आज आपण अशा एका व्यक्ती बाबत जाणून घेणार आहोत की गल्ली बॉय पासून फेमस रॅपर होण्यापर्यंतचा प्रवास केलेला आहे. ते म्हणजे सौरभ अभ्यंकर ज्यांना आपण 100 RBH म्हणून ओळखतो. एक सामान्य गल्ली बॉय ते फेमस रॅपर असा असणारा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी स्वरूपाचा आहे. नृत्याची आवड असणारे सौरभ रॅपकडे कसे वळले व त्यांनी रॅपमध्ये मिळवलेली प्रसिद्धी ही रोमांचकारी आहे. विशेषतः तरुण वर्गाला यातून प्रेरणा मिळेल याच उद्देशाने त्यांच्या बाबतची माहिती लिहिण्याचा प्रयत्न करीत आहोत. चला तर जाणून घेऊया सौरभ अभ्यंकर बायोग्राफी (100 RBH Saurabh Abhyankar Biography)…..
रॅपची आवड
एक सामान्य गल्ली बॉय ते फेमस रॅपर सौरभ अभ्यंकर 100 RBH यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेत असताना त्यांच्यात रॅपची आवड अशा प्रकारे निर्माण झाली हे जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते. (100 RBH Saurabh Abhyankar Biography) रॅपकडे वळण्याआधी सौरभ एक Dancer म्हणून काम करत होते. गणेश उत्सव किंवा सामाजिक कार्यक्रमात ते डान्सर म्हणून काम करत होते. थोडक्यात एक प्रकारे गल्ली डान्सर म्हणून त्यांची ओळख होती. लहानपणापासून नृत्याची आवड असणाऱ्या सौरभ यांना हिप हॉप नृत्य विशेष आवडत असे. या नृत्य प्रकाराबद्दल फारशी माहिती नसली तरी असे काहीतरी असते हे बघून ते नृत्य करत होते. नृत्याची आवड जपत असताना त्यांच्या नजरेत प्रदीप काशीकर नावाच्या एका रॅपर चे रॅप सॉंग आले.
प्रदीप काशीकर हे मराठीतून रॅप सॉंग करायचे हे बघून त्यापासून प्रेरणा घेऊन आपणही असे काहीतरी करू शकतो अशी कल्पना सौरभ यांच्या मनात आली. आणि त्यांनी पहिले मराठी रॅप सॉंग 2013 मध्ये वऱ्हाडी शैलीत अमरावती बाबत माहिती सांगणारे बनविले. हे रॅप सॉंग ते आपल्या मित्रांना ऐकून दाखवू लागले व त्यांच्या मित्रांना ते प्रचंड आवडले. हळूहळू त्यांचे ते रॅप सॉंग अमरावतीमध्ये वायरल होत गेले. त्यावेळी बी बॉय सौरभ अभ्यंकर या नावाने ते स्वतःला संबोधत होते. रॅप व्हायरल झाल्यावर त्यातून अधिक प्रेरणा घेऊन रॅप मध्येच पुढे काम करायचे ठरवले आणि त्यांचा रॅप मधील प्रवास सुरू झाला.
प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
रॅप मधील करियर चा प्रवास
रॅप मध्येच काम करण्याचे ठरवल्यानंतर नवनवीन रॅप लिहिण्यास सौरभ यांनी सुरुवात केली. त्यात त्यांची ओळख अनुराग या रॅपर बरोबर झाली आणि ते दोघे एकत्र येऊन रॅप करू लागले. कॉलेजमध्ये नृत्यासोबत रॅप करण्यास त्यांनी सुरुवात केली. राजेंद्र गोडे पॉलिटेक्निक या कॉलेजच्या स्टेजवर त्यांनी पहिला रॅप सादर केला. हा रॅप अमरावती रॅप या नावाने प्रसिद्ध झाला जो त्यांच्या आयुष्यातील स्टेज वरती सादर केलेला पहिला रॅप होता. आणि यानंतर त्यांचे दर्पण या रॅपरशी ओळख झाली. हळूहळू त्यांची टीम वाढत गेली.
अमरावती रॅप नंतर सौरभने मराठी जनता या नावाचा रॅप बनविला. हे रॅप youtube वरती प्रचंड व्हायरल झाले होते. या मराठीमध्ये असलेल्या रॅप सोबत व्हिडिओ देखील असल्यामुळे प्रचंड धुमाकूळ घातला होता. या रॅप सॉंग मधून मराठी संस्कृती मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. यानंतर सौरभ यांची ओळख मुंबईमधील नेजी आणि मवाली या रॅपर सोबत झाली. यांना भेटण्यासाठी व रॅप मधील धडे शिकण्यासाठी ते अमरावती वरून मुंबईला सकाळी जायचे आणि संध्याकाळी परत यायचे अशा प्रकारचे प्रचंड मेहनत घेत होते. त्यांच्याकडून रॅप मधील बारीकसारी गोष्टी शिकल्यानंतर सौरभ यांच्या रॅपच्या करिअरने एक गती पकडली आणि त्यानंतर त्यांनी वळून मागे बघितलेच नाही. हळूहळू त्यांचे एक एक रॅप बाहेर येऊ लागले.
सौरभ यांचे रॅप शक्यतो सामाजिक विषयांवर आधारित असतात ज्याला कॉन्शियस रॅप असे म्हणतात. यानंतर सौरभ हे स्वदेशी या रॅप ग्रुप सोबत जोडले गेले. ज्यात ते कमाई बरोबर रॅप करू लागले. आणि रॅपकडे करिअर म्हणून बघू लागले. हळूहळू त्यांची रॅप लिहिण्याची रचनात्मकता आणि शैली विकसित होत गेली. मानवी भाव भावना, निसर्ग, सामाजिक परिस्थिती, ऐतिहासिक बाबी याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघून ते रॅपच्या प्रवाहात आणण्याचे काम करू लागले. त्यांनी मराठी भाषेतील विशेष शैलीत बनविलेले रॅप लोकांच्या पसंतीस पडू लागले आणि 100 RBH हे नाव प्रसिद्ध होऊ लागले. त्यांनी त्यांच्या रॅप मधून मांडलेल्या गोष्टी समाज प्रबोधनाचे काम करतात.
सामाजिक प्रबोधन करण्याच्या उद्देशानेच ते रॅप लिहीत असतात. त्यांच्या रॅप मध्ये मराठीतील पोवाडे, ढोल ताशाच्या आवाजासह असणारी एनर्जेटिक गाणी, भीम गीते या सर्वांचे मिश्रण दिसून येते आणि हेच मिश्रण लोकांना प्रचंड आवडते.
त्यांच्या विशेष शैलीसह ते MTV Hustle या शो मध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांची प्रसिद्धी शिखरावर पोहचली. या शोमध्ये देखील त्यांनी कॉन्शियस रॅप आणि मराठी भाषा सोडली नाही. ते येथेही समाज प्रबोधनपर रॅप सादर करत होते. येथे बनविलेल्या रॅप सॉंग ने सर्वांची मने जिंकून घेतली. त्यापैकी पॉर्न, अमरावती पोट्टा, फुल इज्जत, हिस्टॉरिक डॉन इ. रॅप सॉंग प्रचंड प्रसिद्ध झाले आणि त्यांची ओळख एक क्रांतिकारी रॅपर म्हणून होऊ लागली. सध्या सौरभ सलीम मर्चंट यांच्यासोबत भूमी 2024 मध्ये काम करत आहेत आणि मराठी भाषेतील व भारतातील प्रसिद्ध रॅपरच्या रांगेत त्यांनी स्थान मिळवले आहे. (100 RBH Saurabh Abhyankar Biography)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव
बहुजन वर्गातील असणाऱ्या सौरभ अभ्यंकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घेतली आहे. ते बाबासाहेबांना आपले आदर्श मानतात. ज्याप्रमाणे एका दलित कुटुंबातील मुलाला शिक्षण घेण्याचा अधिकार नसताना देखील त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण करून एक प्रकारची क्रांती घडवून आणली. त्याच उद्देशाने सौरभ समाज प्रबोधन पर रॅप तयार करून लोक जागृती घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. लहानपणापासून त्यांनी ऐकलेली भीम गीते जी बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाबाबत माहिती देतात त्यातून प्रेरणा घेऊन त्या गीतांना किंवा माहितीला रॅपच्या फॉर्ममध्ये मांडून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्या रॅप वरती आणि विचारावरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव असल्याचे दिसून येते.
Read More : Saurabh abhyankar biography
आकर्षणाच्या सिद्धांतावर विश्वास
सौरभ अभ्यंकर यांनी दिलेल्या विविध मुलाखतीमध्ये त्यांनी आकर्षणाच्या सिद्धांताचा वारंवार उल्लेख केल्याचे दिसून येते. त्यांच्या वाचनात आलेल्या secret या पुस्तकातून त्यांना या सिद्धांताबाबत माहिती मिळाली होती. ते सांगतात की ते त्यांच्या आयुष्यात कायम सकारात्मक असतात आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळालेली आहे असे मानतात. त्यासाठी लागणारी प्रचंड इच्छाशक्ती विकसित करून या सिद्धांताचा अवलंब करण्याचा ते प्रयत्न करत असतात. तसेच संधी कोणत्या रूपात येईल हे सांगू शकत नाही त्यामुळे आलेली संधी ओळखता आली पाहिजे आणि ती पकडून त्या संधीचे सोने करता आले पाहिजे हे ते आवर्जून सांगतात. त्यांना मिळालेल्या यशाचे श्रेय ते त्यांच्या कौशल्याला देतातच पण त्याचबरोबर आकर्षणाच्या सिद्धांताला (Law of Attraction) देखील देतात. (100 RBH Saurabh Abhyankar Biography)
अशाप्रकारे आपण 100 RBH म्हणजेच सौरभ अभ्यंकर यांची बायोग्राफी (100 RBH Saurabh Abhyankar Biography) जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आत्तापर्यंत लिहिल्या गेलेल्या लेखांपैकी हा लेख विशेष असा आहे. कारण यामध्ये सौरभ यांच्या कुटुंबाबाबत , शिक्षणाबाबत, सामाजिक परिस्थिती बाबत तसेच त्यांच्या जन्माबाबत कोणतीही माहिती देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचा असणारा प्रवासच इतका प्रेरणादायी आहे की त्यांच्या जन्माबद्दल किंवा कुटुंबाबद्दल माहिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामुळे Pocketbiography.com ने लिहिलेल्या बायोग्राफी पैकी सौरभ अभ्यंकर यांची लिहिलेली बायोग्राफी (100 RBH Saurabh Abhyankar Biography) ही विशेष अशी आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची इतर माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही किंवा रंगवून सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी त्यांची एवढीच माहिती पुरेशी आहे असे वाटते.
सौरभ अभ्यंकर यांची बायोग्राफी (100 RBH Saurabh Abhyankar Biography) आवडली असल्यास जरूर प्रतिक्रिया द्या तसेच तुम्हाला कोणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्यावर नक्कीच काम करू आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद!!!