अभिनय क्षेत्रात दिसण्यास सुंदर असावे, गोरा असावा, शारीरिक स्थिती आकर्षक असावी अशा प्रचलित परिमाणांना बगल देऊन अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या आणि विनोदी शैलीने खळखळून हसवणाऱ्या गौरव मोरे यांची माहिती गौरव मोरे बायोग्राफी (Gaurav More Age, Wife, Family, Networth, Movies) या लेखातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळख असणारे गौरव मोरे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत.
अत्यंत दारिद्र्याच्या परिस्थितीत मोठे झालेले गौरव मोरे फक्त आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर त्याच्या शिखरापर्यंत पोहोचले आहेत. त्यांचा हा सर्व प्रवास अत्यंत प्रेरणादायी असा आहे. त्यांच्या जीवन प्रवासातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न करू शकतो. यासाठीच आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर जाणून घेऊया गौरव मोरे बायोग्राफी (Gaurav More Age, Wife, Family, Networth, Movies)…
प्रारंभिक जीवन
मुंबईमधील पवई परिसरातील फिल्टर पाडा या झोपडपट्टीत राहणाऱ्या गौरव मोरे यांचा जन्म एक जानेवारी 1998 रोजी झाला. 2024 मध्ये ते 26 वर्षांचे आहेत. (Gaurav More Age) गौरव यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांना राहण्यासाठी साधे घर देखील नव्हते. ते सुरुवातीला उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला ताडपत्री पासून बनविलेल्या झोपडीत राहत होते. त्यानंतर विठ्ठलवाडी येथील झोपडपट्टीत राहण्यासाठी गेले. सध्या ते पवई येथील फिल्टर पाडा झोपडपट्टीत राहतात. गौरव मोरे यांचे वडील बीएमसी मध्ये कामाला होते. गौरव यांच्या संघर्षाच्या काळातच 2015 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा व भावंडांचा सांभाळ त्यांच्या आईने केला. अशाप्रकारे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गौरव यांचे पालनपोषण झाले. पण हीच परिस्थिती व येथील अनुभव गौरव यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरले.
शिक्षण
गौरव मोरे यांना शिक्षणात अजिबात रस नव्हता. त्यांना अभ्यासात आवड नव्हती. पण प्रवाहा बरोबर शिक्षण घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गौरव यांचे शालेय शिक्षण पवई फिल्टर पाडा येथील मिलिंद हायस्कूल येथून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी पदवीच्या शिक्षणासाठी मुंबई येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभिनयाकडे कल असल्याने त्यांच्या शिक्षणात फारसे लक्ष नव्हते. शेवटी त्यांनी महाविद्यालयातून शिक्षण न घेता दुरुस्थ शिक्षण प्रणालीतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अशाप्रकारे अभ्यासात रस नसतानाही गौरव यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
प्रसिद्ध व्यक्तींची जीवनचरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अभिनयाची आवड
गौरव यांना लहानपणापासून टीव्ही, सिनेमा पाहण्याचे प्रचंड भेट होते. ते घरी टीव्ही नसताना शेजाऱ्यांच्या शिव्या खायला लागत असतानाही त्यांच्या घरी जाऊन टीव्ही पाहत असत. ते शाळेत मिमिक्री करून सहकाऱ्यांचे मनोरंजन करत असत. अशाप्रकारे लहानपणी अभिनयाची आवड जपत त्या आवडीला आकार देण्याचे काम महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना केले. त्यांनी कॉलेजमधील विविध फेस्टिवल मध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. नाटक शिकण्यावर भर दिला. एकपात्री नाटकांच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. गणेश मंडळाच्या नाटक स्पर्धेत देखील ते भाग घ्यायचे. यावरून त्यांची अभिनयाची आवड लक्षात येते. शिक्षणाची आवड नसली तरी अभिनयाची आवड जपण्याचे त्यांनी प्रयत्न केले व यातच करिअर केले.
करियर
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नाटकांच्या स्पर्धांमध्ये गौरव मोरे सहभाग घेऊ लागले होते. तसेच जळू बाई हळू व्यावसायिक नाटकात देखील ते भूमिका करत होते. याच काळात प्रसाद खांडेकर यांच्या पडद्या या एकांकिकेत त्यांना संधी मिळाली. आणि येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात झाली. यातून प्रसाद खांडेकर यांच्याबरोबर झालेल्या मैत्रीतून आणि त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांना पुढे इतर नाटकातही संधी मिळाली. एकांकिकेपासून सुरुवात झालेल्या गौरव मोरे यांना पुढे टीव्ही सिरीयल मध्ये तसेच चित्रपटातही काम करण्याची संधी मिळाली.
2015 ते 2020 या काळात त्यांनी बाळकडू, गावठी, संजू, माऊली, सर्व लाईन व्यस्त आहेत, द झोया फॅक्टर, विकी वेलिंगकर यांसारख्या चित्रपटात काम केले. त्यांनी सिरीयल- चित्रपटात काम केले असले तरी त्यांना खरी प्रसिद्धी महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमापासूनच मिळाली. याआधी हास्य सम्राट या विनोदी कार्यक्रमात काम केलेल्या गौरव यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि या संधीचे त्यांनी सोने केले. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेने गौरव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. ते लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे यांच्यानंतर एकमेव असे आहेत ज्यांचे नावच ब्रॅण्ड झाले आहे. गौरव मोरे त्यांच्या विनोदी शैलीने व डायलॉगने आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचा बच्ची डान्सने लोकमानसात प्रिय विनोदी कलाकार बनले आहे. अमिताभ बच्चनचे फॅन असणारे गौरव मोरे फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासोबतच त्यांना दिग्गज अभिनेत्यांसोबत हवा हवाई, अंकुश, बॉईज 4, अल्याड पल्याड यांसारख्या चित्रपटात भूमिका मिळाल्या आहेत. सध्या गौरव मोरे हिंदी विनोदी कार्यक्रम मॅडनेस मचायेंगे मध्ये काम करत आहेत. अशाप्रकारे मराठी सिने सृष्टीतून सध्या ते हिंदी सिने सृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडत आहेत. फिल्टर पाड्याच्या गणेश मंडळातील अभिनयाची सुरुवात आज यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली आहे.
रिलेशनशिप
विनोदी शैलीने लोकांना खळखळून हसवणाऱ्या गौरव मोरे यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जास्त माहिती नाही. परंतु त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ते सिंगल असल्याचे सांगितले आहे. तसेच इतक्यात लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आणि ज्यावेळी लग्न करेल तेव्हा समजून घेणारी शांत स्वभावाची मुलगी लग्नासाठी आवडेल असेही सांगितले. पण ती मुलगी सिने इंडस्ट्री मधील नसावी असे देखील स्पष्ट केले आहे.
Read More : Gaurav More Age, family, biography
संपत्ती (Networth)
हलाखीत दिवस घालवणाऱ्या गौरव मोरे यांच्याकडे सध्या लाखोंची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याकडे 40 ते 50 लाख रुपयांची संपत्ती असल्याचे तसेच विनोदी भूमिकांच्या एका एपिसोड चे ते 35 ते 40 हजार रुपये घेत असल्याचे काही संदर्भातून समजते. तसेच त्यांच्याकडे एक कार देखील आहे.
अशाप्रकारे या लेखातून विनोदी कलाकार गौरव मोरे याच्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. जिद्द आणि सातत्य असेल तर त्याही ध्येयापर्यंत पोहोचता येते प्रेरणा त्यांच्या जीवन प्रवासातून आपणास मिळते. आपणास माहिती आवडली असल्यास जरूर प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला कोणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यावर pocketbiography.com ची टीम नक्की काम करेल. नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून pocketbiography च्या कुटुंबात सहभागी व्हा. धन्यवाद!!!
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1 – गौरव मोरे यांचे वय किती आहे? (Gaurav More Age)
उत्तर – गौरव मोरे यांचे वय 2024 मध्ये 26 आहे. (Gaurav More Age)
प्रश्न 2 – गौरव मोरे यांच्या पत्नीचे नाव काय? (Gaurav More Wife)
उत्तर – गौरव मोरे यांचे अद्याप लग्न झालेले नाही.
प्रश्न 3 – गौरव मोरे यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडली आहे का? (Has Gaurav More left Maharashtrachi Hasya Jatra?)
उत्तर – हो, गौरव मोरे यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून हिंदीमधील विनोदी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.
प्रश्न 4 – गौरव मोरे एका एपिसोड साठी किती रक्कम आकारतात? (How much does Gaurav more earn per episode?)
उत्तर – गौरव मोरे एका एपिसोड साठी 35 ते 40 हजार रुपये आकारतात.
Good And motivational article