मांडला. समाज व्यवस्थेत अमुलाग्रह बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मण्य प्रवृत्तीच्या लोकांनी फुल्यांच्या मार्गावर अनेक काटे टाकले.परंतु बहुजन समाजाला जागृत करत असताना त्या काट्यांची परवा केली नाही. आणि प्रबोधनाची चळवळ खेड्यापर्यंत पोहोचविली. स्त्री उद्धाराचे कार्य करून एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकेल ही धारणा मनात ठेवून स्त्रियांच्या भोवतालची धर्मांधतेची चौकट तोडण्यासाठी स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली केली. इतिहासकार धनंजय कीर म्हणतात “जोतिबांनी स्त्री जीवनाच्या बंधनांना तडा घालविला. तिला स्वातंत्र्याचा मार्ग चोखण्यास समर्थ बनविले. पुरोहित वर्गाने कनिष्ठ वर्गाच्या मानेभोवती मानसिक गुलामगिरीचे पाश आवळले होते. ते तोडून टाकले. शूद्रातीशूद्र यांची पिळवणूक करणाऱ्यांचे वाभाडे काढले”.आणि शेतकरी सुखी तर देश सुखी हे तत्व लोकांच्या मनावर ठासविले.असे अष्टपैलू व्यक्तिमत्व हे महात्मा जोतीराव फुले यांचे होते. (Mahatma Phule Information in Marathi)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top