भगतसिंग यांची माहिती : Bhagat Singh Biography in Marathi (Free)

“इन्कलाब जिंदाबाद” हा नारा ऐकल्यावर एक नाव पटकन मनात येते ते म्हणजे शहीद भगतसिंग. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख क्रांतिकारी म्हणून भगतसिंग यांचे नाव घेतले जाते. ब्रिटिश सरकारच्या अन्यायी धोरणाविरुद्ध स्वातंत्र्य मिळविण्याच्या प्रचलित असणाऱ्या प्रवाहावर विश्वास नसल्याने आक्रमक पवित्रा घेऊन क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करून ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला. या मार्गात असणाऱ्या संकटाची पर्वा न करता वयाच्या 23 व्या वर्षी प्राणाचे बलिदान दिले. असे महान क्रांतिकारक शहिद भगतसिंग यांच्या जीवनचरित्राचा आढावा भगतसिंग यांची माहिती या लेखातून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया भगतसिंग यांची माहिती…..

भगतसिंग यांची माहिती thumbnail
भगतसिंग यांची माहिती

जन्म 

तत्कालीन अखंड भारतातील (ब्रिटिश भारतातील) पंजाब प्रांतातील फैसलाबाद जवळील बंगा गावात (सध्या पाकिस्तान) भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी एका शीख कुटुंबात झाला. त्यांचा जन्मादिवशी एक योग घडून आला. याच दिवशी स्वातंत्र्य चळवळीचे भाग असणारे भगतसिंग यांचे वडील आणि चुलते यांची तुरुंगातुन सुटका झाली. थोडक्यात जन्मादिवशीच भगतसिंग यांना स्वातंत्र्य चळवळीचे बाळकडू मिळाले. आणि लवकरच ते बाळ वाघासारखे इंग्रजाना प्रतिकार करणार हे उघड होत गेले.

Buy : Bhagat Singh Book

कुटुंब

शीख धर्मीय असणारे भगतसिंग यांचे कुटुंब स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. त्यांच्या वडिलांचे नाव किशनसिंग व आईचे नाव विद्द्यावती होते. भगतसिंग यांना एकूण 3 भाऊ व तीन बहिणी होत्या. तसेच त्यांचे चुलते अजीतसिंग हे स्वातंत्र्य चळवळीतील आघाडीचे क्रांतिकारक होते. ते गदर या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते. कुटुंबातील असणाऱ्या देशभक्तीपर वातावरणाचा भगतसिंग यांच्या मनावर लहानपणापासूनच प्रभाव पडला होता.(भगतसिंग यांची माहिती)

See More : अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र

शिक्षण 

भगतसिंग यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती. शिक्षण घेत असताना त्यांच्या राजकीय, धार्मिक संकल्पना आकार घेत होत्या. दयानंद अँग्लो वेदिक हायस्कूल मधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. इथे शिकवल्या जाणाऱ्या धार्मिक विचारावर प्रश्न उभे करत त्यांच्यात धर्मनिरपेक्ष असा दृष्टिकोन विकसित होत गेला. शालेय जीवनातच भगतसिंग यांचा संपर्क लाला लजपत राय यांच्याशी आला होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविदयालयीन शिक्षणासाठी त्यांनी लाहोर येथील नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. भगतसिंग यांना इतिहास, तत्वज्ञान आणि राजकारण या विषयात रस असल्याने त्यांनी महाविद्यालयात या विषयावरती प्रचंड वाचन- अभ्यास केला. यातूनच त्यांच्या विचारसरणीवर प्रभाव पडला.

क्रांतिकारी कार्यास सुरुवात 

भगतसिंग यांच्यावर लहानपणापासूनच देशभक्तीचे संस्कार झाले होते. त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेण्याची प्रचंड आवड होती. यासाठी त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी असहकार चळवळीत (1920) शाळेला दांडी मारून सहभाग घेतला होता. पण अचानक झालेल्या चौरी चौरा येथे हिंसक घटनेमुळे(1922)  गांधीजींनी आंदोलन स्थगित केले यामुळे भगतसिंग नाराज होऊन त्यांच्या मनात आक्रमक मार्गाचा वापर करण्याचे विचारसत्र सुरु झाले. असा विचारप्रवाह निर्माण होण्यामागे त्यांनी वयाच्या 12 वर्षी बघितलेले 1919 चे जालीयनवाला बाग हत्याकांड देखील कारणीभूत होते. या हत्याकांडामुळे भगतसिंग यांच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचंड राग बी सुडाची भावना निर्माण झाली होती.(भगतसिंग यांची माहिती)

तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नॅशनल कॉलेजमध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेशी त्यांचा संबंध आला व ते या संघटनेत सामील झाले. आणि येथून पुढे त्यांच्या क्रांतिकारी कार्याला एक दिशा मिळत गेली. 

सॉंडर्सची हत्या 

लाहोर येथे 30 ऑक्टोबर 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपत राय जखमी झाले. व यातच पुढे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश देणाऱ्या स्कॉट या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करण्याचा कट बनविला. पण नीट ओळख न पटल्याने सॉंडर्सची या अधिकाऱ्याला गोळ्या घालून त्याची हत्या केली.(भगतसिंग यांची माहिती)

Read More Biographical Blog

विधानसभेत बॉम्बहल्ला 

ब्रिटिश सरकारने 1929 मध्ये सार्वजनिक सुरक्षा विधेयक आणि व्यापार विवाद कायदा सादर केला होता. या कायद्याद्वारे कामगार संघटना तसेच देशातील चळवळ दडपण्याचा प्रयत्न होता. म्हणून या कायद्याच्या निषेधार्थ भगतसिंग आणि बटूकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेवर बॉम्ब हल्ल्याची योजना आखली. पण या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी करण्याचा हेतू नव्हता. म्हणून भगतसिंग आणि बटूकेश्वर दत्त यांनी विधानसभेत बॉम्ब फोडून तेथून पळून न जाता इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा देत उभे राहिले. पोलिसांनी त्यांना अटक केली व त्यांच्यावर खटला चालवीला. या हल्ल्याद्वारे ब्रिटिश सरकारला जागे करण्याचा तसेच भारतीय जनतेत जागरूकता निर्माण करण्याचा उद्धेश होता. खटला चालू असताना भगतसिंग यांनी कोर्टाचा वापर आपली मते मांडण्यासाठी अत्यंत चलाखीने केला होता.(भगतसिंग यांची माहिती)

तुरुंगातील उपोषण आणि शिक्षा 

मध्यवर्ती कारागृहात भगतसिंग यांनी यूरोपियन आणि भारतीय कैद्यामधील भेदभाव पाहिला. अन्नदेखील व्यवस्थित दिले जात नव्हते. त्यामुळे भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी तुरुंगातच उपोषण सुरु केले. हे उपोषण मोडण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांकडून अत्याचार करण्यात आले तरीही उपोषण चालूच ठेवले. या उपोषणात 63 दिवसाचा उपवास पकडल्याने जतींद्रनाथ दास यांचा मृत्यू झाला. या उपोषणामुळे जनसामान्य लोकांच्यातून सहानुभूती व लोकप्रियता निर्माण होऊ लागली. त्यामुळे सॉंडर्स हत्येचा खटला ज्याला लाहोर कट खटला देखील म्हणतात. तो चालवून भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनवली गेली व त्यानुसार 23 मार्च 1931 रोजी सकाळी फाशी देण्यात आली. ( आपण येथे महात्मा गांधीजीच्या भूमिकेच्या वादविवाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे.)

Read More about Bhagat singh

नास्तिकतेबाबत भगतसिंग यांचे मत 

धर्म क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यात अडथळा आणतो असे भगतसिंग यांचे मत होते.” मी नास्तिक का आहे ” या शीर्षकाचा एक निबंध लिहून नास्तिकतेबाबतची त्यांनी त्यांची मते स्पष्ट केली आहेत. 

भगतसिंग यांचे प्रेरणादायी विचार

1. प्रयत्न करणे हे माणसाचे कर्तव्य आहे. परंतु यश हे संधी आणि वातावरणावर अवलंबून असते. 

2. माझ्या लेखणीला माझ्या भावनांची इतकी जाणीव आहे की मला प्रेम लिहायचे असले तरी इन्कलाब लिहिले जाते.

3. तुम्ही मला मारू शकता पण माझे विचार नाही.

4. क्रांती आणि स्वातंत्र्य हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे.

5. क्रांतीमध्ये नेहमीच संघर्ष असावा असे नाही, क्रांती हा बॉम्ब आणि पिस्तूलाचा मार्ग नाही.

6. आयुष्य आपल्या हिम्मतीवर चालते. दुसऱ्याच्या खांद्यावर अंतिम प्रवास पूर्ण होतो.

सरफोरीशी की तमन्ना आज हमारे दिल मे है, देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल मे है|| 

अशाप्रकारे आपण भगतसिंग यांची माहिती या लेखातून त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या शहिद होण्यापर्यंतचा जीवनप्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भगतसिंग हे वयाच्या 23 व्या वर्षी देशासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणारे महान क्रांतिकारक होते. अशा महान क्रांतिकारकास अभिवादन करून लेखाचा शेवट करतो.

अशीच प्रेरणादायी चरित्रे वाचण्यासाठी आमच्या social media साधनाच्या माध्यमातून कुटुंबामध्ये सामील व्हा. तसेच आपल्या असणाऱ्या सूचना आमच्यापर्यंत पोहचवा आणि हा लेख कसा वाटला? यावर प्रतिक्रिया जरूर द्या.  धन्यवाद!!!

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न.1 भगतसिंग यांचा जन्म किती साली झाला?

उत्तर. भगतसिंग यांचा जन्म 2 सप्टेंबर 1907 रोजी झाला.

प्रश्न.2 भगतसिंग यांचे शिक्षण कोणत्या महाविद्यालयात झाले?

उत्तर. भगतसिंग यांचे शिक्षण नॅशनल महाविद्यालय, लाहोर येथे झाले.

प्रश्न. 3 भगतसिंग यांना फाशी कधी देण्यात आली?

उत्तर. भगतसिंग यांना 23 मार्च 1931 रोजी देण्यात आली.

प्रश्न 4. भगतसिंग यांचे फाशी देण्यात आली तेव्हा वय किती होते?

उत्तर. 23 वय 

प्रश्न 5. भगतसिंग यांच्या वडिलांचे व आईचे नाव काय होते?

उत्तर. भगतसिंग यांच्या वडिलांचे नाव किशनसिंग व आईचे नाव विद्यावती होते.

3 thoughts on “भगतसिंग यांची माहिती : Bhagat Singh Biography in Marathi (Free)”

  1. Pingback: आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक जयंती : Umaji Naik Jayanti 2024 (Free) - Pocket Biography

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top