स्वप्नील कुसळे यांची माहिती : Swapnil Kusale Biography in Marathi

महाराष्ट्राच्या मातीतला हिरा, कोल्हापूरचा मराठमोळा गडी, खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल 72 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारे दुसरे महाराष्ट्रीयन स्वप्नील कुसळे यांची माहिती (Swapnil Kusale Biography in Marathi) या लेखात घेणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्राला 1952 नंतर म्हणजे खाशाबा जाधव यांच्या ऑलिम्पिक पदाकानंतर दुसरे पदक मिळविण्याची असलेली आशा 2024 मध्ये स्वप्नील कुसळे यांनी पूर्ण करून सर्वांचेच हृदय जिंकून घेतले. कांबळवाडी सारख्या छोट्या गावातून येऊन पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेता होणाऱ्या 29 वर्षीय स्वप्नीलचा फार रंजक असा प्रवास आहे. त्यांना लहानपणापासूनच नेमबाजीची आवड होती व त्यासाठी महेंद्रसिंग धोनीला आदर्श मानून त्यांचे गुण आत्मसात करून देशाचा झेंडा उंचावण्याचे स्वप्न पाहिले होते आणि पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ पदक मिळवून ते पूर्ण देखील केले. असा हा स्वप्नील यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास या लेखात जाणून घेऊया.(Swapnil Kusale Biography)……

Swapnil Kusale Biography in Marathi
Swapnil Kusale Biography in Marathi

जन्म 

स्वप्नील कुसळे यांचा जन्म पुणे येथे 6 ऑगस्ट 1995 रोजी झाला आहे. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी आहे. त्यांचा वडिलांचे नाव सुरेश कुसळे आहे. ते शिक्षक आहेत. तसेच स्वप्नील यांच्या आईचे नाव अनिता कुसळे असून त्या कांबळवाडी गावच्या सरपंच आहेत. 

Buy : Biographical Books

शिक्षण 

स्वप्नील कुसळे यांचे शिक्षण नाशिकच्या भोसले मिलिटरी कॉलेजमधून झाले आहे. त्यांनी या कॉलेजमधून बी. ए. ची पदवी घेतली आहे. मिलिटरी कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याने त्यांच्यात शिस्त आणि देशाप्रति प्रचंड निर्माण झाल्याचे लक्षात येते. स्वप्नील हे 2008 च्या ऑलिम्पिकवेळी 12 वी ला होते. तेव्हा त्यांनी फक्त अभिनव बिंद्राला खेळताना बघण्यासाठी 12 वीच्या परीक्षेकडे दुर्लक्ष केले होते. तसेच त्यांनी ती मॅच पाहण्यासाठी 12 वीचा पेपर देखील बुडविला होता. यातून त्यांची नेमबाजीचे प्रेम अधोरेखित होत आहे. यामुळेच 2009 मध्ये स्वप्नील यांना वयाच्या 14 व्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेमध्ये दाखल केले. आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्रातील शिक्षण सुरु झाले.

महेंद्रसिंग धोनीच्या जीवनाशी साम्य

स्वप्नील कुसळे आणि क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी या दोघांची जीवनकहाणी एकसारखीच असल्याचे दिसून येते. ज्याप्रमाणे धोनी करिअरच्या सुरुवातीला तिकीट कलेक्टर म्हणून काम करायचा. तसेच स्वप्नील देखील 2015 पासून मध्य रेल्वेत काम करत आहेत. स्वप्नील यांनी स्वतःच एका मुलाखतीत ते धोनीला आदर्श मानत असल्याचे सांगतात. तसेच धोनीचा बायोपीक अनेक वेळा पाहून त्यातून प्रेरणा घेऊन खेळाचा सराव सतत चालू ठेवत असल्याचे देखील सांगितले. ज्याप्रमाणे धोनी खेळाच्या मैदानावर शांत व संयमी असतो. तेच गुण नेमबाजीसाठी देखील आवश्यक असतात. त्यामुळे स्वप्नील त्यांच्या आयुष्यात धोनीला आदर्श मानतात.

Read Here Manu Bhaker Biography

नेमबाजी ची आवड 

शालेय जीवनापासूनच स्वप्नील यांना नेमबाजीची आवड होती. स्वप्नील 9 वीत असताना त्यांना सायकलिंग किंवा नेमबाजी पैकी एक खेळ निवडायला सांगितला असता त्यांनी नेमबाजी निवडली होती आणि पहिल्यांदा रायफल उचलून 10 पैकी 9 वेळा अचूक निशाणा साधला होता. तसेच वरती सांगितल्याप्रमाणे त्यांनी अभिनव बिंद्रा ची मॅच पाहण्यासाठी 12 वीचा पेपर देखील बुडविला होता. यावरून स्वप्नील यांचे नेमबाजीवरील प्रचंड प्रेम लक्षात येते. ( Swapnil Kusale Biography)

करियर (कामगिरी)

2009 मध्ये महाराष्ट्र क्रीडा प्रबोधिनी योजनेमध्ये घेतलेल्या प्रवेशापासून खऱ्या अर्थाने नेमबाजी मधील प्रशिक्षण सुरु झाले होते. त्यानंतर 2015 साली कुवेत येथे झालेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये जुनिअर गटात 50 मीटर रायफल प्रोन 3 पोझीशन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आणि नेमबाजी कारकिर्दीला सुवर्ण सुरुवात केली. ही कामगिरी अशीच पुढे चालू ठेवून छोट्या मोठ्या स्पर्धेत नाव कोरून प्रसिद्धी मिळविली. तुघलकाबाद याठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेता गगन नारंग आणि चैन सिंग यांचा पराभव करून विजेतेपद पटकविले. 

स्वप्नील यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सर्वात मोठी सुरवात 2021 मध्ये ISSF विश्वचषक जिंकून जिंकली केली. या स्पर्धा नवी दिल्ली येथे भरविण्यात आल्या होत्या. यामध्ये स्वप्नील यांनी सुवर्ण पदक मिळविले. यानंतर कैरो येथे झालेल्या 2022 च्या ISSF विश्वचषक स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला जाण्यासाठीच्या कोट्यात स्वतःची जागा निर्माण केली. ऑलिम्पिकसाठी जाण्याआधी स्वप्नील यांनी 2023 च्या ISSF विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धेत रौप्य पदक मिळविले. ती स्पर्धा बाकु या ठिकाणी पार पडली होती. तसेच हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. आणि 2024 पॅरिस ऑलिम्पिक ची मोठ्या उत्साहात तयारी सुरु केली. आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर, अथक परिश्रमाने स्वप्नील कुसळे यांनी 50 मी रायफल प्रोन 3 पोझीशनमध्ये 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळविले.

महाराष्ट्राच्या दृष्टीने स्वप्नील यांची कामगिरी खूप महत्वपूर्ण ठरते. कारण खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक स्पर्धेत पदक जिकणारे महाराष्टातले दुसरे खेळाडू होण्याचा बहुमान मिळविला. महाराष्ट्राची 1952 पासून असणाऱ्या इतक्या वर्षांची प्रतीक्षा स्वप्नील यांनी संपविली आणि एक इतिहास रचला.

Read Here Khashaba Jadhav Biography

स्वप्नील कुसळे यांचे मार्गदर्शक 

स्वप्नील कुसळे यांना त्यांच्या वडिलांचे प्रचंड सहकार्य लाभले हे आवर्जून इथे नमूद करावे लागतेय. नेमबाजीसाठी आर्थिक भार प्रचंड असल्याने त्याची कधीही झळ स्वप्नील यांच्यापर्यंत पोहचू दिली नव्हती. सुरवातीला त्यांनी कर्ज काढून स्वप्नील यांना रायफल घेऊन दिली होती. त्यांच्या वडिलांच्या पाठिंब्यानेच स्वप्नील ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास करू शकले. तसेच माजी नेमबाज दीपाली देशपांडे यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले. त्या आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील यांनी नेमबाजीतील कौशल्य प्राप्त केले.

संपत्ती (Networth)

स्वप्नील यांच्या संपत्तीबाबत अजूनही पुरेसी माहिती उपलब्ध नाही. त्यांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने 1 करोडचे बक्षीस जाहीर केले आहे.

स्वप्निलबाबत काही रंजक गोष्टी 

1. स्वप्नील यांना घरी असताना सकाळी नाश्त्याला तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजी खायला आवडते. असे त्यांच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. 

2. स्वप्नील वयाच्या 14 व्या वर्षांपासून नेमबाजीचा सराव करत आहेत.

3. त्यांची पहिली रायफल ही 3 लाख रुपयांची होती. त्यासाठी वडिलांनी कर्ज घेतले होते.

4. ते 2015 पासून मध्य रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून काम करत आहेत.

5. 2015 मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेता गगन नारंग यांनाच पराभव केला होता.

6. त्यांना प्रवासाची व नवनवीन ठिकानांना भेट देण्याची खूप आवड आहे. इत्यादी…

Read More About Swapnil Kusale

अशाप्रकारे आपण स्वप्नील कुसळे यांची माहिती (Swapnil Kusale Biography) या लेखातून त्यांच्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास नक्की कंमेंटमध्ये कळवा. तसेच तुमच्या असणाऱ्या सूचना आमच्यापर्यंत contact form च्या माध्यमातून पोहचवा. आम्ही त्यावर नक्कीच काम करू. धन्यवाद!!!

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1. स्वप्नील कुसळे यांचे मूळ गाव कोणते?

उत्तर :- स्वप्नील कुसळे यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी हे आहे.

प्रश्न 2. स्वप्नील कुसळे यांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक मिळविले?

उत्तर :- स्वप्नील कुसळे यांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळविले आहे.

प्रश्न 3. स्वप्नील कुसळे यांचे प्रशिक्षक कोण होते ?

उत्तर :- स्वप्नील कुसळे यांचे प्रशिक्षक माजी नेमबाज दीपाली देशपांडे या होत्या.

प्रश्न 4. स्वप्नील कुसळे यांची संपत्ती किती आहे?

उत्तर :- याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

प्रश्न 5. स्वप्नील कुसळे तिकीट कलेक्टर आहेत का?

उत्तर :- हो, ते 2015 पासून मध्य रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

2 thoughts on “स्वप्नील कुसळे यांची माहिती : Swapnil Kusale Biography in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top