प्रथमेश परब बायोग्राफी : Prathamesh Parab Age, Marriage, Career, Networth, Biography 2024 (Free)

सर्वसामान्य पार्श्वभुमी असणाऱ्या कलाकारांना मोठे करण्यात मराठी सिनेसृष्ठीने मोलाचे योगदान दिले आहे. असाच एक सर्वसामान्य पार्श्वभुमी असणारा कलाकार स्वतःच्या जिद्दीवर, अभिनयाच्या ताकदीवर पुढे आला आहे. तो म्हणजे प्रथमेश परब. ज्याला आपण टाईमपास मधील दगडू म्हणून ओळखतो. प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपल्या विनोदी अभिनयाच्या शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या कलाकाराने मराठी सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे आणि सर्वसामान्य कलाकारांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. 

Prathamesh Parab Age, Marriage, Career, Biography
Prathamesh Parab Age, Marriage, Career, Biography

आज यशाच्या शिखरावर दिसणाऱ्या प्रथमेशच्या यशाचा प्रवास दिसतो इतका सोपा नव्हता. तरीही फक्त सातत्य, आत्मविश्वास, प्रचंड मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक एक अडथळे पार करत यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन पोहचला आहे. त्याच्या मेहनतीने आज त्याचा प्रचंड मोठा चाहते निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रातील घराघरात प्रथमेश आज परिचित आहे. म्हणूनच आजच्या प्रथमेश परब बायोग्राफी (Prathamesh Parab Age, Marriage, Career, Networth, Biography) या लेखातून आपण प्रथमेश परब याच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सामान्य कलाकार ते सुपरस्टार होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास बघणार आहोत. चला तर जाणून घेऊया प्रथमेश परब याच्याबाबत…. 

Buy : Biographical Books 

प्रारंभीक जीवन

प्रथमेश परब याचा जन्म 29 नोव्हेंबर 1993 रोजी मालवण येथे एका सामान्य कुटुंबात झाला. मालवण म्हणजे कोकणचा भाग होय. जन्म कोकणातला असला तरी तो लहानपणापासून त्याच्या कुटुंबासोबत मुंबईतच स्थायिक आहे. त्याच्या वडिलांचे नाव प्रकाश परब आहे. ते निरोगी जीवनशैली साठी आजही ऑफिसला जाण्यासाठी सायकलने प्रवास करतात. तसेच त्याच्या आईचे नाव प्रिया परब आहे. त्याला एक भाऊ आहे. त्याचे नाव प्रतीक परब आहे.

प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिक्षण 

मुंबईत स्थायिक असणाऱ्या प्रथमेश परब याचे प्राथमिक शिक्षण हॉली क्रॉस स्कूल,मुंबई येथे झाले. तसेच डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथून बँकिंग आणि इन्शुरन्स मध्ये पदवी प्राप्त केली आहे. अशाप्रकारे प्रथमेश परब हे उच्च शिक्षण घेतलेले कलाकार आहेत.

करियर 

सामान्य कौटुंबिक पार्श्वभुमी असणाऱ्या प्रथमेशला अभिनयाची आवड लहानपणापासून होती. त्याच्या अभिनयाची एक विशिष्ट शैली आहे आणि त्या शैलीमुळेच अभिनय क्षेत्रात यश मिळाले आहे. पण हा रस्ता खडतर होता. तरीही यातून मार्ग काढत काढत एक एक पाऊल टाकत मराठी सिनेसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

Prathamesh Parab Age, Marriage, Career, Networth, Biography
Prathamesh Parab Age, Marriage, Career, Networth, Biography

प्रथमेशच्या करियरची सुरुवात  ही बालक पालक या चित्रपटापासून झाली. हा एक लैंगिक शिक्षण देणारा चित्रपट होता. या चित्रपटात त्याने केलेल्या विशू या पात्राच्या भूमिकेने त्याला प्रसिद्धी मिळाली. आणि त्याच्या अभिनयाची एक विशिष्ट शैली समोर आली. याच अभिनय शैलीच्या आधारावर त्याला 2013 मध्ये टाईमपास चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटात केतकी माटेगावकर सोबत त्याने केलेला अभिनय आणि मला वेड लागले प्रेमाचे हे गाणे सर्वांच्या पसंतीस उतरले आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड मोडले होते. प्रथमेशच्या करिअरचा बालक पालक या चित्रपटाने घातलेला पाया टाईमपास या चित्रपटाने पक्का झाला असे आपण म्हणू शकतो.

त्यांनंतर प्रथमेशने मागे वळून बघितले नाही. उर्फी, 35% काठावर पास, लालबागची राणी, टकाटक, खिचीक, डॉक्टर डॉक्टर, डार्लिंग, टाईमपास 2, टाईमपास 3, टकाटक 2, सिंगल यासारख्या चित्रपटात दिग्गज कलाकारां सोबत काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करून प्रथमेश यशाच्या शिखरावर पोहचला. 

त्याची विनोदी शैली, डायलॉग प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही सांगायचे झाले तर ते म्हणजे ” आई बाबा आणि साई बाबा शप्पथ, अशीच पाहिजे आपल्याला “, हम जियेंगे अपनी मर्जीसे और तुमपे मरेंगे भी अपने मर्जीसे”, ए.. भाऊ आता डोकं नको खाऊ ” इ. त्याचे प्रसिद्ध डायलॉग आहेत. 

मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटविणाऱ्या प्रथमेश परबला बॉलीवूड मध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याने 2015 साली प्रदर्शित झालेल्या दृश्यम या चित्रपटात अजय देवगण सोबत काम केले आहे. तसेच 2022 मधील दृश्यम 2 मध्ये देखील त्याला संधी मिळाली होती. प्रथमेश याने आपल्या विनोदी शैलीने बॉलीवूड मध्ये देखील छाप सोडली आहे.

विवाह 

अभिनय क्षेत्रात यश मिळविल्यानंतर प्रथमेश परब ने फेब्रुवारी 2024 मध्ये क्षितिजा घोसाळकर हिच्याशी लग्न केले. क्षितिजा आणि प्रथमेश हे 2021 पासून रीलेशनशिप मध्ये होते. बायोटेक्नोलॉजिस्ट असणाऱ्या क्षितिजा या मनोरंजन क्षेत्रातच कंटेन्ट रायटर म्हणून काम करतात. तसेच त्या शिक्षिका, फॅशन मॉडेल आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील काम करतात. त्यांच्या आयुष्यात 14 फेब्रुवारीचे विशेष महत्व आहे. प्रथमेशच्या म्हणण्यानुसार 14 फेब्रुवारी 2020 रोजी त्याने क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सीरिज पाहून तिला मेसेज केला. तसेच 14 फेब्रुवारी 2021 ला प्रपोज करून ते रीलेशनशिप मध्ये आले. 14 फेब्रुवारी 2023 ला त्यांनी एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिली आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी साखरपुडा पार पडला.

Prathamesh Parab wife

Read More About Prathamesh Parab Age, Biography

संपत्ती (Networth)

प्रथमेश परब याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत चित्रपट आहे. तसेच या शिवाय तो जाहिराती, प्रमोशन, कार्यक्रम आणि इतर व्यवसायातील गुंतवणूकीतून कमाई करतो. काही स्रोतांच्या आकडेवारीनुसार प्रथमेश परब याच्याकडे 3-4 करोड रुपयाची संपत्ती आहे. कधी काळी चाळीत राहणारा प्रथमेश आज अलिशान घरात राहतो. (Prathamesh Parab Age, Marriage, Career, Networth, Biography)

पुरस्कार 

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या प्रथमेश परब याला अभिनयासाठी पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्याला 2014 मध्ये Most Promising Newcomer (सर्वात आश्वासक नवोदित) म्हणून 20 वा वार्षिक लाईफ ओके स्क्रीन पुरस्कार मिळाला आहे. 

अशाप्रकारे प्रथमेश परब बायोग्राफी (Prathamesh Parab Age, Marriage, Career, Networth, Biography) या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कंमेंट्स बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तीबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा. Pocketbiography.com ची टीम तुमच्या सूचनावर नक्की काम करेल. तसेच Pocketbiography.com च्या कुटुंबात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी व्हा….. धन्यवाद!!!

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न – प्रथमेश परब याचे वय (Prathamesh parab Age) किती आहे?

उत्तर – प्रथमेश परब याचे वय (Prathamesh parab Age) 2024 मध्ये 31 आहे.

प्रश्न – प्रथमेश परब विवाहित (Prathamesh parab marriage) आहे का?

उत्तर – हो 

प्रश्न – प्रथमेश परब याच्या पत्नीचे (Parthamesh Parab Wife) नाव काय आहे?

उत्तर – प्रथमेश परब याच्या पत्नीचे (Parthamesh Parab Wife) नाव क्षितिजा घोसाळकर आहे.

प्रश्न – प्रथमेश परब याची उंची (prathamesh parab height) किती आहे?

उत्तर – प्रथमेश परब याची उंची (prathamesh parab height) 5 फूट  7 इंच आहे.

प्रश्न – प्रथमेश परब याचे लग्न (Prathamesh Parab Wedding) कोणत्या वर्षी झाले? 

उत्तर – प्रथमेश परब याचे लग्न (Prathamesh Parab Wedding) 2024 मध्ये झाले.

 प्रश्न – प्रथमेश परब याचे प्रसिद्ध चित्रपट (prathamesh parab movies) कोणते आहेत? 

उत्तर – बालक पालक, टाईमपास, डार्लिंग इ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top