कुस्तीपटू ते आमदार असा प्रवास करणाऱ्या विनेश फोगाट यांच्या विषयी माहिती घेण्याचा (Vinesh Phogat Husband, Career, Biography) या लेखातून प्रयत्न करणार आहोत. विनेश फोगाट यांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी अत्यंत प्रेरणादायक आहे. ऑलिंपिक पदक मिळवण्यासाठी तीन वेळा केलेले प्रयत्न व त्यासाठी केलेले तयारी ही अत्यंत रोमांचकारी आहे. नियतीला काही वेगळेच मान्य असल्याप्रमाणे ऑलम्पिक मध्ये पदक मिळवण्यात त्यांना अपयश आले. परंतु यातून खचून न जाता अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय क्षेत्रात पदार्पण केले. कदाचित हेच नियतीला मान्य असावे म्हणूनच विनेश यांना पहिल्याच निवडणुकीत यश मिळाले आणि त्या आमदार झाल्या. असा त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया विनेश फोगाट यांच्या विषयी (Vinesh Phogat Husband, Career, Biography)…..
प्रारंभिक जीवन
हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील बलाली या गावात 25 ऑगस्ट 1994 रोजी विनेश फोगाट यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजपाल फोगाट आहे. पण विनेश लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. विनेश यांच्या आईचे नाव प्रेमलता फोगाट आहे. राजपाल फोगाट यांचे बंधू व विनेश फोगाट यांचे चुलते(काका) हे महावीर फोगाट आहेत. महावीर फोगाट हे प्रतिष्ठित द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक असून प्रसिद्ध महिला कुस्तीपटू गीता फोगाट आणि बबीता फोगाट यांचे वडील आहेत. गीता आणि बबीता यांच्या प्रेरणेतूनच विनेश फोगाट या गोष्टीकडे वळल्या. महावीर फोगाट यांनी त्यांना प्राथमिक प्रशिक्षण दिले. त्यांच्यामुळेच विनेश मध्ये शिस्त आणि कुस्ती प्रती प्रेम निर्माण झाले.
Read Here : Manu Bhaker Biography
शिक्षण
विनेश फोगाट यांनी त्यांचे शालेय शिक्षण झोझू कलान येथील के एम सी सीनियर सेकंडरी शाळेतून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी महर्षी दयानंद यूनिवर्सिटी, रोहतक जय हरियाणा राज्यात आहे. येथे प्रवेश घेतला. या युनिव्हर्सिटीमधून विनेश फोगाट यांनी त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना लहानपणापासूनच कुस्ती विषयी आकर्षण असल्याने त्यांनी त्यामध्येच करिअर करण्याचे ठरविले होते.
विवाह ( Vinesh Phogat Husband)
विनेश फोगाट यांच्या पतीचे नाव सोमविर राठी आहे. ते सुद्धा एक कुस्तीपटू आहेत त्यांनी नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये पदक मिळवले आहे. भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करत असताना त्या दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि 2018 मध्ये सोमविर यांनी विनेश यांना इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावर प्रपोज करून लग्नाची मागणी घातली. त्यानंतर 13 डिसेंबर 2018 रोजी विनेश आणि सोमविर यांनी विवाह केला. त्यांनी विवाह मधून एक सामाजिक संदेश दिला. विवाह वेळी सात फेरे घेण्याऐवजी त्यांनी आठ फेरे घेतले आणि आठवा फेरा हा बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ या साठी घेतला होता.
करिअर
विनेश फोगाट यांनी गीता आणि बबीता या आपल्या चुलत बहिणीकडून प्रेरणा घेऊन कुस्तीमध्ये करिअर करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी वाटचाल केले. त्यांचे चुलते म्हणजेच महावीर फोगाट यांच्याकडून त्यांनी कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. स्थानिक स्तरावरील कुस्ती स्पर्धा खेळत खेळत विनेश फोगाट यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये ही स्वतःचे स्थान निर्माण केले.
2013 मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत विनेश फोगाट यांनी कांस्यपदक जिंकून आंतरराष्ट्रीय कुस्ती करिअरला विजयी सुरुवात केली. त्यानंतर त्याच वर्षी दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या राष्ट्रमंडळ कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत रजत पदक (सिल्वर मेडल) मिळविले. विनेश फोगाट यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती करिअर मधील पहिले सुवर्णपदक ग्लासगो येथे 2014 मध्ये झालेल्या राष्ट्रमंडळ कुस्ती स्पर्धेत पटकावले. त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप सिल्वर मेडल मिळवले.
Buy Now : Vinesh Phogat Biography book
अशाप्रकारे यशाच्या एक एक पायऱ्या चढत विनेश फोगाट यांनी 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला. परंतु उपांत्य पूर्व फेरीत विनेश यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्यांना या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. यामुळे त्यांना मोठा भावनिक धक्का बसला. त्यांचे ऑलम्पिक मध्ये पदक मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. परंतु यातून खचून न जाता त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले. आणि आत्मविश्वासाने 2017 मध्ये झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून दाखवून दिले की टायगर अभी जिंदा है. आणि येथून एक नवा प्रवास विनेश यांनी सुरू केला.
2018 मध्ये त्यांनी विशेष असे प्रदर्शन दाखविले. यावर्षी त्यांनी कॉमनवेल्थ स्पर्धा, आशियाई स्पर्धा या सर्वांमध्ये सुवर्णपदके जिंकली. त्यानंतर 2019 मध्ये कझाकिस्तान येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळवले व 2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ओलंपिक साठी त्या पात्र ठरल्या. परंतु याही ऑलम्पिक मध्ये त्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडल्याने त्यांना निराशाच मिळाली. यातूनही पुन्हा त्या उभ्या राहिल्या आणि 2021 मध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, 2022 मध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक, तसेच राष्ट्र मंडळ स्पर्धेत सुवर्णपदक त्यांनी मिळविले.
तसेच 2024 मध्ये झालेल्या पॅरिस ओलंपिक मध्ये त्या उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीमध्ये पोहोचल्या. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. या ही ऑलम्पिक मध्ये वजनावरून काही समस्या निर्माण झाल्याने त्यांना अयोग्य घोषित करण्यात आले आणि त्यांचे ऑलम्पिक चे स्वप्न पुन्हा अपूर्णच राहिले. व त्यानंतर आपल्या खेळाच्या करिअर मधून निवृत्तीची घोषणा केली. कुस्तीमध्ये केलेल्या कामगिरीमुळे विनेश यांना रेल्वे मध्ये ओ एस डी स्पोर्ट्स या पदावर नोकरी मिळाली होती. राजकीय क्षेत्रात प्रवेश करताना त्यांनी रेल्वेच्या नोकरीमधून राजीनामा दिला.
राजकीय क्षेत्रात पदार्पण
2023 मध्ये रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे प्रमुख ब्रीजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळ आणि भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनातून विनेश फोगाट या प्रसिद्धी झोतात आल्या. तसेच त्यांनी कृषी आंदोलनाला देखील पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2024 मध्ये विनेश यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. याच वर्षी हरियाणा विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून जुलाना मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट मिळाले. या निवडणुकीत विनेश यांनी भारतीय जनता पार्टी कडून उभे असणाऱ्या पायलट योगेश कुमार यांचा सहा हजार मतांनी पराभव केला. अशाप्रकारे कुस्तीपटू ते विधानसभा सदस्य प्रवास विनेश यांनी केला.
Read More About Vinesh Phogat Husband
पुरस्कार (Awards)
कुस्तीमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीसाठी विनेश फोगाट यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 2016 मध्ये विनेश यांना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. 2020 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देखील विनेश फोगाट यांना मिळाला आहे.
अशाप्रकारे आपण या लेखातून विनेश फोगाट यांची माहिती (Vinesh Phogat Husband, Career, Biography) घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये अनेकदा आलेले अपयश व त्यातूनही मार्ग काढून पुन्हा नव्याने उभी राहण्याची त्यांची जिद्द खरंच प्रेरणादायक आहे. तुम्हाला लेख आवडला असल्यास जरूर प्रतिक्रिया द्या. तसेच तुम्हाला कोणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्यावर नक्कीच काम करू आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद!!!
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1- विनेश फोगाट यांच्या वडिलांचे नाव काय? (Vinesh phogat father)
उत्तर – विनेश फोगाट यांच्या वडिलांचे नाव राजपाल फोगाट आहे.
प्रश्न 2- विनेश फोगाट यांचे पती कोण आहेत? (Vinesh Phogat Husband)
उत्तर – विनेश फोगाट यांच्या पतीचे नाव सोमवीर राठी असून ते एक कुस्तीपटू आहेत.
प्रश्न 3- विनेश फोगाट यांचे गाव कोणते आहे? (Vinesh phogat village)
उत्तर – विनेश फोगाट या हरियाणा राज्यातील बलाली या गावच्या आहेत.
प्रश्न 4- विनेश फोगाट यांना किती बहिणी आहेत? (Vinesh Phogat Sister)
उत्तर – विनेश फोगाट यांना चुलत व सख्या मिळवून एकूण सहा बहिणी आहेत.
प्रश्न 5- प्रियांका फोगाट या कोण आहेत? (Vinesh Phogat Sister)
उत्तर – प्रियांका फोगाट या विनेश फोगाट यांच्या सख्ख्या बहिणी आहेत. त्या ही कुस्तीपटू आहेत.