Rhea Singha Biography : रिया सिंघा बायोग्राफी 2024 (Free)

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 या स्पर्धेत मिस युनिव्हर्स इंडिया ठरलेल्या रिया सिंघा यांची बायोग्राफी (Rhea Singha Biography) या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोर्चा गुजरात मधील अहमदाबाद येथील असणाऱ्या रिया ह्या मॉडेलिंग क्षेत्रातील प्रसिद्ध मॉडेल आहेत. लहानपणापासून मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या रिया यांनी खूप कमी वयात मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमविले आहे. वयाच्या फक्त आठव्या वर्षी त्यांनी मिस युनिव्हर्स इंडिया 2024 हा किताब पटकाविला आहे. कमी वयात हे यश मिळवल्याने सर्वत्र त्यांचे नाव चर्चेत आहे. मेक्सिको येथे पार पडणाऱ्या मिस युनिव्हर्स 2024 या स्पर्धेत त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. म्हणूनच आजच्या या लेखातून आपण त्यांच्या बाबतची माहिती घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया मिस युनिव्हर्स इंडिया रिया सिंघा यांची बायोग्राफी (Rhea Singha Biography)…..

Rhea Singha Biography
Rhea Singha Biography

अल्पपरिचय

9 डिसेंबर 2005 रोजी जन्म झालेल्या रिया सिंघा या मॉडलिंग क्षेत्रात तसेच अभिनय क्षेत्रात काम करतात. त्यांच्या वडिलांचे नाव ब्रिजेश सिंघा असून ते व्यावसायिक आहेत. तसेच त्यांच्या आईचे नाव रीता सिंघा आहे. रिया यांना एक बहीण आहे. तिचे नाव अक्षा सिंघा आहे. रिया सिंघा यांचे मुळ गाव गुजरात मधील अहमदाबाद हे आहे. त्या अहमदाबाद मध्येच स्थायिक आहेत. रिया लहानपणापासून मॉडेलिंग क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवले आहेत. सध्या फक्त 18 वर्षाच्या असणाऱ्या रिया मॉडलिंग क्षेत्रातील प्रसिद्ध मॉडेल आहेत.

Riya Singha Biography
Rhea Singha Biography

शिक्षण

अहमदाबाद मध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या रिया यांचे शालेय शिक्षण अहमदाबाद मध्येच पूर्ण झाले आहे. अहमदाबाद मधील महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूल मधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी फॅशन डिझाईनिंगचे ही शिक्षण घेतले आहे. सध्या त्या परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये पदवी घेत आहेत. अशाप्रकारे यशाच्या मार्गावर असतानाही त्यांनी शिक्षण सोडलेले नाही.

प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कामगिरी (करियर)

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणेच रिया यांच्या मॉडेलिंग क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात लहानपणापासूनच झाली होती. दिसायला सुंदर आणि रेखीव असणाऱ्या रिया यांनी सुरुवातीपासूनच छोटे मोठे पुरस्कार जिंकण्यास सुरुवात केली होती.

2020 या वर्षी गुजरात मध्ये मिस टीन गुजरात ही स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेचे विजेतेपद रिया सिंघा यांनी वयाच्या 16 व्या वर्षी मिळवून एक भक्कम पाऊल टाकून करिअरची सुरुवात केली. या स्पर्धेत विजेते पद मिळवून क्राउन मिळवून पुढे होणाऱ्या मिस टीन इंडिया स्पर्धेतही त्यांनी क्राउन मिळविला आणि आंतरराष्ट्रीय मिस टीन अर्थ 2023 या स्पर्धेसाठी निवड झाली. रिया सिंघा यांनी 2023 मध्ये झालेल्या मिस टीन अर्थ या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत रिया सिंघा यांनी विजेतेपद पटकावले आणि मिस टिन अर्थ 2023 चा मानाचा किताब मिळावीला. रिया सिंघा या पहिल्या भारतीय मॉडेल आहेत ज्यांनी मिस टीन अर्थ हा पुरस्कार मिळविला आहे.

तसेच त्यांनी मिस टीन युनिव्हर्स 2023 ही स्पर्धा स्पेन मधील माद्रिद येथे पार पडली होती. या स्पर्धेतही रिया सिंघा यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्या पहिल्या सहा स्पर्धकांपैकी एक होत्या. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये Joy Times fresh season 14 मध्ये रिया यांनी उपविजेते पद मिळविले. अशा प्रकारच्या करिअरच्या सुरुवातीतील यशामुळे आत्मविश्वास उंचावल्याने रिया सिंघा यांनी मिस युनिव्हर्स इंडिया 2024 या स्पर्धेत सहभाग घेण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी 2023 मध्येच मुंबईमधील कोकोआबेरी अकॅडमी मध्ये मॉडेलिंग चे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. येथे त्यांनी 21 दिवसाचे प्रशिक्षण अल्शिया राऊत आणि अंजली राऊत यांच्याकडून घेतले होते.

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ही स्पर्धा 22 सप्टेंबर 2024 या दिवशी झी स्टुडिओ, जयपुर, राजस्थान येथे पार पडली. या स्पर्धेत 50 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या सर्वांना वरचढ ठरत मिस युनिव्हर्स इंडिया 2024 या स्पर्धेचे विजेतेपद (किताब) रिया सिंघा यांनी पटकविला आणि त्या मिस युनिव्हर्स इंडिया ठरल्या. 2015 मध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स उर्वशी रौतेला यांच्या हस्ते रिया सिंघा यांना मानाचा मुकुट (क्राउन) घालण्यात आला. तसेच ही स्पर्धा चालू असतानाच स्पर्धेदरम्यान त्यांनी मायग्लॅम मेकअप यांच्याद्वारे देण्यात येणारा मिस ग्लॅमरस हा किताब देखील जिंकला. तसेच रिया सिंघा यांची मिस युनिव्हर्स 2024 या स्पर्धेसाठी देखील निवड झाली आहे. मिस युनिव्हर्स 2024 ही स्पर्धा 16 नोव्हेंबर 2024 रोजी मेक्सिको येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत रिया सिंघा भारताचे प्रतिनिधित्व करतील. 

Rhea Singha Biography 2024
Rhea Singha Biography

छंद (Rhea Singha Biography)

रिया सिंघा यांना प्रवासाची आवड आहे. त्या सतत विविध ठिकाणी प्रवास करत असतात. तसेच त्यांना गाण्याची ही आवड आहे.  त्या गाणे गात असल्याचे व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्याचप्रमाणे रिया सिंघा यांना व्यायामाची ही आवड आहे. रिया यांना पाककलेतही आवड असल्याचे दिसून येते. त्या विविध पदार्थ बनवून त्यांचे व्हिडिओ पोस्ट करत असतात. 

Read More : Rhea Singha Biography

रिलेशनशिप

रिया सिंघा या अविवाहित आहेत. त्यांच्या रिलेशनशिप बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. (Rhea Singha Biography)

संपत्ती (Networth)

काही संदर्भानुसार फक्त 18 वर्षाच्या असणाऱ्या रिया ह्या करोडपती आहेत. मॉडेलिंग क्षेत्रातील स्पर्धामधून तसेच ब्रँडचे प्रमोशन या द्वारे त्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवतात.  त्याच प्रमाणे टीव्ही शो वरील फॅशन शो मधून ही त्या उत्पन्न मिळवतात. अहवालानुसार त्यांच्याकडे तीन ते चार कोटींची संपत्ती असल्याचे समजते. तसेच त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती देखील सधन आहे. त्यांचे वडील एक व्यावसायिक आहेत.

अशाप्रकारे रिया सिंघा यांची बायोग्राफी (Rhea Singha Biography) या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. रिया यांचे यश हे सर्व मॉडेलिंग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायक आहे. तुम्हाला माहिती आवडली असल्यास प्रतिक्रिया जरूर द्या. तसेच तुम्हाला कोणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यावरती आम्ही नक्कीच काम करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तसेच इतर माहिती वाचण्यासाठी व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून pocketbiography.com च्या कुटुंबात सहभागी व्हा. तसेच तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद सदैव राहू द्या. धन्यवाद!!!

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1-  रिया सिंघा यांची जन्मतारीख काय आहे? (Rhea singha birthday)

उत्तर – रिया सिंघा यांची जन्मतारीख 9 डिसेंबर 2005 आहे. (Rhea singha birthday)

प्रश्न 2 – रिया सिंघा यांची वय किती आहे? (Rhea singha age)

उत्तर – रिया सिंघा यांची वय 2024 मध्ये 18 आहे. (Rhea singha age)

प्रश्न 3-  रिया सिंघा या कोणत्या राज्यातील आहेत? (Rhea singha is from which state)

उत्तर – रिया सिंघा या गुजरात राज्यातील आहेत. (Rhea singha is from which state)

प्रश्न 4- रिया सिंघा यांच्या वडिलांचे नाव काय आहे? (rhea singha father)

उत्तर – रिया सिंघा यांच्या वडिलांचे नाव ब्रिजेश सिंगा असून ते व्यावसायिक आहेत. (rhea singha father)

प्रश्न 5- रिया सिंघा यांची उंची किती आहे? (rhea singha height)

उत्तर – रिया सिंघा यांची उंची 5 फूट 7 इंच आहे. (rhea singha height)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top