नुकत्याच पार पडत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 या स्पर्धेत भारतासाठी ऑलिम्पिक मधील नेमबाजी स्पर्धेत पहिले पदक मिळवण्याचा मान तसेच एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन पदके मिळवणारी स्वतंत्र भारतातील पहिली खेळाडू होण्याचा बहुमान मिळणाऱ्या मनू भाकेर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे. या मनू भाकेर नेमक्या कोण आहेत? त्यांचे वय किती? त्यांची कारकीर्द इ. सर्व बाबी आपण आजच्या या चरित्र लेखातून घेणार आहे. (Manu bhaker information in marathi) pocketbiography. com सर्व क्षेत्रातील नामवंत व्यक्तीची चरित्रे मराठी भाषेतून लिहण्याचा प्रयत्न करत असते. त्याच शृंखलेत आज आपण मनू भाकेर ज्या 10 मी एअर पिस्तूल नेमबाजी खेळाडू आहेत. त्यांच्याबाबत माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती पूर्णपणे मराठी भाषेतून आपणापर्यंत पोहचवण्याचा pocketbiography.com चा प्रयत्न असेल. चला तर जाणून घेऊया मनू भाकेर यांच्याविषयी…..(Manu Bhaker information in marathi)
जन्म (Manu Bhaker Information in Marathi)
फक्त 22 वर्षाच्या असणाऱ्या मनू भाकेर यांचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 रोजी हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया या ठिकाणी झाला. त्यांना लहानपणापासूनच खेळाची प्रचंड आवड होती आणि यात करिअर करण्यासाठी त्यांचे वडील म्हणजे रामकिशन भाकेर यांनी पूर्ण पाठिंबा दिला. रामकिशन हे मर्चंट नेव्ही मध्ये मुख्य अभियंता (Chief Engineer) या पदावर कार्यरत आहेत. व आईचे नाव सुमेधा भाकेर असे आहे मनू भाकेर यांना लहानपणापासूनच नेमबाजी (Shooting) सोबत बॉक्सिंग, टेनिस, स्केटिंग इ. खेळांची देखील आवड होती आणि यात त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील पदके देखील जिंकली आहेत.
करियर
1) मनू भाकेर या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत मिळवलेल्या कांस्य( Bronze) पदक मिळवल्याने सध्या चर्चेत आहेत. पण त्यांनी याआधी अगदी लहान वयात बऱ्याच स्पर्धेत रेकॉर्डब्रेक अशी कामगिरी केली आहे.
2) लहानपणापासूनच नेमबाजीची आवड असणाऱ्या मनूने 2017 साली झालेल्या आशियाई(Asian) स्पर्धेत रौप्य पदक जिंकून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता.
See More : Sachin Tendulkar Biography
3) तसेच याच वर्षी केरळ येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेत त्यांनी 9 सुवर्ण पदके मिळवली. एकाच स्पर्धेत 9 सुवर्ण पदके मिळवण्याचा रेकॉर्ड केला होता. (Manu bhaker information in marathi)
4) मनूने 2018 साली मेक्सिको येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप स्पर्धेत देखील छाप पाडली होती. यावेळी त्यांनी मेक्सिकोच्या अलेजंद्र झावलाला यांना पराभूत करून सुवर्ण पदकाची कमाई केली होती. यावेळी त्यांचे वय अवघे 16 वर्ष होते.
5) तसेच 2018 मधील कॉमनवेल्थ स्पर्धेत देखील त्यांनी सुवर्ण पदक मिळवले होते. तसेच याच वर्षी झालेल्या युथ ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी भारतातील पहिली नेमबाज आणि पहिली महिला ऍथलीट होण्याचा बहुमान मनू भाकेर यांनी मिळवला.
6) दिल्ली येथे 2019 मध्ये झालेल्या ISSF वर्ल्ड कप मध्ये देखील सुवर्ण पदकाची कमाई केली होती. आणि 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक साठी पात्र झाल्या होत्या. (Manu bhaker information in marathi)
7) 2020टोकियो ऑलिम्पिक मध्ये पिस्तूल बिघडल्याने त्यांना या स्पर्धेत पदकाची कमाई करता आली नव्हती.
8) यांनतर निराश न होता पुन्हा जोमाने तयारी करून त्यांनी 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्य( Bronze) पदकाची कमाई करून ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज होण्याचा देखील बहुमान मिळवला.
9) तसेच समिश्र गटात मनू आणि सरबजोत सिंह या दोघांनी मिळून ब्रॉन्झ पदकलाही गवसनी घातली. आणि एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन पदके मिळवणारी स्वतंत्र भारताची पहिली खेळाडू होण्याचा देखील मान मिळविला.याशिवाय त्यांनी आतापर्यंत छोट्या-मोठ्या बऱ्याच स्पर्धेत उत्तुंग अशी कामगिरी करून दाखविली आहे.
Read More Information about Manu Bhaker
मनू भाकेर यांच्याविषयीं काही रोचक तथ्य
1. मनू भाकेर यांना प्रशिक्षणासाठी घेऊन जाता यावे म्हणून त्यांच्या वडिलांनी नोकरी सोडली होती.
2. मनू भाकेर यांना बॉक्सिंगची प्रचंड आवड होती पण डोळ्याला झालेल्या दुखापतींमुळे त्यांनी बॉक्सिंग सोडून नेमबाजी मध्ये करियर करण्यास सुरुवात केली.
3. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवल्यानंतर मनू भाकेर यांनी आपण भगवतगीता वाचून मनःशांती आणि मनाची ताकद वाढवण्याचे प्रयत्न करत असतात. ऑलिम्पिकच्या अंतिम क्षणी गीतेमध्ये सांगितलेल्या शिकवणीनुसार जेवढे तुम्ही करू शकता करायचे नशीब तुमच्या हातात नसते. कर्म करत राहायचे पुढचा विचार करू नये. या विचाराने त्यांनी स्पर्धेत प्रयत्न केले आणि ब्रॉन्झ पदकाला गवसनी घातली.(Manu bhaker information in marathi)
4. मनू भाकेर यांना टोकियो ऑलिम्पिक मधील घटनेमुळे धक्का बसला होता व त्यांनी नेमबाजी सोडून देण्याचा व परदेशात शिक्षण घेऊन नोकरी करण्याचा विचार केला होता. पण तिने यावेळी केलेला जसपाल राणा यांना केलेला फोन कॉल व राणा यांची मदत यामुळे तिने पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतला.
5. मनू भाकेर यांना आईच्या हातचे बटाट्याचे पराठे आवडतात असे त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले.
6. भारतीय नेमबाज मनु भाकरने कांस्यपदक जिंकल्यानंतर त्याची आई सुमेधा भाकर म्हणाली की, “मी दोन्ही मुलांसाठी (मनु भाकर आणि सरबज्योत सिंग) खुप आनंदी आहे. मी काल तिला फक्त एकच सांगितले की नीट खाऊन लवकर झोप आणि आनंदी रहा, जर काही टेन्शन आले तर सगळ्यात आधी मला फोन कर. पण आता तिला जसपाल सरांचे मार्गदर्शन लाभल्याने मला खरचं आनंद झाला. मी आज सकाळी पेपरमध्ये गुरू आणि शिष्य यांच्याबद्दल बातम्या वाचल्या मला खूपच आनंद झाले.
मनू भाकेर संपत्ती (Networth)
एकेकाळी पिस्तूल घेण्यासाठी पैसे नसणाऱ्या मनू भाकेर यांची एका रिपोर्टनुसार 12 कोटीची संपत्ती आहे. 2018 साली झालेल्या युथ ऑलिम्पिक मधील पदकाच्या कमाईनंतर हरियाणा सरकारने 2 कोटीची रक्कम देण्याची घोषणा केली होती. पण यावर ट्विट करून मनूने यास चुनावी जुमला असे म्हटले. वेगवेगळ्या स्पर्धेत मिळालेले बक्षीस, जाहिराती हे मनूच्या उत्पनाचे प्रमुख स्रोत आहेत. मनूला नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठी सरकारकडून देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. मनू भाकेर यांची सोशल मीडिया वर मोठी फॅन फोल्लोविंग असल्याचे दिसते. त्या सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी झोतात असतात. वरील सर्व माहिती काही रिपोर्ट तसेच विकिपीडियाच्या आधारे घेण्यात आली आहे. (Manu bhaker information in marathi)
समारोप
अशाप्रकारे आपली आवड आपली ओळख होऊ शकते आणि त्यात आपण करिअर देखील करू शकतो हा मोलाचा संदेश त्यांच्या चरित्रातून मिळतोय. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता, खचून न जाता धीराने परिस्थितीला सामोरे गेल्यास यश नक्की मिळते. तसेच जे आपल्या हातात ते पूर्णपणे उपयोगात आणणे आणि नशिबाच्या गोष्टी दैवावर सोडून देणे फार गरजेचे असते. आपण आपले प्रयत्न 100% करायचे जे होईल ते पुढे होईल असाच संदेश मनू भाकेर ऑलिम्पिक पदक विजयानंतर सर्वाना देतात. मनू भाकेर यांचे थोडक्यात चरित्र pocketbiography.com ने आपल्यापर्यंत मराठी भाषेतून पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की ही सर्व माहिती आपणास उपयुक्त ठरेल. आपल्या अभिप्रायाची अपेक्षा राहील. तसेच ज्या व्यक्तीबाबत चरित्र पाहिजे असेल ते आम्हाला कळवा आम्ही नक्कीच pocketbiography. com च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद!!!
Very inspiring
Pingback: स्वप्नील कुसळे यांची माहिती : Swapnil Kusale Biography in Marathi - Pocket Biography
Pingback: सचिन तेंडुलकर माहिती मराठी : Sachin Tendulkar Mahiti in Marathi (Free) - Pocket Biography