आपल्या आजूबाजूला आपण असे बरेच लोक बघतो जे प्रत्येक गोष्टीत काही ना काही कारण देत असतात. त्यामुळेच ते त्यांच्या आयुष्यात एका विशिष्ट ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. पण आजच्या या लेखातून आपण अशा व्यक्तीचा प्रवास जाणून घेणार आहोत त्या व्यक्तीकडे देण्यासाठी बरीच कारणे होती परंतु कोणतेही कारण किंवा तक्रार न करता फक्त जिद्दीच्या जोरावर जगात स्वतःचे नाव दिग्गज खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले. ते म्हणजे पॅरा ऑलिम्पिक पदक विजेते, गोळाफेकपटू सचिन खिलारी होय. (Sachin Khilari Information in Marathi) लहान असतानाच डाव्या हाताला आलेले कायमचे अपंगत्व यावर मात करत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंतचा यशस्वी प्रवास त्यांनी केला. त्यांनी आपल्या अपंगत्वाकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता त्यास एक वरदान म्हणून पाहिले आणि उच्च शिक्षणाबरोबरच खेळातही प्राविण्य मिळवले.
सचिन हे एक इंजिनियर असून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करतात. हे सर्व करत असताना त्यांनी खेळाप्रती असणारी आवड जोपासली आणि खेळामध्ये नावलौकिक मिळविला. करगणी सारख्या एका छोट्या गावातून येऊन त्यांनी पॅरिस पर्यंतचा केलेला प्रवास प्रेरणादायी आहे. तो प्रवास आजच्या सचिन खिलारी माहिती मराठी (Sachin Khilari Information in Marathi) या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया सचिन खिलारी यांची माहिती (Sachin Khilari Information in Marathi)……
प्रारंभिक जीवन
सचिन खिलारी यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी या गावी 23 ऑक्टोबर 1989 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर्जेराव खिलारी असे आहे. नुकतेच मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये त्यांचे निधन झाले आहे. सचिन खिलारी यांचे कुटुंब शेती या व्यवसायावर उदरनिर्वाह करते. सचिन यांचे वडील एक प्रगतशील शेतकरी होते. तसेच त्यांनी वकिली मध्ये पदवी मिळवली होती. सचिन यांना एक लहान बंधू देखील आहे. सचिन 5 वर्षाचे असताना एका गाडी अपघातात त्यांच्या आईचे निधन झाले होते. तसेच ते 6 वर्षाचे असताना एका सायकल अपघातात त्यांच्या डाव्या हाताला इजा झाली होती व पुढे जाऊन या इजेचे रूपांतर अपंगत्वात झाले आणि त्यांना आपला डावा हात कायमचा गमवावा लागला आणि कायमचे अपंगत्व आले.
आईचे निधन, आलेले अपंगत्व यासारखे धक्के त्यांना लहान वयातच मिळाले. परंतु या सर्वातून खचून न जाता वडिलांच्या पाठिंब्याने सचिन पुन्हा उभे राहिले. त्यांना त्यांच्या वडिलांनी या सर्व स्थितीत प्रचंड पाठिंबा आणि आधार दिला. अपंगत्व कमजोरी नसून एक अमूल्य भेट आहे असा विश्वास सचिन यांच्या मनात निर्माण करण्याचे काम त्यांच्या वडिलांनी केले व शिकून मोठे होण्यासाठी प्रेरणा निर्माण केली. याच प्रेरणेतून सचिन यांनी पुढे जाऊन उच्च शिक्षण प्राप्त केले.
शैक्षणिक माहिती
सचिन खिलारी हे एक नामवंत खेळाडू असण्याबरोबरच उच्च शिक्षितही आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण करगणी येथूनच पूर्ण केले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी ते बारामती येथे गेले. बारावीपर्यंतचे शिक्षण बारामती येथे घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातून 2013 मध्ये इंदिरा कॉलेजमधून मेकॅनिकल इंजीनियरिंग मधून पदवी घेतली. इंजीनियरिंग ची पदवी घेतल्यानंतर सचिन यांनी पुण्यातच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2013 ते 2016 या दरम्यान त्यांनी तीन वर्ष MPSC चा प्रचंड अभ्यास केला. 2015 मध्ये त्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा देखील दिली होती. परंतु त्यांना यामध्ये यश मिळाले नाही.
त्यानंतर सचिन आणि विविध स्पर्धा परीक्षेच्या संस्थांमध्ये निमंत्रित शिक्षक म्हणून काम सुरू केले. आणि MPSC व UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी S. K. Academy नावाने स्वतःची ही स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी चालू केली होती. (Sachin Khilari Information in Marathi)
स्वप्नील कुसाळे यांचे जीवनचरित्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
गोळाफेक खेळण्यास सुरुवात
सचिन यांना शारीरिक दृष्ट्या अपंगत्व असले तरी त्यांनी कधीही त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले नाही. त्यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. परंतु त्यांच्या वडिलांचा खेळास विरोध होता. म्हणून बारामती येथे शिक्षणासाठी वडिलांपासून लांब गेल्यानंतर गेल्यानंतर सचिन यांनी खेळास सुरुवात केली. सचिन सुरुवातीला म्हणजेच 12 वी मध्ये शिक्षण घेत असताना भालाफेक खेळ खेळत होते. यामध्ये त्यांनी शालेय पातळीवरील पदके देखील मिळवली आहेत. परंतु भालाफेक खेळत असतानाच त्यांच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे व प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार त्यांनी भालाफेक सोडून गोळा फेक खेळण्यास सुरुवात केली आणि एक उत्तम गोळाफेकपटू म्हणून नावलौकिक मिळविला.
गोळाफेक मधील कारकीर्द
आपल्या अपंगत्वाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या सचिन यांना 2015 मध्ये पॅरा स्पोर्ट्स ची ओळख झाली. पॅरा स्पोर्ट्स म्हणजे जे शारीरिक दृष्ट्या इतरांपेक्षा कमजोर आहेत अशा व्यक्तींसाठी असणाऱ्या खेळाच्या स्पर्धा होय. सचिन खिलारी यांनी 2017 मध्ये जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा स्पोर्ट्स स्पर्धेत सहभाग नोंदवून आपली प्रतिभा सर्वांसमोर दाखवून दिली. या स्पर्धेत सचिन यांनी पहिले राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक जिंकले. 2017 पासून 2019 पर्यंत सत्यनारायण हे सचिन यांचे प्रशिक्षक होते. त्यानंतर सचिन यांनी पुणे येथील आजम स्पोर्ट्स अकॅडमी सराव करण्यास सुरुवात केली. येथे त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण हे होते.
2017 मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेल्या पदकानंतर सचिन यांनी वळून मागे बघितले नाही. एक एक पाऊल टाकत रेकॉर्ड बनवत प्रवास चालू ठेवला.त्यांनी 2022 मध्ये आशियाई प्यारा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर 2023 मध्ये झालेल्या जागतिक पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत गोळा फेक या खेळात F- 46 गटात त्यांनी सुवर्णपदक मिळविले. F-46 गट म्हणजे ज्यांना हातामध्ये अपंगत्व आहे असा गट होय. याच स्पर्धेत 16.21 मीटर गोळा फेकून त्यांनी रेकॉर्डही तयार केला. (Sachin Khilari Information in Marathi)
हे सर्व यश मिळवित 2024 च्या पॅरिस येथे झालेल्या जागतिक पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. आणि याच आत्मविश्वासावर पॅरालिम्पिक स्पर्धा 2024 ज्या पॅरिस येथे पार पडल्या त्यामध्ये गोळाफेक इव्हेंट मध्ये सचिन खिलारी यांनी प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रौप्य पदक मिळविले. तब्बल 40 वर्षा नंतर गोळाफेक मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारा पहिले भारतीय खेळाडू ठरले. याआधी 1984 मध्ये जोगिंदर सिंह बेदी यांनी गोळाफेक मध्ये पदक मिळवले होते. अशाप्रकारे सचिन खिलारी यांनी शारीरिक अडचणींवर मात करून मोठ्या जिद्दीने पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवण्यापर्यंतचा(आटपाडी ते पॅरिस) असा प्रवास केला.
Read More About Sachin Khilari information in marathi
अशाप्रकारे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आणि जिद्दीने प्रयत्न केल्यास कोणतेही यश सहज मिळवता येते. असा संदेश सचिन खिलारी यांच्या जीवनातून आपणास मिळतो. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून आपणही शिकवण घेऊन जिद्दीने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सचिन खिलारी यांची माहिती(Sachin Khilari Information in Marathi) आवडली असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर प्रतिक्रिया द्या. आणि तुम्हाला कोणाबद्दल जाणून घेण्यास आवडेल हे ही आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या सूचनांवर pocketbiography.com ची टीम त्यावर नक्की काम करेल. तुमचे असेच प्रेम राहू द्या धन्यवाद!!!
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1- सचिन खिलारी कोणता खेळ खेळतात?
उत्तर – सचिन खिलारी गोळाफेक (Shot Put) हा खेळ खेळतात.
प्रश्न 2- सचिन खिलारी कोणत्या राज्यातील (State)आहेत?
उत्तर – सचिन खिलारी महाराष्ट्र राज्यातील आहेत.
प्रश्न 3- सचिन खिलारी यांची जन्मतारीख (Birth Date)
उत्तर – सचिन खिलारी यांची जन्मतारीख 23 ऑक्टोबर 1989 आहे.
प्रश्न 4- सचिन खिलारी यांच्या गावाचे (Village) नाव काय आहे?
उत्तर – सचिन खिलारी यांच्या गावाचे नाव करगणी (ता. आटपाडी जि. सांगली ) आहे.
प्रश्न 5- सचिन खिलारी यांनी पॅरा ऑलिम्पिक मध्ये कोणते पदक मिळविले?
उत्तर – सचिन खिलारी यांनी पॅरा ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळविले.
Pingback: प्रणव सूरमा माहिती मराठी : Pranav Soorma Para Athlete information in Marathi 2024 (Free) - Pocket Biography
Pingback: प्रणव सूरमा माहिती मराठी : Pranav Soorma Para Athlete information in Marathi 2024 - Darji Rojgar Sandesh