भारतातील करोडो तरुणांचे प्रेरणास्थान, ज्यांच्या जयंती दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो असे फक्त भारतातीलच नव्हे संपूर्ण जगातील तरुणाईला आदर्श व मार्गदर्शक ठरणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद होय. स्वामी विवेकानंद माहिती मराठी या लेखातून आपण स्वामी विवेकानंद यांचे चरित्र रेखाटण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वामी विवेकानंद हे एक अध्यात्म गुरु, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी हयातभर हिंदू धर्म तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचे तसेच मानवसेवा करण्याचे व्रत अंगीकारले होते. चला तर जाणून घेऊया आधुनिक भारतातील सर्वात प्रभावी व महान व्यक्तीमत्व स्वामी विवेकानंद यांच्याबाबत…..
बालपण
12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता मधील सिमलापाली या ठिकाणी बंगाली कुटुंबात मकरसंक्राती दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते. पुरोगामी विचारांचे विश्वनाथ हे कलकत्ता उच्च न्यायालयात वकिलीची काम करत होते. विवेकानंद यांच्या आईचे नाव भुवनेश्वरीदेवी होते. त्यांना धार्मिक बाबींमध्ये विशेष रुची होती.त्या शिव भक्त होत्या. अशा सुशिक्षित, पुरोगामी विचारांच्या आणि धार्मिकतेच्या वातावरणात विवेकानंद यांच्या बालमनावर संस्कार होत होते.
विवेकानंद लहानपणापासून हुशार, चाणाक्ष आणि जिज्ञासू होते. तसेच खट्याळ, खोडकर देखील होते. त्यांना धार्मिक साहित्य आणि संगीतात विशेष रुची होती. तसेच त्यांना व्यायामाची आवड होती. त्यांना पोहणे, कुस्ती खेळणे, वाचन करणे इ. छंद होते. विवेकानंद यांची एकाग्रशक्ती आश्चर्यचकित करणारी होती. त्यांना हे कौशल्य बालपणापासूनच अवगत होते. त्याबाबतच्या अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना सर्वांनी ऐकलेल्या आहेत. (स्वामी विवेकानंद माहिती मराठी)
Buy : Swami Vivekanand Biography Book
शिक्षण
सुशिक्षित कौटुंबिक पार्श्वभुमी असेल्याला नरेंद्रनाथ यांच्या शिक्षणाची सुरुवात घरातूनच झाली. अक्षरओळख झाल्यानंतर ईश्वरचंद विद्यासागर यांच्या मेट्रोपोलिटन संस्थेत शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी असेम्बलीज संस्थेत प्रवेश घेतला. या ठिकाणी त्यांनी यूरोपीयन इतिहास, तर्कशास्त्र आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला. आणि 1884 मध्ये बी. ए पदवी प्राप्त केली. प्रतिभावान असणाऱ्या विवेकानंद यांनी शिक्षण घेत असताना प्राचीन तत्ववेत्यापासून आधुनिक विचारवंतापर्यंत सर्व काही वाचन केले होते. त्यावर त्यांनी प्रभुत्व मिळविले होते.
संत तुकाराम महाराज यांचे चरित्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
रामकृष्ण परमहंस यांच्याशी संबंध
1881 मध्ये सुरेंद्रनाथ मित्र यांच्या घरी कार्यक्रमाच्या निम्मिताने विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांची भेट झाली होती. तेव्हापासून विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासात होते. रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा विवेकानंद यांच्यावर प्रभाव पडला होता. योगसाधनेने मोक्ष मिळू शकतो या परमहंसाच्या विचाराकडे विवेकानंद आकर्षित झाले होते. 1884 मध्ये विवेकानंद यांनी सन्यास घेतला आणि परमहंस यांचे शिष्य बनले. विवेकानंद हे नाव रामकृष्ण परमहंस यांनीच दिले आहे. रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासात सहा वर्षे योगसाधना केली. तसेच भारतीय अध्यात्माची ओळखही करून घेतली. या सर्वामुळे स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्म आणि तत्वज्ञान यांचे समर्थक व प्रचारक बनले. (स्वामी विवेकानंद माहिती मराठी)
धर्मप्रचार कार्य
रामकृष्ण परमहंस यांच्याकडून दिक्षा घेऊन हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी आणि आंतरधर्मीय सलोखा वाढवण्यासाठी कार्य सुरु केले. त्यांनी आपल्या शिकवणीने जगाला वेदांत आणि योगशास्त्र तसेच भारतीय दर्शनशास्त्राची ओळख करून दिली. 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी पार पडलेल्या जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्माची प्रभावी मांडणी करून आपल्या भाषणाने उपस्थित लोकांना मंत्रमुग्ध केले. हिंदू धर्मातील तत्वाचा प्रचार केला. याच परिषदेतील “माझ्या बंधु आणि भगिनींनो” या भाषणाच्या सुरवातीच्या शब्दांनी भारतीय संस्कृती सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. स्वामी विवेकानंद यांच्या प्रभावी व्यक्तीमत्वामुळे आणि विद्वतेमुळे अमेरिकेतील लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांनी 2 वर्षे अमेरिकेत राहून हिंदू धर्माचे तत्वज्ञान तेथील लोकांपर्यंत पोहचविले.
अमेरिकेनंतर स्वामी विवेकानंद यांनी जगभरात भ्रमंती करून हिंदू धर्माचा संदेश पोहचवण्याचे काम केले. त्यापैकी इंग्लंडमधील कु. मार्गरीट नोबेल यांचा उल्लेख करणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंद यांच्याकडे आकर्षित होऊन त्या स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य बनल्या आणि कालांतराने भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्धीस आल्या. अमेरिका, इंग्लंड प्रमाणे फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया इ. देशात स्वामी विवेकानंद यांनी व्याख्याने दिली आणि हिंदू अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार-प्रसार केला. (स्वामी विवेकानंद माहिती मराठी)
प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
रामकृष्ण मिशन
रामकृष्ण परमहंस यांच्या विचारावर आधारित त्यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. जगातील सर्व धर्म सत्य असून एकाच ध्येयापर्यंत पोहचवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत अशा आशयाची शिकवण या मिशन मार्फत दिली गेली. तसेच रामकृष्ण मिशनच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा काढून हिंदू धर्माचा प्रचार, त्याआधारे विश्वशांती -विश्वधर्माचा संदेश देणे, अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार करणे, ते तत्वज्ञान पटवून देणे, हिंदू धर्मातील सत्य तत्वज्ञानाची ओळख करून देणे यासारखी धार्मिक कामे रामकृष्ण मिशनने केली. तसेच रामकृष्ण मिशनने सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला होता. सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. रामकृष्ण मिशनने अनाथआश्रम, हॉस्पिटल, वसतिगृहे यांची स्थापना करून गरजू लोकांची मदत केली. तसेच नैसर्गिक संकटाच्या काळातही संकटग्रस्त लोकांसाठी कामे केली. यासोबत एक राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्याचे महत्वपूर्ण काम केले.
स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान आणि शिकवण
1. प्रत्येक जीव हा दैवी आहे. ईश्वरी आहे.
2. सर्व प्राणी मात्र शिवाचे अंश आहेत.
3. मनुष्याचे ध्येय हे अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून परमार्थ साधने हे आहे.
4. यासाठी कर्मयोग, भक्तीयोग, राजयोग आणि ज्ञानयोग यांचा अवलंब करावा.
5. सर्व प्राणीमात्रावर प्रेम करावे
6. तसेच त्यांनी बंधुतेचा संदेश दिला.
7. निःस्वार्थ मानवसेवा हाच खरा धर्म आहे.
स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कसा झाला?
स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कसा झाला याबाबत लोकांना जास्त माहिती नाही. फक्त इतकेच माहिती आहे की ते 4 जुलै 1902 रोजी अनंतात विलीन झाले. असे सांगितले जाते की त्यांनी त्यांच्या मृत्यूबाबत भविष्यवाणी आधीच केली होती. ते सतत म्हणायचे की मी 40 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही. आणि त्यांच्या भविष्यवाणी खरी ठरली. एका बंद खोलीत ध्यान करत असताना त्यांनी महासमाधी घेतली. त्यावेळी त्यांचे वय 39 वर्षे होते. असे असले तरी काही स्रोतांनुसार त्यांना 31 हून अधिक आजार होते. (स्वामी विवेकानंद माहिती मराठी)
स्वामी विवेकानंद माहिती मराठी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार
1. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका.
2. स्वतःला कमजोर समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.
3. तुम्ही व्यस्त आहात तोपर्यंत सर्व काही सोपे आहे. आळशी आहात तोपर्यंत सर्व काही अवघड आहे.
4. जोपर्यंत स्वतः वर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्यावर विश्वास वाटत नाही.
5. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे.
6. दिवसातून एकदा स्वतःशी बोला. नाहीतर तुम्ही एका उत्तम व्यक्तीची सोबत गमवून बसाल.
7. दुसऱ्याची सेवा करणारे लोक धन्य असतात.
8. शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे.
9. महान कार्य करण्यासाठी महान त्याग करावा लागतो.
10. सत्यासाठी सर्व सोडू शकता पण कोणासाठी सत्य सोडू नये.
अशाप्रकारे स्वामी विवेकानंद माहिती मराठी या लेखातून त्यांच्या बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कंमेंट्स बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तीबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा. Pocketbiography.com ची टीम तुमच्या सूचनावर नक्की काम करेल. तसेच Pocketbiography.com च्या कुटुंबात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी व्हा….. धन्यवाद!!!