डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती : Dr. Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi 2024 (Free)

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला आकार देण्याचे आणि संस्कार करण्याचे काम आई वडील यांच्यानंतर शिक्षक करत असतात. असेच एक महान शिक्षक ज्यांचा जन्मदिवस (जयंती) शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ते म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. ते एक प्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ, विद्वान आणि राजकारणी होते. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या जयंतीला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यामागे असलेली प्रेरणादायी गोष्ट तसेच त्यांच्या जीवनातील विविध घटना, त्यांचे कार्य या सर्वांचा आढावा आपण “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती ” (Dr. Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi) या लेखातून जाणून घेणार आहोत. घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर जाणून घेऊया डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी……..

Dr. Sarvepalli radhakrishnan information in marathi
Dr. Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi

प्रारंभीक जीवन 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील (तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सी) चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी  या ठिकाणी 5 सप्टेंबर 1888 रोजी एका तेलगू भाषिक ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिल सर्वपल्ली विरास्वामी हे राज्य महसूल विभागात कार्यरत होते. तसेच त्यांच्या आईचे नाव सीताम्मा होते. डॉ. राधाकृष्णन यांना पाच भावंडे होती. मोठे कुटुंब असल्याने त्यांची आर्थिक स्थिती बेताची होती. त्यामुळे त्यांना लहानपणी सुख सुविधा मिळाल्या नाहीत.

शिक्षण 

डॉ. राधाकृष्णन लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना तिरुपती येथील मिशन स्कूल मध्ये प्रवेश दिला. पण त्यांच्या वडिलांना त्यांनी जास्त न शिकता मंदिरात पुजारी म्हणून काम करावे असे वाटत होते. असे असले तरी त्यांनी मिशन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर उच्च शिक्षणासाठी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दर्शनशास्त्रातून (Philosophy) एम. ए. ही पदवी मिळविली. बुद्धीने कुशाग्र असल्याने डॉ. राधाकृष्णन यांचे संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्तीने झाले. (Dr. Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi)

Buy: Dr. Sarvepalli Radhakrishnan Biography Book

शैक्षणिक कार्य 

दर्शनशास्त्रात एम. ए. पदवी मिळविल्यानंतर डॉ. राधाकृष्णन हे मद्रास रेसिडेन्सी कॉलेज मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याचे दर्शनशास्त्रावरील प्रभुत्व आणि शिकवण्याची ख्याती सर्वदूर झाली. त्यामुळे त्यांची 1918 मध्ये म्हैसूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून निवड झाली. त्यांनतर 1921 मध्ये त्यांना कोलकाता विद्यापीठात शिकवण्याची संधी मिळाली. 1931 पर्यंत म्हणजे 10 वर्षे कोलकाता विद्यापीठात काम केल्यानंतर 1931- 1936 मध्ये त्यांनी आंध्रप्रदेश विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम केले. त्यानंतर पंडित मदनमोहन मालवीय यांनी डॉ. राधाकृष्णन यांना बनारस विद्यापीठात कुलगुरू होण्याची विनंती केली. त्यानुसार 1939 मध्ये त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतली आणि निष्ठेने 1948 पर्यंत जबाबदारी सांभाळली.

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे चरित्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कुलगुरू सारख्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांनी आपण एक शिक्षक आहोत याचा विसर पडू दिला नाही. ते कुलगुरू असतानाही प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे देखील काम करत होते. यावरून त्यांचे शिक्षकी पेशावरील प्रेम आणि विद्यार्थ्यांशी असलेली जवळीक दिसून येते. त्यांनी भारतीय शिक्षण क्षेत्रातील ख्यातीबरोबर परदेशातही आपल्या अध्यापन कौशल्य आणि ज्ञानाची छाप पाडली होती. डॉ. राधाकृष्णन यांनी प्रत्येक वर्षातील काही महिने असे जवळपास 20 वर्षे ऑक्सफोर्ड विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. त्यांच्या जीवनात शिक्षणाविषयी असलेल्या प्रचंड प्रेमामुळेच त्यांनी अथक असे ज्ञानदानाचे काम केले. त्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने आणि लिखाणाने भारतीय संस्कृतीची ओळख संपुर्ण जगाला करून दिली. (Dr. Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi)

राजकीय कार्य 

शैक्षणिक क्षेत्रात छाप पाडल्यानंतर डॉ. राधाकृष्णन यांच्यावर राजकीय जबाबदारी सोपवण्यात येऊ लागली. 1949 ते 1952 या काळात सोवियत युनियन रशियाचे राजदूत म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर 1952- 1962  दरम्यान स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळाला. तसेच डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यानंतर भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड (1962-1967) करण्यात आली. राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ हा आव्हानात्मक होता कारण याच काळात भारत पाकिस्तान युद्ध झाले होते. तरीही त्यांनी योग्य पद्धतीने राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली.

Read More About Dr. Sarvepalli Radhakrishnan information in marathi

शिक्षक दिन का साजरा केला जातो? 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. पण यामागे एक घटना आहे. आपल्या अध्यापन कौशल्याने विद्यार्थी प्रिय असणारे शिक्षक डॉ. राधाकृष्णन यांना त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याविषयी विद्यार्थ्यांनी विचारणा केली होती. त्यावेळी डॉ. राधाकृष्णन यांनी माझा जन्मदिवस साजरा करण्याऐवजी संपूर्ण शिक्षक वर्गाचा गौरव करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जावा त्यामुळे नक्कीच मला आनंद होईल. अशी इच्छा व्यक्ती केली होती आणि त्यामुळेच 1962 पासून भारतात 5 सप्टेंबर या त्यांच्या जयंतीदिवशी शिक्षकदिन साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांनी जवळपास 40 वर्षे ज्ञानदानाचे काम केले होते. त्यांच्याकडे मोठ्या पदांच्या जबाबदाऱ्या असतानाही त्यांनी आपण शिक्षक असल्याचा विसर पडू दिला नव्हता. ते पदांची जबाबदारी सांभाळत शिकवण्याचे देखील काम करत होते. 

समाजाचा विकास सत्ता असल्याने किंवा यांत्रिक प्रगतीने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. म्हणून शिक्षकांचा सन्मान करणे म्हणजे संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान करणे होय. शिक्षकांचे महत्त्व समजल्याशिवाय समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत नाही. ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्ठा असते. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. त्यामुळे सर्वांनी या पवित्र शिक्षण सेवेचा सन्मान केला पाहिजे. (Dr. Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi)

भारतरत्न 

कला, सेवा, साहित्य, मानव विकास, विज्ञान व विश्वशांती, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील तसेच प्रशासकीय सेवा केलेल्या व्यक्तींना व इतर अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय 1954 भारत सरकारतर्फे डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असताना घेण्यात आला. त्यानुसार पहिला भारतरत्न पुरस्कार 1954 मध्ये शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निधन 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आयुष्यभर एका शिक्षकाची भूमिका पार पाडली. ही भूमिका पार पाडत असतानाच त्यांनी देशाच्या विकासासाठी सुद्धा महत्वपर्ण योगदान दिले. यातच त्यांचे दीर्घकालीन आजाराने 17 एप्रिल 1975 ला वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. शरीराने ते उपस्थित नसले तरी शिक्षक दिनाच्या रूपाने आणि त्यांच्या अतुलनीय कामगिरीने ते आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहेत.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रेरणादायी विचार

(Dr. Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi)

1) ज्ञान हे आपल्याला शक्ती देते तर प्रेम हे आपल्याला पूर्णत्वास घेऊन जाते.

2) पैसा आणि सत्ता फक्त जीवनातील साधन आहेत. जीवन नव्हे.

3) आपल्याला माहिती आहे असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपले शिकणे थांबते.

4) पुस्तक वाचन आपल्याला चिंतन आणि खरा आनंद प्राप्त करून देतात.

5) पवित्र आत्मा वाले लोक इतिहासाच्या बाहेर उभे राहूनही इतिहास रचतात.

अशाप्रकारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबाबतची माहिती (Dr. Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi) या लेखातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये जरूर प्रतिक्रिया द्या. तसेच तुम्हाला कोणाबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आमच्यापर्यंत पोहचवा त्यावरती pocketbiography.com ची टीम नक्कीच काम करेल. pocketbiography.com च्या कुटुंबात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी व्हा आणि तुमचे प्रेम सदैव राहूद्या….धन्यवाद!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top