जाणून घ्या हरिभाऊ बागडे(Haribhau Bagade) यांच्याविषयी

नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रपती भवनातून अनेक राज्यातील राज्यपालांच्या नेमणूकीची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील एका नेत्याचे देखील नाव आहे. ते म्हणजे विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे ( Haribhau Bagade). यांची राजस्थाच्या राज्यपालपदी नेमणूक झाली आहे. चला तर जाणून घेऊया हरिभाऊ बागडे यांच्याविषयी…

हरिभाऊ बागडे (Haribhay Bagade)
राजपाल हरिभाऊ बागडे ( Haribhau Bagade)

जन्म ( Haribhau Bagade)

औरंगाबाद (सध्याचे संभाजीनगर ) जिल्यातील चितेपिंपळ गाव येथे 17 ऑगस्ट 1945 रोजी हरिभाऊ बागडे यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव हरिभाऊ किसनराव बागडे आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी वृत्तपत्रे विकण्याचे देखील काम केले आहे. त्यांनी शेतीची विशेष अशी आवड आहे. याच कारणाने त्यांनी आपल्या घराचे देखील नाव कृषी योग असे ठेवले आहे. हरिभाऊचे राहणीमान अत्यंत साधे आहे.

Buy : Biographical Books

शिक्षण 

हरिभाऊ बागडे यांच्या कुटुंबातील त्यांच्या आधी कोणीही शाळेत गेलेलं नव्हते. हरिभाऊ कुटुंबातील पहिले होते ज्यांनी शाळेत प्रवेश घेतला होता. त्यांनी 10 वी पर्यंतचे शिक्षण सरस्वती भुवन शाळेतून घेतले. व त्यानंतर शेती कामाची आवड असल्याने ते शेतीत पूर्णवेळ काम करू लागले. शेतकरी असल्याचा त्यांना रास्त अभिमान आहे. यामुळे त्यांचा पेहराव देखील नेहमीच पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी अशाच पद्धतीचा असतो.

Read More Biographical Blog

आणीबाणी मध्ये कार्य 

हरिभाऊ बागडे यांनी अजिबाणीच्या काळात RSS आणि जनसंघाच्या भूमिगताना मदत करण्याचे काम केले होते. आणीबाणीच्या घटना लोकांपर्यत पोहचवण्याचे काम देखील करत. आणीबाणीच्या काळातील धकधकीमुळे त्यांना एका कानाने अपंगत्व देखील आले आहे असे त्यांनीच विधानसभेत स्पष्ट केले होते. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता काम करत असल्यामुळे असे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 

राजकीय कारकिर्दीची सुरुवात 

हरिभाऊ वयाच्या 13 व्या वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सोबत कार्य करत होते. त्यांची कामाप्रति असलेली निष्ठा व कार्य करण्याची पद्धत यामुळे त्यांची लोकप्रियत्ता वाढत गेली. वाढत्या लोकप्रियतेमूळे हरिभाऊ यांना भारतीय जनता पक्षाकडून 1985 साली फुलंब्री मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले गेले. व या निवडणुकीत ते निवडून आले. त्यांनतर ते सलग 4 वेळा ते आमदार झाले. 1995 ते 1999 च्या दरम्यान मनोहर जोशीच्या मंत्रिमंडळात ते मंत्री म्हणून देखील कार्यरत होते. 2014 मध्ये देखील ते फुलंब्री मतदारसंघातून निवडून आले होते व त्यांनी 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्र 13 व्या विधानसभेचे 14 वे अध्यक्षपद देखील भूषविले आहे. जनता व प्रियजन त्यांना नाना म्हणून संबोधतात. ( Haribhau Bagade)

राज्यपालपदी निवड 

27 जुलै 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी राजस्थानच्या राज्यपालपदी हरिभाऊ बागडे यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या आधी राजस्थान चे असणारे राज्यपाल कलराज मिश्र यांचा कार्यकाळ 21 जुलै रोजी संपला होता. त्यांनतर राजस्थानच्या राज्यपाल पदी हरिभाऊ बागडे यांची वर्णी लागली आहे. 

Haribhau bagade संपत्ती 

हरिभाऊ यांनी 2019 च्या निवडणुकीच्या सादर केलेल्या अर्जनुसार त्यांची एकूण संपत्ती 25 कोटी आहे. ही संपत्ती LIC, बॉण्ड्स, जमीन गुंतवणूक आणि काही रक्कम रोख स्वरूपात असल्याचे स्पष्ट केले आहे.

अशाप्रकारचे विविध विषयावरील, विविध क्षेत्रातील व्यक्तीची चरित्रे, त्यांच्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी pocketbiography.com या वेबसाईट ला follow करा. तुमच्या सर्वांच्या असणाऱ्या सूचना कंमेंट मधून तसेच प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट फॉर्म भरून आमच्यापर्यंत पोहचवा. तुम्हाला ज्यांच्याबद्दल माहिती हवाज आहे ते suggestions देखील आम्हाला सुचवा आम्ही नक्कीच त्यावर माहिती प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला लेख आवडत असतील तर त्याचा प्रतिसाद /अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पोहचवा. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम असेच राहूद्या. धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top