छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ( History of Shivaji Maharaj in Marathi)

 छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
(History of shivaji maharaj)
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
(History of Shivaji Maharaj in Marathi )

जागतिक इतिहासात काही महान राजे-महाराजे होऊन गेले. त्यापैकी Pocket Biography या ब्लॉगच्या माध्यमातून आपण परिश्रम, पराक्रम आणि जिद्दीमुळे जगात ‘महान’ म्हणून ओळखल्या गेलेल्या व महान राजांच्या यादीत अग्रगण्य स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजही आपल्याला जगण्याची प्रेरणा देतो, दिशा देतो, त्यामुळे तो इतिहास व महाराजांचे जीवनचरित्र जाणून घेणे अपरिहार्य ठरते. (छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास)

जन्म 

शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. परंतु महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे 19 फेब्रुवारी 1630 ही शिवाजी महाराजांची जन्मतारीख म्हणून स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांचा जन्म वेरूळच्या भोसले घराण्यात जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. मातोश्री जिजाबाईंनी गडावरील शिवाई देवीच्या नावावरून आपल्या मुलाचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवले.

Buy: Chhatrapati Shivaji Maharaj Biography Book

शिक्षण 

शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे स्वतः विद्वान होते. विद्वानांचा आश्रयदाता असा त्यांचा लौकिक होता. शहाजी राजे यांनी शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, त्यांच्या मुलाने ‘स्वतंत्र राज्य’ स्थापन करावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून विविध कला आणि शास्त्रांमध्ये पारंगत असलेले सुप्रसिद्ध शिक्षक शहाजीराजांनी पुणे प्रांतात पाठवले.यामुळे शिवाजी महाराज श्रुती, स्मृती, पुराण, राजकारण, सर्व शास्त्रे, कसरती, तलवारबाजी, घोडेस्वारी, शर्यत, भालाफेक, वास्तुविद्या, पट्टा, धनुर्विद्या, किल्ले बांधणे, युद्धनीती यात पारंगत झाले. तसेच स्वानुभवातून देखील महाराजांची वेगवेगळ्या नीती- धोरणे आत्मसात केली.

विवाह 

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहताना वारंवार त्यांच्या विवाहाविषयी बोलले जाते. त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. विविध कारणांमुळे शिवाजी महाराजांना 8 पत्नी होत्या. 1) सईबाई (निंबाळकर) 2) सोयराबाई (मोहिते) 3) पुतळाबाई (पालकर) 4) गुणवंताबाई (इंगळे) 5) सगुणाबाई (शिर्के) 6) काशीबाई (जाधव) 7) लक्ष्मीबाई (विचारे) 8) सकवारबाई (गायकवाड)

वेगवेगळ्या सुभेदार घरण्यातील मुलींशी विवाह करण्याचे कारण पुढीलप्रमाणे :- मराठा राज्य हे नवे असल्यामुळे मुघल, आदिलशाही, सिद्दी इत्यादींच्या प्रचंड लाटेचा सामना करावा लागत होता. सीमा, लोक, व्यापार आणि पैशाचा प्रवाह या बाबतीत राज्य स्थिर करणे आवश्यक होते. हे सर्व साध्य करण्यासाठी शिवाजी महाराजांचे सर्वात महत्वाचे साधन शस्त्रास्त्रे किंवा दारूगोळा नसून लोक होते. लोकांशी संबंध वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना कुटुंबात समाविष्ट करून घेणे. यामुळे त्यांची राज्याप्रती निष्ठा निश्चित होईल, महाराजांचा विश्वासघात करण्याचा विचार ते करणार नाहीत.

स्वराज्याची स्थापना 

मातोश्री जिजाबाई बंगलोरहून पुण्यात आल्यावर त्यांनी जहागिरीचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. बाळराजे कारभारावर बारीक लक्ष ठेवून होते. पुण्यातील आपल्या जहागीरीतील डोंगर दऱ्यातून फेरफटका मारताना बाळराजे खूप काही शिकले. डोंगर दऱ्यातील चोर मार्गांची माहिती मिळवली. किल्ल्यांची संरक्षण व्यवस्था ज्ञात केली. तसेच यवनी आक्रमणामुळे रयतेची झालेली दयनीय अवस्था त्यांना अस्वस्थ करू लागली. परगण्यातील हिशेब व महसूल यांची माहिती असल्याने शिवाजी राजे रयतेच्या संपर्कात आले. रयतेच्या सुख-दुःखाची त्यांना जाणीव झाली. शिवाजी राजांनी परकीयापासून रयतेवर होणारे अन्याय-अत्याचार थांबवण्यासाठी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला आणि १६४६ मध्ये आदिलशाहीकडून अतिशय भक्कम आणि मजबूत तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याची उभारणी केली. 1650 पर्यंत पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती, मावळ भागातील किल्ले आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्य विस्तार करू केला. तसेच साम,दाम दंड, भेद या धोरणाचा वापर करून स्वराज्य बळकट केले.

महत्वाच्या घटना (शिवपराक्रम ) (छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास)

महत्वाच्या घटना (शिवपराक्रम )दिनांक/ वर्ष
जावळी मोहीम – चंद्रराव मोरे यांचा पराभव – जावळी ताब्यात 1656
अफझलखानाचा वध (प्रतापगड)१० नोव्हेंबर १६५९
सिद्धी जोहरचा पन्हाळ्याचा वेढा २ मार्च १६६०
महाराज वेढ्यातून सुखरूप सुटले. १२ जुलै १६६०
शाहिस्तेखानचा पराभव ५ एप्रिल १६६५
सुरतवर स्वारीजानेवारी १६६४
पुरंदरचा तह – छ.शिवाजी महाराज आणि राजा जयसिंग  14 जून 1665
महाराजांचे आग्र्याहून पलायन17 ऑगस्ट 1666
रायगड – महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674

lets get in touch with us

प्रशासन 

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेताना प्रशासन व्यवस्थेबाबत माहिती घेणे महत्वपूर्ण ठरते. शिवाजी महाराजांची प्रशासकीय व्यवस्था आणि कार्यपद्धती अतिशय प्रभावी होती. राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालून महाराजांनी स्वराज्यात सक्रिय व्यवस्थापन निर्माण केले. महाराजांचे व्यवस्थापन पुढील शब्दांत स्पष्ट करता येईल.

१) सरकारी अधिकाऱ्यांची निवड त्यांच्या गुणवत्तेवर केली जात असे.

2) अधिकारी आणि सैनिकांना रोखीने वेतन दिले जात असे. 

3) सर्व प्रशासकीय काम विविध विभागांमध्ये विभागले होते.

4)महसूल खात्यावर महाराजांचे नियमित लक्ष असे.

5) महाराजांनी मंत्रिमंडळाची संकल्पना स्वराज्यात मांडली आणि त्यानुसार स्वराज्याची कार्ये 8 वेगवेगळ्या विभागात विभागली गेली.

त्याला ‘अष्टप्रधान मंडळ’ असे म्हणतात:-

1.पेशवा – पंतप्रधान

2. अमात्य – महसूल मंत्री

3. सचिव – अर्थमंत्री

4. मंत्री – गृहमंत्री

5. सेनापती – सेनापती

6. सुमंत – परराष्ट्र व्यवहार मंत्री

7. न्यायाधीश – मुख्य न्यायाधीश

8. पंडित – धार्मिक मंत्री 

पंडित आणि न्यायाधीशांव्यतिरिक्त, इतर सर्व मंत्र्यांना त्यांच्याकडे सोपवलेल्या खात्याच्या जबाबदाऱ्यांशिवाय सैन्याचा भाग म्हणून काम करावे लागे. अशा प्रकारे महाराजांनी कार्यक्षम प्रशासन व्यवस्था राबवली होती. ज्याद्वारे लोकहिताला केंद्रस्थानी ठेवून प्रशासन यंत्रणा तयार करण्यात आली. राज्यातील रयतेला विविध सोयीसुविधा देऊन, महसुली दरात कपात, दुष्काळात महसुलातून सूट, महिलांचा आदर, शेतकऱ्यांचा आदर, जातीधर्मातील एकता, प्रेम या गोष्टी करून महाराजांनी कल्याणकारी राज्य निर्माण केले आणि त्याची मुळे समाजात खोलवर रुजवली. राज्य मजबूत केले. भक्कम पायाभरणीमुळेच भारताच्या इतिहासात मराठा राज्य एक साम्राज्य म्हणून उदयास आले. (छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास)

know more about Chhatrapati Shivaji Maharaj

निधन (मृत्यू )

3 एप्रिल 1680 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. एक महान राज्यकर्ता, एक महान राजा, मराठा साम्राज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे, एक पराक्रमी, निष्ठावान योद्धा, आपल्या पराक्रमाने इतिहास घडवणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येकाच्या मनात सुवर्णक्षराने कोरले गेले आहे. महाराजांच्या अतुलनीय कामगिरीमुळे महाराजांना आराध्यदैवत मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला जगण्याची एक दिशा देतो. त्यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन महाराजांची शिकवण पुढे चालू ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, अशी अपेक्षा करतो. 

राजमुद्रा  (Royal Seal)

Chh. Shivaji Maharaj Rajmudra (Seal)

6 thoughts on “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ( History of Shivaji Maharaj in Marathi)”

  1. Tushar Dilip Rajage

    Great 👍 असाच इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहचवला पाहिजे !

  2. Pingback: रवींद्रनाथ टागोर : जीवनचरित्र - Pocket Biography

  3. Pingback: राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी 2024 : Ahilyabai Holkar Punyatithi 2024 - Pocket Biography

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top