सचिन तेंडुलकर माहिती मराठी : Sachin Tendulkar Mahiti in Marathi (Free)

“सचिन तेंडुलकर माहिती मराठी” हा लेख खूप खास असा आहे कारण सचिन तेंडुलकर म्हणजे सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे व्यक्तिमत्व आहे. खेळाडू तर खूप आहेत, प्रसिद्धही आहेत पण महान होणारा एखादाच खेळाडू असतो. त्यामध्ये अग्रगण्य असणारे नाव क्रिकेटच्या देवाचे म्हणजे सचिन तेंडुलकर यांचे आहे. सर्वश्रुत आहे की सचिन तेंडुलकर एक महान क्रिकेटर आहेत पण महान होत असताना त्यांच्या जीवनात विविध चढ उतार देखील येत होते. या सर्वांवर मात करत क्रिकेटच्या दुनियेचा बेताज बादशहा बनण्यापर्यंतचा प्रवास आज आपण पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे जीवनचरित्र…..

सचिन तेंडुलकर माहिती मराठी (Sachin Tendulkar Mahiti in marathi)
सचिन तेंडुलकर माहिती मराठी

प्रारंभीक जीवन 

सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्म मुंबई (दादर) येथे एका सारस्वत ब्राम्हण कुटुंबात 24 एप्रिल 1973 रोजी झाला. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर मराठी कवी व कादंबरीकार होते तसेच त्यांच्या आईचे नाव रजनी होते. त्या विमा उद्योग क्षेत्रात कार्यरत होत्या. सचिन यांना 2 भाऊ आणि 1 बहीण आहे. सर्व भावांडामध्ये ते सर्वात लहान आहेत. सचिन यांचे शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर हायस्कूलमध्ये (दादर) पूर्ण झाले. तसेच काही अहवालानुसार सचिन यांनी पुढील शिक्षणासाठी खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला होता पण काही कारणाने त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही.(सचिन तेंडुलकर माहिती मराठी)

Buy : Sachin Tendulkar Autobiography

क्रिकेटची आवड 

सचिन यांना लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्याने त्यांच्या घरच्यांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. त्यांच्या बहिणीने  सचिन 11 वर्षाचे असताना बॅट भेट म्हणून दिली होती. तेव्हापासून सचिन आणि क्रिकेट यांच्यात एक नाते तयार होत गेले. सचिन सुरवातीला त्यांचे मोठे बंधू अजित तेंडुलकर यांच्यासोबत क्रिकेटचा सराव करत होते. त्यांची रुची आणि क्षमता ओळखून त्यांना चेन्नई येथील एमआरएफ पेस फॉउंडेशन मध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले. सचिन यांना सुरवातीला गोलंदाजी आवडत होती पण ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेनिस लिली यांच्या सूचनेनुसार सचिन फलंदाजीकडे वळले. तसेच त्यांना मुंबईमध्ये रमाकांत आचरेकर हे प्रशिक्षक लाभले. यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन यांनी फलंदाजीचा सराव केला. आणि स्थानिक सामन्यात सहभागी होऊ लागले.

See More : मनू भाकेर यांचे जीवनचरित्र

करियर(कामगिरी)

सचिन यांच्या करियरला लहान वयातच सुरुवात झाली. त्यांनी आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली 1988 मध्ये रणजी ट्रॉफी मध्ये खेळू लागले. त्यावेळी त्यांचे वय 15 वर्षे होते. यावेळी त्यांनी पहिला सामना मुंबई विरुद्ध गुजरात असा खेळला आणि पहिल्याच सामन्यात शतक मारून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.

सचिन यांनी प्रगतीचा आलेख उंचावत 1989 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. 15 नोव्हेंबर 1989 ला पाकिस्तान विरुद्ध भारत हा पहिला सामना खेळला. तसेच पुढील सामना फैसलाबाद येथे खेळत असतना त्यांनी पहिले अर्धशतक केले व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडण्यास सुरुवात केली.

सचिन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले कसोटी शतक 1990 च्या इंग्लंड विरुद्ध भारत या सामन्यात झळकावून भारतीय क्रिकेटमधील महत्वपूर्ण खेळाडू म्हणून स्थान मिळविले. तत्कालीन आव्हानात्मक असणाऱ्या गोलंदाजाविरुद्ध सचिन यांनी धावा केल्याने सर्व फॉरमॅट मध्ये खेळण्याची प्रतिभा दाखविली.(सचिन तेंडुलकर माहिती मराठी)

याच प्रतिभेच्या जोरावर सचिन यांनी 1994 मध्ये एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले शतक झळकावले. त्यानंतर 1996 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात सचिन यांना स्थान मिळाले आणि ते सिद्ध देखील करून दाखविले. विश्वचषक स्पर्धेत 2 शतके करून 523 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होण्याचा मान मिळविला.

सचिन यांच्या सर्व सामन्याचा उल्लेख करणे शक्य नसल्याने थोडक्यात महत्वाचे सामने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व सामने खेळत असताना सातत्यपूर्ण धावा करण्याचे अनेक विक्रम केले. पण हे इतके सहज नव्हते. सचिन यांनी त्यांच्या करियर मध्ये अनेक चढ उताराचा सामना केला. पण अपयशाने खचून न जाता आणि यशाने हुरळून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्नाने स्वतःला यशाच्या शिखरावर पोहचविले.

वैवाहिक जीवन (सचिन तेंडुलकर माहिती मराठी)

सचिन यांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमासारखी आहे. सचिन त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावरून येत असताना मुंबई विमानतळावर त्यांना पहिल्या नजरेत अंजली यांच्यावर प्रेम झाले. पण अनोळखी असल्याने सचिन यांच्यासमोर ओळख वाढवण्याचे आव्हान होते. सुदैवाने एका मैत्रिणीच्या माध्यमातून अंजली यांच्याशी ओळख झाली. जवळपास 5 वर्षे रिलेशन मध्ये राहिल्यानंतर 1995 ला दोघांनी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव सारा तेंडुलकर आहे आणि मुलाचे नाव अर्जुन तेंडुलकर आहे. अर्जुन हे देखील एक क्रिकेटर आहेत.

Read More About Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकर यांचे विक्रम (रेकॉर्ड)

1) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके व 96 अर्धशतके 

2) एकदिवसीय सामन्यात एका वर्षात 9 शतकाचा विक्रम (1998)

3) एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारे पहिले क्रिकेटर (24 फेब्रुवारी 2010)

4) कसोटी सामन्यात 51 शतके 

5) कसोटी सामन्यात 20 वय होण्याआधी 5 शतके करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटर 

6) एकूण 100 शतके करणारा एकमेव क्रिकेटर 

7) एकदिवसीय सामन्यात 10 हजार धावा करणारा पहिला क्रिकेटर 

सन्मान आणि पुरस्कार 

1) 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार 

2) 1997 राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार देऊन सन्मान 

3) 1999 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान 

4) 2001 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार 

5) 2008 मध्ये भारत सरकारकडून पद्मविभुषण पुरस्कार देऊन सन्मान 

6) 2012 मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून निवड 

7) 2014 मध्ये भारत सरकारकडून भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान 

निवृत्ती 

सचिन यांच्या गौरवशाली कारकिर्दीचा वाढत्या वयाबरोबर अस्त होत गेला. त्यांनी 2012 मध्ये एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती घेतली. तसेच 2013 मध्ये 200 व्या कसोटी सामन्यात कसोटी प्रकारातून निवृत्ती घेतली.  यावेळी भाषण करत असताना सर्वांचे आभार मानले. सर्व चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळालले होते. प्रत्येक चाहत्याच्या मनात ठसा उमटवून सचिन यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आणि 24 वर्षाच्या गौरवशाली कारकीर्दिला पूर्णविराम मिळाला. असे असले तरी सचिन आज युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. राजकीय क्षेत्रातदेखील कार्यरत आहेत. (सचिन तेंडुलकर माहिती मराठी)

सचिन तेंडुलकर यांच्या संबंधित काही रोचक तथ्य 

1) सचिन यांचे नाव भारतीय संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांच्या नावावरून ठेवले आहे कारण सचिन यांचे वडील बर्मन यांचे चाहते होते.

2) सचिन पहिला रणजी सामना शाळेच्या गणवेशात खेळले होते.

3) सचिन 1992 मध्ये न्यूझिलंड विरुद्ध नाकातून रक्त येत असताना खेळत होते.

4) सचिन उत्तमप्रकारे गोलंदाजी देखील करत होते.

5) लंडनमध्ये सचिन यांचा मेणाचा पुतळा आहे.

6) सचिन यांना टेनिस खेळाविषयी विशेष प्रेम होते. ते जॉन मॅकेन्रोला आदर्श मानत.

7) 2014 मध्ये सचिन यांचे आत्मचरित्र “प्लेईंग इट माय वे” प्रकाशित झाले. यातून त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास मांडला आले.

अशाप्रकारे सचिन तेंडुलकर माहिती मराठी या लेखातून आपण सचिन तेंडुलकर यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. लेख आवडल्यास जरूर प्रतिक्रिया द्या तसेच आपल्या सूचना आमच्यापर्यंत पोहचवा. असेच लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या social media च्या माध्यमातून pocketbiography.com च्या परिवारात सामील व्हा… धन्यवाद!!!

1 thought on “सचिन तेंडुलकर माहिती मराठी : Sachin Tendulkar Mahiti in Marathi (Free)”

  1. Pingback: मनू भाकेर माहिती : Manu Bhaker Information in Marathi - Pocket Biography

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top