ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र : APJ Abdul Kalam Biography

भारताचे “मिसाईल मॅन” अशी ओळख असणारे, महान शास्त्रज्ञ, भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्राचा pocketbiography. com च्या माध्यमातून आपण मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून आढावा घेणार आहोत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून देशाच्या राष्ट्रापती पदापर्यंत कलाम यांनी केलेला प्रवास हा खरंच प्रेरणादायी आहे. आजही त्यांनी लिहलेली पुस्तके आपणास मार्गदर्शन करत असतात. चला तर सविस्तर जाणून घेऊया ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी….(APJ Abdul Kalam biography)

APJ adbul kalam biography thumbnail
APJ Abdul Kalam Biography

जन्म/प्रारंभीक जीवन 

अब्दुल कलाम यांचा जन्म आजच्या तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे 15 ऑक्टोबर 1931 रोजी एका तामिळ मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दिन अब्दुल मारकायर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दिन कलाम तर आईचे नाव आशिअम्मा होते. अब्दुल कलाम यांचे वडील बोटीचे (छोटी जहाज/नाव) मालक तसेच स्थानिक मशिदीचे इमाम होते. ते तीर्थ यात्रेकरूंना धनुषकोडी ते रामेश्वरम असे बोटीतून घेऊन जाण्याचे काम करत असत. अब्दुल कलाम यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती.त्यामुळे लहानपणी वृत्तपत्रे वाटण्याचे काम कलाम करत होते. त्यांना 3 भाऊ आणि 1 बहीण होती. या सर्वात अब्दुल कलाम सर्वात लहान होते. त्यांच्या कुटुंबातील वातावरण हे खेळीमेळीचे होते. यातून त्यांच्या बालमनावर अत्यंत सुंदर असे संस्कार घडत गेले.

Abdul kalam family
कलाम यांचे कुटुंब ( उजवीकडून दोन नं. अब्दुल कलाम)

शिक्षण (APJ Abdul Kalam Biography)

अब्दुल कलाम यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. त्यांना जरी शालेय शिक्षणात सरासरी गुण मिळत असले तरी ते अत्यंत प्रामाणिक, मेहनती विद्यार्थी म्हणून गौरविले जात. त्यांचे शालेय शिक्षण रामेश्वरम येथेच झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी त्यावेळच्या मद्रास विद्यापीठातील सेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिरापल्ली येथे प्रवेश घेतला. येथे त्यांनी भौतिकशास्त्रात(Physics) पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मधून एरोस्पेस इंजिनयरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अब्दुल कलाम यांचे फायटर पायलट होण्याचे स्वप्न होते. पण त्यावेळी IAF मध्ये 8 जागा होत्या व अब्दुल कलाम यांचा क्रमांक 9 वा होता. त्यामुळे त्यांना थोडक्यात त्या स्वप्नापासून वंचित रहावे लागले.

Read more Biographical Blogs

कारकीर्द (कामगिरी)

अब्दुल कलाम यांच्या कारकिर्दीचा विचार करताना ती दोन भागात विभागता येते. पहिला विभाग शास्त्रज्ञ म्हणून कामगिरी आणि दुसरा विभाग राष्ट्रपती म्हणून कामगिरी. सर्व प्रथम आपण शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कामगिरीबाबत माहिती घेऊ.  (APJ Abdul Kalam Biography)

Buy : A.P.J. Abdul Kalam Autobiography Book

1) शास्त्रज्ञ म्हणून कारकीर्द 

मद्रास इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मधून एरोस्पेस इंजिनयरिंगची पदवी घेतल्यानंतर 1960 मध्ये अब्दुल कलाम संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(DRDO) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागले. तसेच ते विक्रम साराभाई यांच्या प्रमुखतेखाली असणाऱ्या INCOSPAR या समितीचे देखील एका भाग होते. अब्दुल कलाम यांची 1969 मध्ये ISRO मध्ये बदली झाली आणि त्याठिकाणी ते भारताचे पहिले उपग्रह सर्वेक्षण वाहन प्रकल्पाचे (SLV-III)संचालक होते व त्यांनी हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करून रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत तैनात केला. पुढे SLV तंत्रज्ञानाच्या मदतीने बॅलीस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम (IGMDP) या मिशन अंतर्गत अनेक क्षेपणास्त्रे विकसीत केली. उदाहरणार्थ, अग्नी, पृथ्वी, समरिक क्षेपणास्त्रे इ. आहेत. 1992 ते 1999 या काळात अब्दुल कलाम यांनी पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि DRDO चे सचिव म्हणून काम केले. पोखरण-II या अणुचाचण्या देखील याच काळात केल्या होत्या. 2012 मध्ये अब्दुल कलाम आणि सोमा राजू या दोघांनी मिळून आरोग्य सेवेसाठी “कलाम- राजू टॅबलेट” विकसित केला. याशिवाय शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे नाव जगभरात पोहचवण्याचे काम केले.

Abdul kalam
अब्दुल कलाम

2) राष्ट्रपती पदी असताना केलेले कार्य 

तत्कालीन सत्तेत असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) राष्ट्रपती पदासाठी अब्दुल कलाम यांना नामनिर्देशीत केले होते. यावेळी त्यांच्या विरुद्धात लक्ष्मी सेहगल उभ्या होत्या. पण अब्दुल कलाम हे 9,22,884 मतांनी राष्ट्रपती पदावर निवडून आले. 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 या काळात 11 वे राष्ट्रपती म्हणून अब्दुल कलाम यांनी काम पाहिले. त्यांच्या आधी के. आर. नारायण हे राष्ट्रपती होते. अब्दुल कलाम यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता.

राष्ट्रपती पद भूषविणारे ते पहिले वैज्ञानिक व पदवीधर होते. कलाम यांच्या काळात दहशतवादी अफजल गुरु याची दया याचिका आली होती. ही याचिका प्रलंबित ठेवण्याचा कलाम यांनी निर्णय घेतला यामुळे अफजल गुरूला मृत्युंदडाची शिक्षा झाली. चंदीगड येथील चर्चासत्रात लोकसंख्या विचारात घेऊन समान नागरी संहितेचे समर्थन केले होते. तसेच बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय देखील घेतला होता.  (APJ Abdul Kalam Biography)

अशाप्रकारे अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ व राष्ट्रपती असताना कार्य केले होते. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीसाठी कलाम यांनी नकार दिला. राष्ट्रपती पदावरून उतरल्यानंतर अब्दुल कलाम हे विविध शैक्षणिक संस्थामध्ये व्हिझीटींग प्राध्यापक म्हणून काम करू लागले. तसेच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात भूमिका बजावू लागले.

 Apj abdul kalam biography
इंदिरा गांधी समवेत अब्दुल कलाम

मिळालेले पुरस्कार 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना विविध विद्यापीठ, सरकार, संस्था यांच्याकडून मोठं मोठ्या पदव्या, पुरस्कार देऊन गौरविले आहे. यापैकी काही पुरस्कार पुढीलप्रमाणे….

1. पद्मभूषण पुरस्कार – 1981

2. पद्मविभुषण – 1990

3. भारतरत्न – 1998

4. इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार – 1997

5. वीर सावरकर पुरस्कार -1998

6. डॉक्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ इंजिनियरिंग, यासारख्या डॉक्टरेट पदव्या इ.

पुस्तके 

अब्दुल कलाम यांनी त्यांच्या जीवनकाळात ग्रंथ लिखाण देखील केले आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ /पुस्तके पुढीलप्रमाणे…

1. विंग्ज ऑफ फायर हे त्यांचे आत्मचरित्र आहे. या पुस्तकाचे मराठी अनुवाद अग्निपंख या नावाने झाले आहे.

2. इंडिया :- माय ड्रीम 

3. इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम हे एक भविष्याकालीन वाटचालीची दिशा देणारे पुस्तक त्यांनी लिहिले.

4. सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)

5. टर्निंग पॉइंट्‌स इत्यादी. पुस्तके अब्दुल कलाम यांनी लिहिली आहेत.

Read more about Abdul Kalam

अब्दुल कलाम यांची संपत्ती (Netwroth)

राष्ट्रपती पदासारखी मोठी पदे भूषवणाऱ्या व्यक्तीकडे काहीच संपत्ती नव्हती हे माहिती झाल्यावर अब्दुल कलाम हे खरंच निस्वार्थी आणि महान व्यक्ती असल्याची प्रचिती येते. त्यांच्याकडे ऐशोआरामाची कोणतीही गोष्ट नव्हती. त्यांच्याकडे फक्त 2500 पुस्तकांचा संग्रह, 1 घड्याळ, 6 शर्ट, 4 पॅन्ट, आणि एका बुटांचा जोड इतकीच त्यांची संपत्ती होती. ते त्यांचे जीवनयापन पेन्शनच्या पैशावरती करत होते. तसेच राष्ट्रपती असताना मिळालेल्या महागड्या वस्तू त्यांनी सरकारी खजिन्यात जमा केल्या होत्या. त्यांच्या नावावर इतर कोणतीही स्थावर अथवा जंगम मालमत्ता नाही.  (APJ Abdul Kalam Biography)

निधन 

२७ जुलै २०१५ रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे “पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे” या विषयावर व्याख्यान देण्यासाठी ए.पी.जे. अब्दुल कलाम गेले होते. व्याख्यानाच्या आधी त्यांना काही अस्वस्थ वाटले म्हणून थोडी विश्रांती घेऊन नंतर त्यांनी सभागृहात प्रवेश केला. संध्याकाळी सुमारे साडेसाहा वाजता व्याख्यान देत असतानाच ते स्टेज वरून कोसळले. त्यांना बेथनी हॉस्पिटलमध्ये आयसीयु मध्ये दाखल करण्यात आले. पण काही वेळानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  (APJ Abdul Kalam Biography)

अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार

1. आपण झोपेत बघतो ते खरं स्वप्न नसून उघड्या डोळ्याने हे स्वप्न बघतो ते खरं स्वप्न असते.

2. पाऊसापासून वाचण्यासाठी सर्व पक्षी घरट्याचा आधार घेतात. पण गरुड मात्र ढगाच्या वरून उडतो.

3. यशाबद्दलची निष्ठा कणखर असेल तर अपयशाने नैराश्य येत नाही.

4. स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्न पाहणे गरजेचे असते.

5. एखाद्याचा पराभव करणे सोपे असते मात्र त्याला जिंकणे फार अवघड असते.

6. स्वप्ने पहा, त्या दृष्टीने विचार करा आणि कृतीने सत्यात उतरवा.

7. यशस्वी कथा वाचून संदेश मिळतो पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.

8. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला हवेत. हा विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम गुण आहे.

9. जे थांबतात त्यांना फक्त तेच मिळते, जे प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिले आहे.

10. अडचणींनंतर मिळालेले यश खरा आनंद देते.

अशाप्रकारे आपण ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्राचे (APJ Abdul Kalam Biography) विविध पैलू जाणून घेतले. माहिती आवडली असल्यास नक्की अभिप्राय द्या. तसेच आपल्या सूचनादेखील आमच्यापर्यंत पोहचवा. आमच्याशी जोडले जाण्यासाठी सर्वात शेवट दिलेल्या सोशल मीडिया आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद!!!

1 thought on “ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र : APJ Abdul Kalam Biography”

  1. Pingback: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती : Dr. Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi 2024 (Free) - Pocket Biography

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top