Big Boss Winner Suraj Chavan Biography : सुरज चव्हाण जन्म, वय, उत्पन्न, करियर 2024 (Free)

सर्वसामान्य कुटुंबातील, लोक काय म्हणतील याचा विचार न करता फक्त सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर,  स्वतःला प्रसिद्धीच्या शिखरावर गोलीगत घेऊन गेलेला सुरज चव्हाण यांच्याविषयी माहिती देणारा Big Boss Winner Suraj Chavan Biography हा लेख आहे. नक्की हा सुरज चव्हाण कोण आहे? त्याचा गोलीगत धोका, बुक्क्कीत टेंगुळ हा डायलॉग कसा फेमस झाला? सोशल मिडियाने प्रकाशझोतात येणाऱ्या बरेच लोक काही कालावधीतच त्यापासून लांब गेले पण सुरज कसा टिकून राहिला आणि त्याने मराठी बिग बॉस सिझन 5 पर्यंत कशाप्रकारे मजल मारली हे सर्व आपण pocketbiography.com च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया गोलीगत Big Boss Winner Suraj Chavan Biography…..

Big Boss Winner Suraj Chavan Biography
Big Boss Winner Suraj Chavan Biography

कोण आहे सुरज चव्हाण?

सुरज चव्हाण हा एक सोशल मीडिया इनफ्लून्सर आहे. तो सुरवातीला टिकटॉक या अँप वर प्रचंड प्रसिद्ध होता. भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर इंस्टाग्राम आणि यु ट्यूब शॉर्ट्स च्या माध्यमातून रीलस्टार म्हणून पुन्हा प्रकाशझोतात आला. त्याची प्रचंड फॅन फोल्लोविंग असल्याची दिसून येते. इन्स्टाग्राम वर 1.3 मिलीयन (13 लाख ) फोल्लोवर्स आहेत. तो सध्या रील्स सोबत शॉर्ट फिल्म आणि चित्रपटात देखील काम करत आहे. त्याच्या प्रचंड प्रसिद्धीमुळे त्याला मराठी बिगबॉस सिझन 5 मध्ये संधी मिळाली आहे. बिगबॉस मध्येदेखील त्याने आपल्या साध्या जीवनशैलीने आणि स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि मराठी बिग बॉस ची ट्रॉफी सुद्धा जिंकली आहे. (Big Boss Winner Suraj Chavan Biography)

Buy : Biographical Books

जन्म आणि कौटुंबिक परिस्थिती 

सुरजचा जन्म 1994 साली बारामती तालुक्यातील मोडवे या गावी रामोशी समाजातील कुटुंबात झाला. सध्या सुरज याच गावात स्थायिक आहे. सुरज लहान असतानाच त्याचे वडील कॅन्सरने (कर्करोग) झाले. तसेच आईचे देखील आजारपणामुळे निधन झाले. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्याने त्याचा सांभाळ त्याच्या बहिणींनी केला. सुरजला 5 मोठ्या बहिणी आहेत. त्यांनीच त्याला लहानाचे मोठे केले. तो श्री खंडोबाला वडील मानतो तर मरिमाता या त्याच्या कुलदेवीला आई मानतो.

मराठीमध्ये जीवनचरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रारंभीक आर्थिक परिस्थिती व शिक्षण 

लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे सुरजची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. घर चालवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. यासाठी तो मजुरीने कामावर जात. त्याला दिवसाला 300 रु. मजुरी मिळत असे. यातच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. अशा परिस्थितीमुळे सुरजला त्याचे शालेय शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. त्याचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सुरज अत्यंत हलाखीचे दिवस अनुभवले आहेत. पण कितीही संकटे आले तरी सुरजने खचून न जाता हसत हसत सर्व परिस्थितीचा सामना केला. (Big Boss Winner Suraj Chavan Biography)

टिकटॉक स्टार होण्याचा प्रवास 

परिस्थितीशी झगडत असताना सुरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉकची माहिती मिळाली आणि सुरजने टिकटॉकवर इतर कोणाच्यातरी मोबाईल वरून पहिला व्हिडिओ बनविला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. हे त्याला समजल्यानंतर त्याने मजुरी करून मिळालेल्या पैशातून एक मोबाईल घेतला आणि स्वतःची टिकटॉक आयडी काढुन व्हिडिओ बनवू लागला. बघता बघता सुरज त्याच्या हटके स्टाईलने टिकटॉक वर तो प्रचंड प्रसिद्ध होत गेला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि सुरज टिकटॉक स्टार झाला.

अभिजीत सावंत यांचे चरित्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सोशल मीडियाने मिळालेली प्रसिद्धी जास्त दिवस टिकत नाही या मताला सुरज हा अपवाद आहे. सुरजला मिळालेली प्रसिद्धी आजही कायम आहे. टिकटॉक स्टार झालेल्या सुरजने त्याच्या कॅरियरचा आलेख कायम उंचावत ठेवला. त्याचे टिकटॉक वरती लाखो फोल्लोवर्स झाले होते. पण त्याच्या नशिबात संघर्ष लिहिला असल्याने त्याला यश सहजासहजी टिकवता येणे शक्य नव्हते आणि भारतात टिकटॉक वर बंदी आली. 

इंस्टाग्राम व यूट्यूब वरती नव्याने सुरुवात 

टिकटॉक वरती बंदी आणल्यानंतर सुरजने तिथेच हार न मानता आपले नशीब इंस्टाग्राम व यूट्यूब वरती आजमावयाला सुरुवात केली. आधीच फेमस असलेल्या सुरजला इंस्टाग्राम व यूट्यूब वरती देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला. तो सतत त्याच्या शैलीत नवनवीन डायलॉग घेऊन येत असतो. ते प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्याचे डायलॉग लहान लहान मुलांच्या तोंडात सहज ऐकायला मिळतात. त्याच्या डायलॉग चे टी शर्ट सुद्धा बाजारात विकायला येऊ लागलेत.त्यापैकी बुक्कीत टेंगुळ, गोलीगत धोका, झापुक झुपुक आणि SQ, RQ, ZQ इ. त्याचे प्रसिद्ध असे डायलॉग आहेत. त्याने आपल्या व्हिडिओ ने प्रेक्षकांचे मनोरंजन करून त्यांच्या मनात एक स्थान निर्माण केले आहे. आज त्याचे इंस्टाग्राम व यूट्यूब वरती लाखो फोल्लोवर्स आहेत.

Read More about Big Boss Winner Suraj Chavan Biography

चित्रपटात संधी आणि मराठी बिग बॉस मध्ये प्रवेश 

आपल्या विनोदी शैलीने इंस्टाग्राम व यूट्यूब वरती व्हिडिओ बनवू प्रसिद्धीझोतात आलेल्या सुरज चव्हाण ला मोठ्या पडद्यावर देखील काम करण्याची संधी मिळाली. यात 2023 साली प्रकाशित झालेला मुसंडी हा चित्रपट तसेच 2024 मधील राजा राणी या चित्रपटात त्याला अभिनयाची संधी मिळाली. लोकप्रिय झालेल्या सुरजला मराठी बिग बॉस सिझन 5 मध्ये संधी मिळाली आहे. हा शो रितेश देशमुख होस्ट करत आहेत. बिग बॉस मध्ये देखील त्याच्या शैलीने, त्याच्या स्वभावाने आणि माणुसकीने प्रेक्षकांवर जादू केली आहे.आणि तो मराठी बिग बॉस चा विजेता झालेला आहे.

प्रसिद्ध अभिनेते – अभिनेत्री यांचा देखील सुरजला पाठिंबा मिळत आहे. आज सुरज मुळे अशी म्हणायची वेळ आली आहे की बिग बॉस मुळे सुरज प्रसिद्ध नाही झाला तर सुरज मुळे बिग बॉस प्रसिद्ध झाले आहे. आज बिग बॉस हा शो महाराष्ट्रातील घराघरात फक्त सुरज साठी बघितला जातोय. ( त्यापैकी Pocketbiography.com एक आहे)

नेटवर्थ (संपत्ती) (Big Boss Winner Suraj Chavan Biography)

सुरजचे इंस्टाग्राम प्रोमोशन आणि यूट्यूब हे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. तसेच तो रीलस्टार म्हणून विविध ठिकाणी व्यवसाय, कार्यक्रम इ च्या उदघाटन समारंभ साठी जात असतो. यासाठी तो 40-50 हजार घेतो. त्याला सध्या बिग बॉस शो मधून देखील उत्तम असे मानधन मिळत आहे. एकेकाळी एक वेळ उपाशी राहणारा सुरजची आज सर्व गोष्टीतून महिन्याला लाखो रुपयाचे उत्पन्न आहे. पण एवढी प्रसिद्धी येऊनही सुरजचा स्वभाव शांत आहे. कोणत्याही गोष्टीचा त्याला गर्व नाही. पण याच स्वभावाचा फायदा देखील घेतला गेला. आर्थिक व्यवहाराचे ज्ञान नसलेल्या सुरजला बऱ्याच वेळा फसवणूकीचा देखील सामना करावा लागला आहे. (Big Boss Winner Suraj Chavan Biography)

अशाप्रकारे सुरजने गोलीगत शून्यातून त्याचे विश्व निर्माण केले आहे. आपल्या सर्वांसाठी त्याचे जीवन खूप प्रेरणादायी आहे. कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड मनात न बाळगता आपल्या कामावर प्रेम करुन ते सातत्यपूर्ण करत राहिल्याने यश हे मिळतेच त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोलीगत सुरज चव्हाण.. सुरजला असेच यश मिळत राहो…..धन्यवाद!!!

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न – सुरज चव्हाण यांची जात (caste) कोणती आहे?

उत्तर- सुरज चव्हाण यांची जात (caste) रामोशी आहे.

प्रश्न – सुरज चव्हाणचे वय(Age) किती आहे?

उत्तर – सुरज चव्हाणचे वय(Age) 30 वर्षे आहे.

प्रश्न – सुरज चव्हाणच्या गावाचे नाव काय आहे?

उत्तर – सुरज चव्हाणचे गाव बारामती तालुक्यातील मोडवे हे आहे.

प्रश्न – सुरज चव्हाणचे चित्रपट कोणते?

उत्तर – सुरज चव्हाण याने मुसंडी आणि राजा राणी या चित्रपटात भूमिका केली आहे.

प्रश्न – सुरज चव्हाण यांची जन्मतारीख (suraj chavan date of birth)

उत्तर – सुरज चव्हाण यांचा जन्म 1994 साली झाला आहे. 2024 रोजी त्यांचे वय 30 आहे.

3 thoughts on “Big Boss Winner Suraj Chavan Biography : सुरज चव्हाण जन्म, वय, उत्पन्न, करियर 2024 (Free)”

  1. Pingback: ६५ वर्षांच्या काकूंची सूरज चव्हाणला टक्कर; ‘बुक्कीत टेंगुळ’ म्हणत केली जबरदस्त डायलॉगबाजी || Suraj Ch

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top