राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी 2024 : Ahilyabai Holkar Punyatithi 2024

इतिहासाच्या कालपटलावर स्त्री शक्तीचा ठसा उमटविणाऱ्या,तत्वज्ञानी राणी म्हणून ओळख असणाऱ्या, ज्या मनगटात बळ, बुद्धी, आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या, ज्यांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला आहे अशा लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन!!! 

इतिहासात राजमाता जिजाऊ नंतर राजमाता दर्जा मिळणाऱ्या फक्त अहिल्याबाई होळकर आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व हे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे आहे. त्यांची तुलना इंग्लंडची राणी एलीझाबेथ व डेंमार्कची राणी मार्गरेट यांच्याशी केली जाते. राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी 2024 (Ahilyabai Holkar Punyatithi 2024) या लेखात अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या महान कार्याचा आढावा घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र……. 

Ahilyabai Holkar Punyatithi
Ahilyabai Holkar Punyatithi

प्रारंभीक जीवन 

अहिल्यादेवी यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौँडी या गावी 31 मे 1725 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे होते. ते गावचे पाटील व व्यवसायाने शेतकरी होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नव्हते. असे असताना देखील त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच अक्षरओळख करून दिली. त्यांना लिहण्यास वाचण्यास शिकविले. तसेच त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई शिंदे असे होते. धनगर समाजातील असणाऱ्या अहिल्याबाईंचे  राहणीमान लहानपणापासूनच अत्यंत साधे आणि सरळ होते. तसेच त्यांना शिव उपासनेची आवड होती. त्या नित्यनियमाने शिव मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करत असत.

Buy : Rajmata Ahilyabai Holkar Biography Book

विवाह 

तत्कालीन समाजव्यवस्थेतील रूढीनुसार अहिल्याबाईचा विवाह वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी मराठाराज्य संघातील कर्तबगार, पराक्रमी होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी 20 मे 1733 रोजी झाला. यावेळी खंडेराव यांचे वय 12 वर्ष होते. लग्नानंतर अहिल्यादेबाईंचे सासरे मल्हारराव होळकर यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांनी मोडी लिपीचे ज्ञान, गणिती कौशल्य, तलवारबाजी, घोडेस्वारी, दांडपट्टा फिरवणे यांचबरोबर राजकारणचे डावपेच, युद्धनीती, पत्रव्यवहार यासारख्या गोष्टीचे प्रशिक्षण दिले. 

अहिल्याबाईं होळकर यांना मालेराव व मुक्ताबाई ही दोन अपत्ये होती. 1754 मध्ये झालेल्या कुंभेरीच्या लढाईत खंडेराव होळकर यांना विरमरण प्राप्त झाले आणि वयाच्या 28 वर्षी अहिल्याबाईंना वैधव्य प्राप्त झाले. जुन्या रूढीनुसार सती न जाता लोककल्याणासाठी आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. ( सती जाण्यापासून थांबवण्यामध्ये मल्हारराव होळकर यांचा मोलाचा वाटा होता)

छ. शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यकारभाराकडे लक्ष 

मल्हाररावांच्या इच्छेनुसार अहिल्याबाईं सती न जाता राज्यकारभाराकडे लक्ष देऊ लागल्या. मल्हाररावांच्या अनुपस्थितीत संपूर्ण राज्याची जबाबदारी चोख पार पाडत असत. 1766 मध्ये मल्हारराव होळकर आणि 1767 मध्ये मालेराव यांचा मृत्यू झाल्यानंतर होळकर यांचे राज्य पेशवाईत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण या प्रयत्नांना अहिल्याबाईंनी मोठ्या चातुर्याने आणि धैर्याने अपयशी केले. रघुनाथरावाने इंदोरवरील केलेली चढाई सडेतोड उत्तर देऊन परतवून लावला. राज्याच्या सुरक्षेची चोख व्यवस्था केली. राजधानी इंदोर वरून महेश्वरला स्थलांतरित केली. राजधानीच्या ठिकाणी विविध सोयी निर्माण केल्या. विकास घडवून आणला. तुकोजीराव होळकर यांना सेनापती पद दिले आणि सक्षम असा राज्यकारभार करू लागल्या. त्यांनी करपद्धतीत बदल करून ती सौम्य केली. गावोगावी पंच अधिकारी नेमून न्यायव्यवस्थेकडे लक्ष दिले. अन्यायाविरुद्ध स्वतः शस्त्र घेऊन त्या पुढे जात. युद्धामध्ये साहसी योध्याप्रमाणे निर्णय घेत. ( Ahilyabai Holkar Punyatithi)

लोकपयोगी कामे 

अहिल्यादेवी यांनी लोककल्याणासाठी विविध कामे केली. त्यामध्ये त्यांनी कामगार, कलाकार यांच्या विकासासाठी कर्जव्यवस्था, निवसाच्या सोयी केल्या. पशुपक्ष्यांसाठी कुरणे तयार केली. पिण्याच्या पाण्याची सोय केली. त्यासाठी ठिकठिकाणी पाणपोया निर्माण केल्या. धर्मशाळा बांधल्या. गरोगरिबांसाठी अन्नछत्रे चालू केली. निराधार, अपंग व्यक्तींचे पुनर्वसन केले. विहिरी, घाट, तलाव बांधले. रस्त्यांची सोय केली.

अहिल्यादेवी रोज दरबार भरवून लोकांच्या समस्या जाणून घेत. त्यावर निर्णय देत. ही सर्व लोकपयोगी कामे करत असताना कोणावर अन्याय होणार नाही याची त्या बारकाईने काळजी घेत असत. जनतेला आपण अधिकार गाजवत आहोत असे कधीही वाटू दिले नाही. ( Ahilyabai Holkar Punyatithi)

स्त्रियांसाठी कार्य 

अहिल्याबाई होळकर यांनी सैन्यात पुरुषांबरोबर स्त्रियांनाही समान संधी देण्यासाठी स्त्रियांची एक सैन्य तुकडी तयार केली होती. अहिल्याबाईं होळकर यांनी विधवा महिलांसाठीदेखील क्रांतिकारक निर्णय घेऊन त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विधवा महिलेला पुत्र नसला तरी पतीची संपत्ती स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार दिला. यासाठी कठोर कायदे केले. तसेच स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रीशक्ती वर पूर्ण विश्वास असलेल्या अहिल्यादेवी यांनी स्त्रियांना सक्षम करण्यावर भर दिला.

Read More Biographical Blogs

अंधश्रद्धा निवारण 

समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरा बंद करण्यासाठी अहिल्यादेवी यांनी प्रयत्न केले. तत्कालीन समजव्यवस्थेतील सतीची चाल बंद करण्यासाठी रामायण, महाभारतातील दाखले दिले. धर्मग्रंथाचा आधार घेतला. याच मार्गाने पुढे राजा राममोहन रॉय यांनी सतीची चाल बंद करण्यासाठू युक्तिवाद केला होता. यावरून अहिल्यादेवी यांच्या बौद्धिकतेची आणि दूरदृष्टीची प्रचिती येते. तसेच समाजात असणाऱ्या इतरही अंधश्रद्धा निवारण्याचे काम केले. तसेच जातीभेदास विरोध केला. ( Ahilyabai Holkar Punyatithi)

कलेस राजश्रय 

अहिल्यादेवी यांनी महेश्वर या राजधानीच्या शहरांत कलेस पोषक असे वातावरण तयार केले होते. कलाकारांना राजश्रय देऊन त्यांच्या कलेला वाव दिला होता. त्यांनी कवि मोरोपंत तसेच शाहीर अनंतफंदी यांना आश्रय दिला होता. त्यांच्या दरबारात संस्कृत विद्वान खुशालीराम देखील होते. तसेच प्रसिद्ध मूर्तिकार, कारागीर, कलाकार, विद्वान, ज्योतिषी होते. त्यांना वेतन मिळत असे.

न्यायप्रियता 

अहिल्याबाई होळकर या प्रचंड न्यायप्रिय होत्या. त्यांच्या सर्वाना समान न्याय या विचाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभावित झाले होते. अहिल्याबाईंनी कुटुंबातील व्यक्तींनाही प्रजेला त्रास दिल्यामुळे शिक्षा दिल्याची उदाहरणे इतिहासात मिळतात.

Read More About Rajmata Ahikyabai Holkar

मंदिर निर्माण-जीर्णोद्धार 

अहिल्यादेवी होळकर या सर्व धर्माचा आदर करत असत. त्यांनी अनेक मंदिरे, मशिदी, दर्गे बांधली. अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. उदा. सोमनाथ मंदिर, त्रंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, चौदीश्वरी मंदिर, रावळेश्वर महादेव मंदिर, इ.

मंदिर स्थापत्यसोबत अहिल्यादेवी यांनी बारव, धर्मशाळा, पूल, स्मारके, किल्ले, राजवाडे, बांधले. तसेच इंदोर या छोट्या गावाचा विकास करून त्याचे रूपांतर विकसित शहरात करण्याचे श्रेय देखील अहिल्यादेवी होळकर यांनाच जाते.

निधन ( Ahilyabai Holkar Punyatithi)

इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे निधन 13 ऑगस्ट 1795 रोजी झाला. वयाच्या 70 व्या वर्षी अहिल्यादेवी होळकर यांची प्राणज्योत मावळली. जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या लोकमाता होत्या. अशा लोककल्याणासाठी कार्य करणाऱ्या राजमातेला शतशः कोटी कोटी प्रणाम……

सन्मान 

1) 25 ऑगस्ट 1996 अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानाप्रित्यर्थ भारत सरकारने एक टपाल तिकीट जारी केले.

2) इंदोर विमानतळास “देवी अहिल्याबाई विमानतळ” असे नाव देण्यात आले.

3) इंदोर विद्यापीठास “देवी अहिल्या विश्वविद्यालय”असे नाव देण्यात आले.

4) सोलापूर विद्यापीठास “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ” असे नाव देण्यात आले आहे.

5) 13 मार्च 2024 रोजी अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर असे केले.

अशाचप्रकारचे जीवनचरित्रविषय, प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा. लेखावर प्रतिक्रिया द्या. तसेच आपल्या सूचना आमच्यापर्यंत पोहचवा. त्यावर आम्ही नक्कीच काम करु…धन्यवाद!!!

4 thoughts on “राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी 2024 : Ahilyabai Holkar Punyatithi 2024”

  1. Pingback: भगतसिंग यांची माहिती : Bhagat Singh Biography in मराठी (Free) - Pocket Biography

  2. Pingback: सावित्रीबाई फुले यांची माहिती : Savitribai Phule Information In Marathi 2024 (Free) - Pocket Biography

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top